शाळा गुणवता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा (SQAAF) स्वयं मूल्यांकन २०२५-२६ sqaaf gunvatta mulyankan
बाबतची माहिती SQAAF अॅप मध्ये भरणेबाबत…
संदर्भ १. शासन निर्णय क. संकीर्ण २०२४/प्र.क्र.०९/ एसडी मंत्रालय मुंबई दि. १५ मार्च, २०२४(SSSA)
२. शासन निर्णय क्र. संकीर्ण २०२४/प्र.क्र.०९/एसडी-६ मंत्रालय मुंबई दि. १५ मार्च, २०२४९०AAF)
३. मा. संपालक, SCERTM पुणे यांचे दि.०३/०२/२०२५ रोजीचे पत्र
४. मा. संचालक, SCERTM पुणे यांचे दि. १७/०२/२०२६ रोजीचे पत्र
उपरोक्त संदर्भ क्र.१ नुसार राज्यातील सर्व शाळांचे मूल्यांकन करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे येथे राज्य शाळा मानक प्राधिकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. संदर्भ क्र. २ नुसार राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांसाठी शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखक्याची (SQAAF) निर्मिती करण्यात आलेली आहे. संदर्भ क.३ नुसार सन २०२४-२५ मधील स्वयं मूल्यांकन पूर्ण करण्यात आले आहे. संदर्भ क्र.४ नुसार सन २०२५-२०२६ मध्ये शाळांचे स्वयं मूल्यांकन करण्यासाठी दि. २७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत सर्व शाळांना पूर्व तयारीच्या सूचना देण्यात आल्या होत्या,
सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाध्या शाळांसाठी विकसित करण्यात आलेल्या शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडयाची (SQAAF) प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांची असेल, संकेतस्थळावर सर्व शाळांची नोंदणी व स्वयं मूल्यांकन पूर्ण करून घेण्याची जबाबदारी प्राथमिक शाळांच्या व माध्यमिक शाळांच्या संदर्भात अनुक्रमे शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांची राहील. शाळांना मूल्यांकना संदर्भात तसेच शाळा विकास आराखडा निर्मिती संदर्भात गरजेनुसार मार्गदर्शन करण्याची जबाबदारी प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांची राहील.
सन २०२५-२६ मध्ये शाळांचे स्वयं मूल्यांकन पूर्ण करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे यांच्या maa.ac.in या वेबसाईटवरील SQAAF टॅबमध्ये स्वयं मूल्यांकनासाठीची लिंक दि. १६ मार्च २०२६ ते दि.१५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदरील SCQAAF अँप वर दिलेल्या मुदतीत माहिती भरणे बाबत आपल्या जिल्ह्यातील सर्व शाळांना ऑनलाइन / ऑफलाइन बैठकीचे आयोजन करून कळविण्यात ग्रावे.
सदरील SOAAF अॅप मध्ये माहिती भरण्यासाठीच्या सूचना सोबत देण्यात आलेल्या आहेत.









