शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा (SQAAF) सन २०२६-२७ मध्ये त्रयस्थ संस्थाद्वारे केल्या जाणाऱ्या मुल्यांकनाबाबत sqaaf mulyankan ashwasan arakhada paripatrak
संदर्भ :
– १. शासन निर्णय क्र. संकीर्ण २०२४/प्र. क्र.०९/ एसडी-६ मंत्रालय मुंबई दि.१५ मार्च, २०२४ (SSSA)
२. शासन निर्णय क्र. संकीर्ण २०२४/प्र.क्र.१०/एसडी-६ मंत्रालय मुंबई दि. १५ मार्च, २०२४ (SQAAF)
३. कार्यारंभ आदेश
महोदय,
उपरोक्त संदर्भ क्र. ०१ च्या शासन निर्णयान्वये राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे येथे राज्य शाळा मानक प्राधिकरण ) SSSA (कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. संदर्भ क्र. ०२ च्या शासन निर्णयान्वये शाळा गुणवत्ता आणि आश्वासन आराखडा (SQAAF) तयार करण्यात आला आहे. संदर्भ क्र. ०२ ला अनुसरून राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमाच्या शाळांचे स्वयं-मूल्यांकन, बाह्य-मूल्यांकन व त्रयस्थ पक्षाकडून मूल्यांकन करण्यात येणार आहे.
सन २०२४-२५ मध्ये १०२६७५ शाळांनी स्वयं मूल्यांकन पूर्ण केले होते. सन २०२४-२०२५ मध्ये स्वयं मूल्यांकनात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या शाळांच्यापैकी सन २०२५-२०२६ मध्ये १०६४४ शाळांचे बाह्य मुल्यांकन पूर्ण करण्यात आले. बाह्य मूल्यांकनात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या शाळांच्यापैकी ५४० शाळांचे त्रयस्थ पक्षाद्वारे मूल्यांकन करण्याकरिता निवड करण्यात आली आहे. सदरील यादीत A+ श्रेणी मिळालेल्या शाळांची संख्या ४२८ व A श्रेणी मिळालेल्या १०६७शाळांच्यापैकी सर्वाधिक गुण मिळवलेल्या ११२ शाळांची निवड करण्यात आली आहे.
उपरोक्त संदर्भ क्र.३ नुसार राज्यातील उपरोक्त नमूद ५४० शाळांचे त्रयस्थ पक्षाद्वारे केल्या जाणाऱ्या मूल्यांकनासाठी NABET-QCI या शासकीय स्वायत्त संस्थेची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार NABET-QCI ही सोबत दिलेल्या यादीतील शाळांचे मूल्यांकन करणार आहे. मूल्यांकनाबाबत आपल्या जिल्यातील निवडपात्र अधिनस्थ शाळांना खालीलप्रमाणे सूचना देण्यात याव्यात.
सूचना:
१. कार्यारंभ आदेश प्राप्त झाल्यापासून ६० दिवसाच्या कालावधीत मूल्यांकन कामकाज पूर्ण करण्यात येणार आहे.
२. मूल्यांकनाचे कामकाज Pi-Jam फाऊंडेशन यांनी बनवलेल्या app द्वारे किंवा लिंक द्वारे पूर्ण केले जाणार आहे.
३. NABET-QCI मार्फत शाळा मूल्यांकनाचे शाळानिहाय नियोजन कळविण्यात येईल.
४. सोबत जोडण्यात आलेल्या यादीतील शाळांना NABET-QCI यांचे दोन प्रतिनिधी भेट देणार आहेत.
५. शाळा भेटीच्या वेळी कोणताही सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नये याबाबत आपल्या स्तरावरून सर्व निवड पात्र शाळांच्या मुख्याध्यापकांना सूचित करावे.
६. मूल्यांकनाच्यावेळी इतर शाळांच्या बरोबर तुलना न करता नैतिकदृष्ट्या योग्य मूल्यांकन केले जात आहे का याबाबत वेळोवेळी आपल्या स्तरावरून आढावा घ्यावा.
७. मूल्यांकनाला जाणाऱ्या तज्ञ सुलभकांची निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था, प्रवास व्यवस्था NABET-QCI यांच्या कडूनच केली जाणार आहे.
८. तज्ञ सुलभकांनी निवास व्यवस्थेबाबत सहकार्य मागितल्यास तालुका/जिल्हा स्तरावरील शासकीय विश्रामगृह यांना निवास व्यवस्थेबाबत विनंती पत्र आपल्या स्तरावरून देण्यात यावे.
९. मुख्याध्यापक यांनी समन्वयाने कामकाज करण्यासाठी आपल्या स्तरावरून सूचित करावे.
१०. स्वयं मूल्यांकन सन २०२४-२५ मध्ये मुख्याध्यापक यांनी सादर केलेले पुरावे तसेच बाह्य मूल्यांकन सन २०२५-२६ मध्ये तपासलेले पुरावे तज्ञ सुलभकांना उपलब्ध करून देण्याबाबत आपल्या स्तरावरून संबंधित मुख्याध्यापक यांना सूचित करावे.
११. NABET-QCI यांनी प्रत्येक तज्ञ सुलभक हे मूल्यांकनासाठी शाळेची निवड झालेबाबत व मूल्यांकनासाठी तज्ञ सुलभक म्हणून निवड केलेबाबत किमान एक आठवडा अगोदर शाळेला ईमेल/पत्र/भ्रमणध्वनि संदेश इत्यादि द्वारे पूर्व कल्पना देणार आहेत. तसेच प्रत्यक्ष शाळा भेटीला जाण्यापूर्वी तीन दिवस अगोदर भ्रमणध्वनि संदेशाद्वारे “आपल्या शाळेला भेट देण्यासाठी आम्ही येत आहोत” अशी पूर्व कल्पना देणार आहेत याबाबत आपण सर्व निवडपात्र शाळांच्या मुख्याध्यापकांना सूचित करावे.
१२. मूल्यांकनाच्यावेळी निवड पात्र शाळांच्याकडून कोणत्याही प्रकारची भेट वस्तु किंवा आर्थिक स्वरूपात रक्कम तज्ञ सुलभक यांना देऊ नये याबाबत आपल्या स्तरावरून सर्व निवड पात्र शाळांना सूचित करावे.
१३. त्रयस्थ पक्षाद्वारे केल्या जाणाऱ्या मूल्यांकनासाठी येणाऱ्या तज्ञ सुलभकांच्या माहितीसाठी आपण राज्य शाळा मानक प्राधिकरण (SSSA-SQAAF) येथील श्री सुर्यकांत शहाणे, कार्यक्रम सहायक, (७५८८८४९०४८) व श्री प्रदीपकुमार कुडाळकर, कार्यक्रम व्यवस्थापक (९४०५९५५७८७) यांना संपर्क करावा.
१४. तज्ञ सुलभकांबाबत NABET-QCI येथील श्रीमती आदिबा फैझ सहाय्यक संचालक (+९१ ९७१६९ ६१४५८), डॉ. वरिंदर एस. कन्वर, मुख्य कार्यकारी अधिकारी (+९१ ९८०५९६५४०१), श्रीमती मधू अहलुवालिया, वरिष्ठ सल्लागार (+९१९८१०४ ६५५०७७ यांना संपर्क करावा.
सोबतः ५४० शाळांची यादी










