इयत्ता १० वी विषय- विज्ञान भाग- २ प्रकरण ३ रे सजीवांतील जीवनप्रक्रिया बहुपर्यायी प्रश्न उत्तरे ssc exam quiz 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

इयत्ता १० वी विषय- विज्ञान भाग- २ प्रकरण ३ रे सजीवांतील जीवनप्रक्रिया बहुपर्यायी प्रश्न उत्तरे ssc exam quiz 

प्रश्न 1 ला खालील पर्यायापैकी योग्य पर्यायचे वर्णाक्षर लिहा

1) एका सजीवापासून त्याच प्रजातीचा नवीन सजीव तयार होण्याच्या प्रक्रियेला ………….असे म्हणतात

अ) प्रजनन

ब) पोषण

क) रक्ताभिसरण

ड) उत्सर्जन

2) दोन भिन्न पेशींच्या संयोगाशिवाय ——- हे प्रजनन घडून येते

अ) लैंगिक प्रजनन

ब) अलैंगिक प्रजनन

क) वरिल दोन्ही

ड) यापैकी नाही

3) ——– या एकपेशीय कवकामध्ये कलीकायन पध्द‌तीने अलैंगिक प्रजनन होते?

अ) हायड्रा

ब) अमिबा

क) किण्व

ड) स्पायरोगायरा

4) काही प्राणी विशिष्ट परिस्थितीमध्ये स्वतः च्या शरीराचे दोन तुकडे करतात आणि प्रत्येक तुकड्यापासून शरीराचा उर्वरित भाग तयार करून दोन नवजात प्राणी तयार केले जातात यालाच ——— असे म्हणतात

अ) पुनर्जजन

ब) कलीकायन

क) मुकुलायन

ड) खंडीभवन

5 )———- या बहुपेशीय सजीवांमध्ये मुकुलायन पध्द‌तीने अलैंगिक प्रजनन होते

अ) हायड्रा

ब) अमिबा

क) किण्व

ड) स्पायरोगायरा

6) वनस्पतीमध्ये मूळ, खोड, पान, मुकुल यांसारख्या शाकीय अवयवांच्या मदतीने होणाऱ्या प्रजननास ——— प्रजनन म्हणतात

अ) बीजाणू निर्मिती

ब) खंडीभवन

क) शाकीय प्रजनन

ड) पुनर्जनन

7) म्य्करसारख्या कवकांचे शरीर ………असते

अ) मऊ

ब) तंतुमय

क) कडक

ड) खडबडीत

8) ज्या प्रक्रियेत स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक या एकगुणी पेशींचा संयोग होऊन एका द्विगुणी युग्मनजाची निर्मिती होते याला……….. असे म्हणतात

अ) पोषण

ब) श्वसन

क) फलन

ड) युग्मक निर्मिती

9) वनस्पती मध्ये……….. हे लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे

अ) मूळ

ब) खोड

क) पान 

ड) फूल

10) परागकोशातील कोष्ठकामध्ये विभाजनाने परागकण तयार होतात

अ) सूत्री

ब) अर्धसूत्री

क) वरील दोन्ही

ड) यापैकी नाही

11) शरीराचे अनेक तुकडे तुकडे होऊन प्रत्येक तुकडा नवजात सजीव म्हणून जीवन जगू लागतो हे प्रजनन………. प्रकारचे आहे

अ) शाकीय प्रजनन

ब) मुकुलायन

क) पुनर्जनन

ड) खंडीभवन

12) जर एकाच फुलांमध्ये पुमंग आणि जायांग ही दोन्ही मंडले असतील तर अशा फुलाला——— म्हणतात

अ) एकलिंगी

ब) उभयलिंगी

क) वरील दोन्ही

ड) यापैकी नाही

13) जेव्हा परागण क्रिया एकाच फुलात किंवा एका झाडाच्या दोन फुलात होते तेव्हा त्यास ———– असे म्हणतात

अ) परपरागण

ब) स्वयंपरागण

क) वरील दोन्ही

ड) यापैकी नाही

14) परागन क्रिया जेव्हा एकाच जातीच्या दोन भिन्न वनस्पतींमधील फुलांमध्ये घडून येते तेव्हा त्यास ———– असे म्हणतात

अ) परपरागण

ब) स्वयंपरागण

क) वरील दोन्ही

ड) यापैकी नाही

15) बिजातील भूणपोशाचा वापर करून युग्मजाची वाढ होते आणि नवीन रोप तयार होते यालाच ———- असे म्हणतात

अ) मुकलायन –

ब) कलीकायन

क) बीजांकुरण

ड) खंडीभवन

16) —— हे गुणसूत्र फक्त पुरुषत्वासाठी कारणीभूत असते

अ) X

ब) Y

क)Z

ड)0

17) ———– या अवयवामध्ये शुक्रपेशी तयार होतात

अ) मूत्राशय

ब) मूत्रवजनन वहिनी

क) वृषण

ड) अधिवृषण

18) गर्भशियातील वाढीच्या काळात भूनास अन्नपुरवठा करण्यासाठी ——— नावाचा अवयव तयार होतो

अ) तोंड

ब) अन्ननलिका

क) अपरा

ड) यापैकी नाही

19) एकयुग्मनजी जुळ्याबाबत भ्रूणपेशिची विभागणी जर युग्मज तयार झाल्यापासून 8 दिवसांनंतर झाली तर जुळे जन्माला येण्याची शक्यता जास्त असते

अ) एकयुग्मनजी

ब) ‌वियुग्मजी

क) सायामीज

ड) यापैकी नाही

20) भ्रूणाचे रोपण ——— या अवयवामध्ये होते

अ) अंडाशय

ब) गर्भाशय

क) अंडनलिका

ड) यापैकी नाही

21 ) पुरुष प्रजनन संस्थेत ——— ही संप्रेरक स्रवली जातात

अ) प्रोजेस्टेरॉन

ब) इस्ट्रोजेन

क) टेस्टोस्टेरॉन

ड) वरील सर्व

प्रश्न चूक की बरोबर ते लिहा

1) जननिक विचरणाचा अभाव हा अलैंगिक प्रजननाचा तोटा आहे बरोबर

2) अलैंगिक प्रजननाने तयार झालेला सजीव हा तंतोतंत मूळ सजीवासारखा असतो – बरोबर

3) अलैंगिक प्रजनन हे सावकाश होणारे प्रजनन आहे चुक

4) अमिबा ला विशिष्ट आकार नसल्याने कोणत्याही अक्षातून विभाजित होतो बरोबर

5) सायकॉन सारख्या स्पंज या सजीवांमध्ये पुनर्जजन पध्द्‌तीने प्रजनन होते चूक

6) प्लानेरिया या सजीवांमध्ये पुनर्जनन या पध्द‌तीने प्रजनन होते – बरोबर

7) पावाच्या तुकड्यावर बरशी तैयार होताना तिचा रंग हिरवट असतो बरोबर

8) फुलांमध्ये पुमंग आणि जायांग है अतिरिक्त मंडल असतात चुक

9) फुलांमध्ये निदलपुंज व दलपुंज हे आवश्यक मंडल असतात चुक

10) दैलपुंजातील घटक दलांना पाकळ्या म्हणतात- बरोबर

11) फुलांच्या पुमंग या मंडलात कुक्षी, कुक्षीवृत्त, व अंडाशय हे भाग येतात चूक

12) फुलांच्या जायांग या मंडलातें परागकोश व वृत्त हे भाग येतात चूक

13) आवृत्तीबिजी वनस्पती मध्ये ‌विफलन होते बरोबर

14) मानवी पुरुष प्रजनन संस्थेत रेतामध्ये फ्रक्टोज नावाची शर्करा असते बरोबर

15) एका शुक्राणूंची लांबी 60 मायक्रोमीटर अँसते- बरोबर

16) स्त्रिया मध्ये रजोनिवृत्ती ही साधारण 45 ते 50 वर्षाच्या दरम्यान होते बरोबर

17) पुरुष व स्त्रिया यांच्यामध्ये X हे गुणसूत्र सारखेच असते बरोबर

18) वीर्यदात्याचे नाव गुप्त ठेवले जातें बरोबर

19) लैंगिक आजारांमध्ये सायफिलीस आणि गोनो-हीया हे दोन आजार मोठ्या प्रमाणात आढळतात बरोबर

20) एकयुग्मनजी जुळे जनुकीय दृष्ट्या तंतोतंत सारखी असतात – बरोबर

22) द‌वियुग्मजी जुळे जनुकीय दृष्ट्या तंतोतंत सारखी असतात चूक

प्रश्न वेगळा घटक ओळखा

1) विविभाजन, बह‌विभाजन, खंडीभवन, कलिकायन खंडीभवन

2) कोचनलिकेतील फैलन, भाडोत्री मातृत्व, पुनर्जनन, वीर्य पेढी पुनर्जनन

3) अमिबा, पॅरामोशीअम, युग्लीना, बुरशी बुरशी

4) गाजर, मुळा, रताळे, बटाटै बटार्ट

5) मुकुलायन, खंडीभवन, बीजाणू निर्मिती, कलिकायन कलिकायन

6) कँक्षी, कुक्षीवृत्त, अंडाशय, परागकोष परागकोष

7) दैलपूंज, निर्दलपुंज, पुमंग, वृषण वृषण

8) एड्स, गोनो-हीया, क्षय रोग, सायफिलीस क्षय रोग

9) अंडनलिका, गर्भाशय, वृषण, अंडनलिका – वृषण

10) शुक्राशय, वृषणकोष, कॉउपरग्रंथी, योनी योनी

11) कचनलिकेतील फलन, कॉपर टी, वीर्य पेढी, भाडोत्री मातृत्व कॉपर टी

प्रश्न सहसंबंध ओळखा

1) प्मंग, जायांग: आवश्यक मंडले निदलपुंज, दलपुंज : (अतिरिक्त मंडल)

2) दलपुंजातील घटक: पाकळ्या निदलपुं‌जातील घटक (निदल)

3) एकलिंगी फल: पपई उभयलिंगी फूल (जास्वंद)

4) कोणत्याहीँ अक्षातून विविभाजन अमिबा आडवे ‌द्विविभाजन:-( पॅरामोशीअम)

5) खंडीभवन : शैवाल ::मुकुलायन : (हायड्रा)

6) स्त्रिया मध्ये गुणसूत्र XX: पुरुषांमध्ये गुणसूत्र :— (XY)

7) स्त्रिया मध्ये संप्रेरके इस्ट्रोजेन: पुरुषांमध्ये संप्रेरक

8) परागण जैविक घटक कीटक, पक्षी: परागण अजैविक घटक (टेस्टोस्टेरॉन)

9) शुक्राणू : वृषण: अंडपेशी (अंडाशय)

(वारा, पाणी)

10) गॅवत : पेरॉवर असलेल्या मुकुला मार्फत शाकीय प्रजनन: रताळे : (मुळा मार्फत)

11) देठ असणारे फुले : पुष्पवृत्त :: देठ नसणारे फुले : स्थानबद्ध फुले

12) प्लानेरीया : अलैंगिक प्रजनन :: मनुष्य : (लैंगिक प्रजनन)

गर्भाशय रोपणक्षम नसणे:—-

13) शुक्रपेशीचे अल्प प्रमाण : कचनलिकेतील फलन ::गर्भाशय रोपणक्षम नसणे : (भाडोत्री मातृत्व)

प्रश्न फक्त नाव लिहा

1) जुळ्यांचे प्रकार कोणते आहेत ➡️ एकयुग्मनजी, सायामीज, दवियुग्मजी जुळे

2) कॅटुंबनियोजनाची साधने कोणती आहेत ➡️निरोध, कॉपर टी, तोंडावाटे घेणाऱ्या गोळ्या

3) दौन लैगिंक आजारांची नावे सांगा ➡️एड्स, गोनोहीया, सायफिलीस

4) स्त्री प्रजनन संस्थेतील अंडाशयातून खवली जाणारी संप्रेरके कोणती➡️ इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन

5) पुरुष प्रजनन संस्थेतील स्रवली जाणारी संप्रेरके कोणती-➡️टेस्टोस्टेरॉन

6) अधिवृषण नलिकेची लांबी किती असते➡️ 6 मीटर

7) पुरुषांमध्ये कोणती लिंगी गुणसूत्र असतात➡️ XY

Related posts:

Leave a Comment