राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना पदोन्नती देण्याकरीता अनुसरावयाच्या कार्यवाही बाबतची एकत्रित मार्गदर्शक तत्वे state government servants promotion 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना पदोन्नती देण्याकरीता अनुसरावयाच्या कार्यवाही बाबतची एकत्रित मार्गदर्शक तत्वे state government servants promotion 

प्रस्तावना :-

राज्य शासकीय सेवेमध्ये पदोन्नतीसाठी पात्र अधिकारी / कर्मचाऱ्यांची शिफारस करण्याकरिता आस्थापना मंडळ / विभागीय पदोन्नती समिती गठीत करण्यात आली आहे. तसेच, पदोन्नतीसाठीचे निकष विविध शासन निर्णय / परिपत्रकान्वये विहित करण्यात आले आहेत. पदोन्नतीच्या वेळी हे विविध शासन आदेश मंडळ / समितीने विचारात घेणे आवश्यक असते. तथापि, हे आदेश एकत्रित स्वरुपात नसल्याने, आस्थापना मंडळ विभागीय पदोन्नती समितीला पदोन्नतीसाठी नियमानुसार योग्य शिफारशी करण्यासाठी अडचणी येत आहेत. सबब, आस्थापना मंडळ / विभागीय पदोन्नती समितीला पदोन्नतीसाठी नियमानुसार योग्य शिफारशी करणे सुलभ व्हावे यास्तव, पदोन्नती संदर्भातील आदेश एकत्रित करुन, सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्वे निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन परिपत्रक pdf download 

शासन निर्णय :-

सदर शासन निर्णयाद्वारे, राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या पदोन्नतीसाठी आस्थापना मंडळ / विभागीय पदोन्नती समिती गठीत करणे, पदोन्नतीसाठी विचारात घ्यावयाची पात्रता/निकष, अन्य अटी व शर्ती तसेच पदोन्नती समितीसमोर प्रस्ताव सादर करताना करावयाच्या कार्यवाही संदर्भातील, संदर्भ क्रमांक १ ते १३ येथील शासन आदेश अधिक्रमित करण्यात येत आहेत. तसेच, संदर्भ क्रमांक १४ ते ३५ येथील शासन आदेशांमधील तरतूदी विचारात घेऊन, राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना पदोन्नती देण्याकरीता अनुसरावयाच्या कार्यवाही बाबतची एकत्रित मार्गदर्शक तत्वे या शासन निर्णयान्वये पुढीलप्रमाणे विहीत करण्यात येत आहेत :-

अ) राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या पदोन्नतीसाठी शिफारस करण्यासाठी

समिती गठीत करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना :-

(1) आस्थापना मंडळ-१ व २ चे गठन करणे :-

संदर्भ क्र.१२ येथील दि.१.३.२०१७ चा शासन निर्णय अधिक्रमित करुन खालीलप्रमाणे आस्थापना मंडळ-१ व २ चे गठन करण्यात येत आहेत :-

१) आस्थापना मंडळाचे कार्यक्षेत्र :-

१) आस्थापना मंडळ १ ने सहाव्या वेतन आयोगानुसार ग्रेडवेतन रु.१०,०००/- व त्यापेक्षा अधिक ग्रेडवेतन असलेली सर्व पदे व आस्थापना मंडळ २ ने सहाव्या वेतन आयोगानुसार ग्रेडवेतन रु. ७,६००/- व त्यापेक्षा अधिक तथापि, रु.१०,०००/- पेक्षा कमी ग्रेडवेतन असलेली सर्व पदे यासाठी पदोन्नतीचे प्रस्ताव विचारात घेऊन, पदोन्नतीसाठी पात्र अधिकाऱ्यांची निवडसूची तयार करणे व त्यांच्या पदोन्नतीची शासनास शिफारस करणे.

ii) अशा पदांवरील मानीव दिनांकाचे प्रस्ताव विचारात घेऊन, मानीव दिनांक देण्याबाबतची शिफारस करणे.

ii) अशा पदांवरील अधिकाऱ्यांचे मुदतपूर्व सेवानिवृत्तीच्या नोटीसीविरुध्दच्या अभिवेदनावर “अभिवेदन समिती” म्हणून विचार करुन शासनास शिफारस करणे.

२) आस्थापना मंडळाची रचनाः –

क) आस्थापना मंडळ क्र. १

शासन परिपत्रक pdf download 

३) आस्थापना मंडळाच्या विचारार्थ कागदपत्रे सादर करणे -:

या सोबतच्या “परिशिष्ट-१ मधील तपासणीसूचीनुसार आणि “परिशिष्ट-२” मध्ये विहीत केलेल्या जोडपत्र “अ” ते “ड” या ४ प्रपत्रांमध्ये आस्थापना मंडळासमोर प्रस्ताव सादर करण्यात यावा. अशाप्रकारे पृष्ठ क्रमांक नमूद करुन अनुक्रमणिकेसह तयार करण्यात आलेल्या प्रस्तावाचे १० संच, पत्रासह सादर करावेत. “परिशिष्ट-१” नुसार विहीत करण्यात आलेल्या तपासणीसूचीनुसार सर्व कागदपत्रांची पूर्तता न करता सादर करण्यात येणारे प्रस्ताव नाकारण्यात येतील.

Related posts:

Leave a Comment