सांस्कृतिक कार्यक्रम जबरदस्त सूत्रसंचालन | हमखास श्रोत्यांच्या टाळ्या मिळवून देणारे मुद्देसूद सूत्रसंचालन sutrasanchalan marathi anchoring 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सांस्कृतिक कार्यक्रम जबरदस्त सूत्रसंचालन | हमखास श्रोत्यांच्या टाळ्या मिळवून देणारे मुद्देसूद सूत्रसंचालन sutrasanchalan marathi anchoring 

➡️शब्दसुमनांनी स्वागत

➡️दीपप्रज्वलन / प्रतिमापूजन

➡️इशस्तवन

➡️स्वागतगीत

➡️प्रास्ताविक

➡️सत्कार -सन्मान

➡️मनोगत / अध्यक्षीय मनोगत

➡️ आभार प्रदर्शन

🎇शब्दसुमनांनी स्वागत

स्वागतम स्वागतम् सु-स्वागतम्

दिग्गजांच्या कलागुणांनी नटलेल्या या प्रसन्न सभामंडपामध्ये बसलेल्या सर्व क्षेत्रातील मान्यवरांचं सहर्ष स्वागत…

आज या मंगलमय वातावरणात आपण सर्वजण उपस्थित राहिलात, आपणा सर्वांची उपस्थिती हे एक मांगल्याचं प्रतीक आहे..

स्वागत चारोळी

हा क्षण सोन्याचा..! हा क्षण अमृताचा..!! हा क्षण कौस्तुभाचा..!!!

हा सोहळा आनंदाचा..! हा सोहळा पवित्र्याचा..!! हा सोहळा मांगल्याचा..!!

🎇दीपप्रज्वलन / प्रतिमापूजन

प्रत्येक कार्यक्रमाचं तेज उजळून टाकणारी ज्योत –सस्कृताची

निरपेक्ष वृत्तीने अखंड तेवत राहणारी ज्योत – प्रेमाची

स्वतः जळून दुसऱ्याला प्रकाश देणारी ज्योत- त्यागाची

अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाच तेज पसरवणारी ज्योत-प्रकाशाची

निराशेच्या मनात आशेचा किरण पोहचवणारी ज्योत – प्रेरणेची

1.दीपप्रज्वलन चारोळी

मावळलीस कधी जर तू, विनाश इथला निश्चित आहे..!

ब्रम्हांडाला उजळवणारी तू, परमेश्वराचं रूप आहे…!!

2.दीपप्रज्वलन चारोळी

ज्योत स्नेहाची अन् त्यागाची आज प्रज्वलित करूया…!

तिच्याच उजेडात उभे राहून, अंधकार अज्ञानाचा दूर करूया..!!

3.दीपप्रज्वलन चारोळी

भितो प्रत्येक क्षेत्रातील अंधार, तुलाच फक्त या जगती ..!

तुझ्या तेजातूनच दिसतात, झाकलेले माणिक – मोती ..!!

🎇इशस्तवन 

भक्तांच्या हाकेला ओ देणारा, प्रयत्नांना साथ देणारा ईश्वर…!

अधर्माचा नाश करणारा सत्याचा विजय करणारा ईश्वर…!!

1.इशस्तवन चारोळी

करतो प्रार्थना तुझं ईश्वरा, दे सर्वांना शक्ती अन् बुद्धी…!

गुणगान तुझं गाण्या आम्हां, मिळत राहो अशीच सद्बुद्धी…!!

2.इशस्तवन चारोळी

करतो प्रार्थना तुझं ईश्वरा, दे सर्वांना शक्ती अन् बुद्धी…!

गुणगान तुझं गाण्या आम्हां, मिळत राहो अशीच सद्बुद्धी…!!

3.इशस्तवन चारोळी

दया, क्षमा, शांती धरतीवर असते जिथे..!

ईश्वराचे स्थान, नेहमी असते तिथे…!

🎇स्वागतगीत

मंच आतुरला आज तेजस व्यक्तिमत्त्व पाहण्यासाठी..! मंच आसुसला आज कर्तृत्वाच्या स्पर्शासाठी..! मंच सजला आज मनोभावे स्वागतासाठी…! मंच नटला आज आदरभावे सन्मानासाठी…!!

स्वागत गीत चारोळी

स्वागत करितो आम्ही आपुले शब्दसुमनांच्या या वर्षावाने…!

आनंदले वातावरण अवघे इथले, अतिथींच्या या आगमनाने…!!

स्वागत गीत चारोळी

स्वागताच्या तोरणांना फुले शब्दांची गुंफतो, तुमच्या सन्मानासाठी आम्ही सदा आतुरतो..!

आगमनाने तुमच्या हर्ष मनी दाटतो, तुमच्याच कौतुकासाठी कंठ आमचा वाहतो…!

🎇अतीथिंचे स्वागत

अतिथींचे स्वागत झाले आहे शब्दसुमनांतून….

तेजाळल्या आहेत सर्व दसदिशा दीपप्रज्वलनातून….

प्रफुल्लित झाले आहे हे वातावरण इशस्तवनातून ….

आनंदाने मोहरला आहे सभामंडप स्वागतगीतातून….

आता कार्यक्रमाचे स्वरूप जाणून घेऊया,

या प्रास्ताविकेतून….

🎇प्रास्ताविक

शब्दांनी काय ज्यांना बांधावं, भावनांनी काय त्यांना गुंफावं..!

उत्साही सळसळत चैतन्य त्यांचं आम्ही फक्त डोळे भरून पहावं…!

🎇सत्कार – सन्मान

हा सन्मान होतो आहे तुमचा…

हा सन्मान होतो आहे तुमच्या कुशल नेतृत्वाचा..

हा सन्मान होतो तुमच्या उत्तुंग कर्तृत्वाचा…

हा सन्मान होतो आहे तुमच्या निरपेक्ष दातृत्वाचा…

हा सन्मान होतो आहे एका असामान्य व्यक्तिमत्वाचा…

सत्कार – सन्मान चारोळी

शब्दांची सुंदर फुले आम्ही गुंफतो आहे…!

तुमच्या स्वागतासाठीच, आज आम्ही रमतो आहे…!!

सत्कार – सन्मान चारोळी

मंच हा आज आपुला, बघा कसा दातृत्वाने नटला..!

अतिथींच्या स्वागतासाठी आतुरलेला, तो स्वागतपुष्प घेऊन सजला..!

सत्कार – सन्मान चारोळी

चला साक्षीदार होऊया या अविस्मरणीय सोहळ्याचे..!

मनोभावे स्वागत करूया मंचावरील मान्यवरांचे…!

मनोगत/ भाषण

दातृत्वाचं तेज, वक्तृत्वाचं ओज ज्यांच्या व्यक्तिमत्वाची आगळीच चकाकी

सत्कार्याची ओढ, चांगुलपणाची जोड ज्यांच्या कार्याची वेगळीच लकाकी

चारोळी

तेजस व्यक्तिमत्त्व, उत्तुंग कर्तृत्व ज्यांच्या ठायी स्थित आहे….

सुसंस्कृत आचरण, निस्वार्थी समाजकारण ज्यांच्या जगण्याची रीत आहे…

चारोळी

स्वार्थाला जिथं काळजात थारा नसतो, तिथं फक्त निर्व्याज सहकार्याचा पहारा असतो..

मनात उत्साहाने भरलेला वारा असतो, जिथल्या आग्रहात नम्रतेचा दरारा असतो..

🎇अध्यक्षीय मनोगत

कुशल नेतृत्वाची पालखी समर्थपणे पेलणारे…

कर्तृत्वाच्या आसमंतात गरुडझेप घेणारे…

दातृत्वाच्या मंदिरातील कळसावर विराजमान असणारे…

रखरखत्या निखाऱ्यावर चालूनही निष्ठेचे दिव्यत्व सिद्ध करणारे…

कला – क्रीडा – साहित्य – विज्ञान या सर्व क्षेत्रात बहुआयामीत्व जोपासणारे..

चारोळी

सागरानेही जिथली खोली न्याहाळावी अन् आकाशानेही जिथली अथांगता टिपावी..

अशा तेजस व्यक्तिमत्वाची प्रेरणा, सदा काळजात घर करून राहावी..!!

चारोळी

उत्तुंग तुमच्या कर्तृत्वापुढे, उंची हिमालयाचीही खुजी वाटते..!

अथांग सागरासम मन तुमचे, दातृत्वाच्या मंदिरावरील कळस वाटते..

चारोळी

उत्तुंग कर्तृत्वाचरणी, अमुचा सदा टेकतो माथा…!

छातीही फुगते अभिमानाने, गाता तुमच्या कर्तृत्वाच्या गाथा…

🎇आभार प्रदर्शन 

मनस्वी आभार…….

ज्यांनी विनंतीचे शब्द झेलले..

ज्यांनी उपस्थितीची मोहोर उमटवली…

ज्यांनी मार्गदर्शनाची झालर जोडली..

ज्यांनी सन्मानाची शाल पांघरली…

चारोळी

प्रास्ताविकाने आकृती रेखाटली मनोगतांनी रंग भरला.!

सन्मान कर्तृत्वाचा झाला, आता आभारभाव मनी दाटला..!

चारोळी

सुरुवात केली स्वागताने, स्वागत झाले आदरभावांनी

मनोगतांचा सुगंध पसरवणाऱ्यांचे आभार मानतो शब्दसुमानांनी..!!

चारोळी

कार्यक्रमाच्या कोऱ्या पाटीवर, आपण मार्गदर्शनाचे शब्द उमटवले..!

तुमच्या आगमनाने या मंडपी, आज प्रेरणेचे वारे वाहले…!!

Leave a Comment