सूत्रसंचालन | निरोप समारंभासाठी प्रभावी मराठी चारोळ्या sutrasanchalan nirop charolya 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सूत्रसंचालन | निरोप समारंभासाठी प्रभावी मराठी चारोळ्या sutrasanchalan nirop charolya 

” निरोप म्हणजे शेवट नसतो…

हा तर एक आरंभ आहे

नच्या ध्येयाचा.. नवस्वप्नांचा

हा तर खरा प्रारंभ आहे ”

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

आपले विचार राहतील मनात

दरवळत सुगंधा सारखे

निरोपही असा तुमचा

न वाटे निरोपा सारखे…..

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

निरोपाच्या क्षणी झाली घालमेल

आसवांची ओल लोचनात

नाही ठावे आता पुन्हा कधी भेट

आठ्यांची दाटी काळजात

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

चहू दिशांनी येऊन येथे ओड लावूनी जाता

नाते आपले असे परके कधी न होता

उर्मी यशाची अखंड मनात भरुनी राहो

निरोप समयी हीच सदिच्छा यशवंत हो …. जयवंत हो

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कृतार्थ झाले जीवन तुमचे कळ्यांची फुले करताना

गंधीत झाले समाजजीवन ओंजळीत ती भरताना

कर्तृत्वाचा ठेवा ठेवून सोडून आज जाताना

भरून आले हृदय आमचे निरोप तुम्हा देताना

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

निरोपाचा दिवस आला मनी हुरहूर दाटली…

आज पर्यंतची साथ-संगत काळजात साठली….

गतकाळातील स्मृती शोधत मन धावू लागले….

शब्द झाले मुके सारे अश्रू वाहू लागले….

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

शरीराने दूर गेला तरी मनाने दूर जाऊ नका….

ओळखीच्या वाटेवरती अनोळखी होऊ नका….

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

हृदयाचे बंध जोडले दूर जाण्याने तुटणार नाही…..

आठवणींचे पान मनातील मिटवले तरी मिटणार नाही…..

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

इतक्या वर्षांची साथ-संगत… उद्यापासून असणार नाही

तुमचा प्रेमळ हसरा चेहरा उद्या इथे दिसणार नाही…

मनामध्ये एकच आस निरोप देताना तुम्हाला…

नवी नाती जोडताना विसरू नका आम्हाला…

 

Related posts:

Leave a Comment