शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – २०२५ प्रसिध्दी निवेदन tait exam 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – २०२५ प्रसिध्दी निवेदन tait exam 

शासन शुद्धीपत्रक क्रमांक संकीर्ण-२०२२/प्र.क्र.१०६/टिएनटि-१, दिनांक ०२/०५/२०२५ अन्वये तसेच या कार्यालयाचे प्रसिद्धी निवेदन दिनांक ०३/०५/२०२५ अन्वये उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता त्याचवेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सदर व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल १ महिना कालावधीत सादर करणे अनिवार्य आहे. विहित मुदतीत गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र उमेदवाराने सादर केल्यानंतर त्यांचा निकाल स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल असे कळविण्यात आले होते.

तरी उपरोक्त प्रमाणे उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता त्याचवेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल १ महिना कालावधीत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या कार्यालयास ईमेलद्वारे / पोस्टाद्वारे / हस्तपोच सादर करतांना “शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा 2025 परीक्षेचा नोंदणी क्रमांक व बैठक क्रमांक नमूद करावा किंवा https://www.mscepune.in/dtedola/TAIT2025InfoAppear.aspx या लिंकमध्ये माहिती भरून विहित मुदतीत सादर करावी. जेणे करून “शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा 2025 मध्ये प्राप्त केलेल्या गुणांनुसार त्यांचे गुणपत्रक (SCORE CARD) देण्यात येईल.

सबब विहीत मुदतीत गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल १ महिना कालावधीत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या कार्यालयास ईमेलद्वारे / पोस्टाद्वारे / हस्तपोच किवा https://www.mscepune.in/dtedola/TAIT2025InfoAppear.aspx या लिकद्वारे विहित मुदतीत माहिती सादर न केल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवारांची राहिल. तद्नंतर याबाबत आलेल्या कोणत्याही प्रकारच्या विनंती अर्जाचा विचार केला जाणार नाही. याची सर्व उमेदवारांनी / विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी

Related posts:

Leave a Comment