शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा – २०२५ प्रसिध्दी निवेदन tait exam 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा – २०२५ प्रसिध्दी निवेदन tait exam 

प्रसिध्दी निवेदन

महाराष्ट्र शासनाच्या पत्र क्रमांक संकीर्ण २०२५/प्र.क्र.९२/टिएनटी-१, दि.२८/०२/२०२५ व मा. आयुक्त (शिक्षण), यांचे जा.क्र. आस्था-क/प्राथ १०६/टेट-३/वेप/२०२५/११९१, दि. १९/०३/२०२५ राजीच्या पत्रान्वये तसेच सदर परीक्षा शासन निर्णय सामान्य प्रशासन प्रानिमं १२२२/प्र.क्र.५४/का. १३-अ, दिनांक २९ नोव्हेंबर २०२२ नुसार शासनाने नेमलेल्या IBPS या संस्थेमार्फत “शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमता चाचणी (TAIT) परीक्षा २०२५” चे आयोजन ऑनलाईन पध्दतीने दिनांक २७/०५/२०२५ ते ३०/०५/२०२५ व दिनांक ०२/०६/२०२५ ते ०५/०६/२०२५ या कालावधीत राज्यातील २६ जिल्हयांमध्ये एकूण ६० परीक्षा केंद्रांवर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने ८ दिवसामध्ये प्रतिदिन तीन सत्रात करण्यात आले होते. सदर परीक्षेस एकूण २२८८०८ परीक्षार्थी । उमेदवारांनी नोंदणी केली होती त्यापैकी परीक्षेस एकूण २११३०८ प्रविष्ठ झाले होते.

सदर परीक्षेचा निकाल दि. १८/०८/२०२५ रोजी प्रसिध्द करण्यात आला होता. तद्नंतर बी.एड. परीक्षेचे व डी.एल.एड. परीक्षेचे Appear म्हणून ज्या विद्यार्थी उमे‌द्वारांनी ऑनलाईन आवेदनपत्र भरले होते. त्या विदयार्थी/उमे‌द्वारांना शासन शुध्दीपत्रक क्रमांक संकीर्ण-२०२२/प्र.क्र.१०६/टिएनटि-१, दिनांक ०२/०५/२०२५ अन्वये उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता त्याचवेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सदर व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल १ महिना कालावधीत सादर करणे अनिवार्य होते.

त्यानुसार या कार्यालयाचे प्रसिध्दी निवेदन दि. ०९/०९/२०२५ अन्वये ज्या विदयार्थी उमे‌द्वारांनी व्यावसायिक अर्हता त्याचवेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र व्यावसायिक परीक्षा उतीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल १ महिना कालावधीत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या कार्यालयास सादर करणेबाबत दि. १५/०९/२०२५ पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती. तद्नंतरही ज्या विदयार्थी/उमे‌द्वारांनी उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र या कार्यालयास सादर केले नाही अशा २५३७विदयार्थी/उमेद्वारांना दि. २०/०९/२०२५ रोजी SMS द्वारे उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र सादर करणेसाठी दि. २५/०९/२०२५ पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती.

तरी २५३७ विदयार्थी/उमे‌द्वारांना पैकी २२०७ विदयार्थी उमेद्वारांनी उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र दि. २५/०९/२०२५ पर्यंत सादर न केल्याने निकाल राखीव ठेवण्यात आलेल्या २२०७विदयार्थी/उमेद्वारांचा निकाल रद्द करण्यात येत आहे. सदर विदयार्थी/उमे‌द्वारांची यादी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर प्रसिध्द केली आहे. तथापि याबाबतीत आलेल्या कोणत्याही प्रकारच्या विनंतीचा विचार सद्यःस्थितीत केला जाणार नाही.

Related posts:

Leave a Comment