थकीत वेतन देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करणेबाबत. सन २०२५-२६ मुदतवाढ thakit vetan deyak
संदर्भ- १) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण २४१५/ (३४/१५)/अर्थसंकल्प, दिनांक १५/७/२०१७,
२) शिक्षण आयुक्तालयाचे पत्र क्र. अंदाज-२०१/थकीत येतम/२०२१/३०७० दिनांक ४/८/२०२९
३) दिनांक ६/६/२०२४ रोजीच्या बैठकीमध्ये दिलेले निर्देश.
४) दिनांक ३/९/२०२४ रोजीच्या बैठकीमध्ये दिलेले निर्देश,
५) संचालनालयाचे परिपत्रक क्र. शिसंमा/२०२४/टि-७/शालार्थ/थकीत/ऑनलाईन/५०४७
दिनांक-११/९/२०२४.
६) संचालनालयाचे परिपत्रक क्र. प्राशिसं/अंदाज-२०३/बकीतशाओं/२०२४/६०९४
दिनांक-१२/९/२०२४.
७) संचालनालयाचे परिपत्रक क्र. शिसंमा/२०२५/टि-७/थकीत/ऑनलाईन /०५३६९
दिनांक-१९/११/२०२५,
८) प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे परिपत्रक क्र. प्रशिस/अंदाज २०३/थकीत/ऑनलाईन/
१६४२३६७ दिनांक-०२/०१/२०२६.
सन २०२४-२५ पासून शासन निर्णय दिनांक १५/७/२०१७ मधील आदेशानुसार थकीत देयके ऑनलाईन शालार्थ प्रणालीमध्ये सादर करण्याबाचत शासनाचे निर्देश आहेत. यासंदर्भात विस्तृत सूचना संदर्भ क्र. ५ व ६ अन्वये देण्यात आलेल्या आहेत. तसेच संदर्भ क्र. ७ अन्वये सन २०२५-२६ मध्ये थकीत देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करण्यासाठी सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत.
संदर्भ क. ८ अन्वये सन २०२५-२६ मध्ये थकीत देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यासाठी डिडिजो? (मुख्याध्यापक) शाळा स्तर यांना दिनांक १०/०१/२०२६ पर्यंत मुदत देण्यात आलेली होती.
दिनांक २०/०१/२०२६ रोजीच्या थकित देयकांबाबत ऑनलाईन माहीती नुसार प्रत्येक जिल्हानिहाय चकित देयके प्रलंबित असल्याचा तपशील या पत्रासोबत जोडलेला आहे, त्यानुसार आपल्या स्तरावरुन धकीत देयके (नियमित व न्यायालयीन प्रकरणे) (केवळ १ ते ६ वर्ष व ६ वर्षापेक्षा जास्त कालावधीचे) आपण दिनांक ०२/०२/२०२६ पर्यंत जशी जशी आपलेस्तरावरुन पडताळणी होईल तसे पुढे ऑनलाईन पध्दतीने पाठविण्यात यावेत.
प्रस्तावासोबत तपासणीसूचीनुसार सर्व आवश्यक कागदपत्रांची काटेकोरपणे तपासणी करून ऑनलाईन फारवर्ड करावा तसेच ऑफलाईन पध्दतीने प्रस्ताव २ प्रतीमध्ये संचालनालयास सादर करावा.
त्यानंतर मन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी थकीत देयके मान्यतेसाठी स्विकृत केली जाणार नाहीत. विलंबामुळे देयके आदा होणेस अडचण निर्माण झालेस त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील.
तसेच शासनास सादर करण्यात येणारी सहा वर्षावरील कालावधीने थकीत देयकाचा प्रस्ताव विवरणपत्र-३ मध्ये ऑनलाईन सादर करावे. प्रत्त्तावासोबत तपासणीसूचीनुसार सर्व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करुन ऑनलाईन फारवर्ड करावा आणि ऑफलाईन पध्दतीने प्रस्ताव २ प्रतीमध्ये संचालनालयास सादर करावा.
वर नमूद कालमर्यादा तंतोतंत पाळली जाईल याची दक्षता घ्यावी. सन २०२५-२६ मधील शालार्थ प्रणालीमधील
बकीत देयकासंदर्भात केलेल्या सुधारित सुविधांच्या सविस्तर माहितीसाठी शालार्थमध्ये (User Manual) पहावे,
परिपत्रक येथे पहा pdf download
सोबत थकित देयकांचा जिल्हानिहाय तक्ता.










