सन २००० पूर्वीची नियुक्ती असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यास तिसरे अपत्य असल्यास लहान कुटुंबाची अट शिथिल करुन त्यांना शासन सेवेत कायम ठेवावे किंवा कसे याबाबत tin apatya at shithil 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सन २००० पूर्वीची नियुक्ती असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यास तिसरे अपत्य असल्यास लहान कुटुंबाची अट शिथिल करुन त्यांना शासन सेवेत कायम ठेवावे किंवा कसे याबाबत tin apatya at shithil 

संदर्भ:- १.सा.प्र.वि. अधिसूचना क्र. एसआरव्ही-२०००/प्र.क्र. (१७/२०००)/बारा, दि. २८ मार्च, २००५

२. सा.प्र.वि. परिपत्रक क्र. एसआरव्ही-२०००/प्र.क्र.(१७/२०००)/१२, दि. १ जुलै, २००५

३. आपले पत्र क्र. जिपगो/साप्रवि/पंचा/का-२१/९०४/२२,दि. १०.६.२०२२

महोदय,

आपल्या संदर्भाधीन क्र. ३ येथील पत्रानुसार श्री. एम. एस. खुणे, विस्तार अधिकारी (पंचायत) य श्री. वाय.डी. पुंडे, ग्रामसेवक यांना सन २००५ नंतर तिसरे अपत्य असल्यामुळे तथापि, त्याची नियुक्ती सन २००० पूर्वीची असल्यामुळे त्यांना सेवेत कायम ठेवावे किंवा कसे याबाबत शासनाचे अभिप्राय मागितले आहेत. सदर प्रकरणी सामान्य प्रशासन विभागाचे अभिप्राय घेतले आहेत. त्यानुसार त्या विभागाचे पुढील प्रमाणे अभिप्राय दिले आहेत.

“दि. २८.०४.२००५ बी अधिसूचना स्वंयस्पष्ट असून अधिसूचनेतील मुद्दा क्र.५ नुसार ज्या अधिकारी/कर्मचाऱ्याची निवड हे नियम अंमलात येण्याच्या दिनांकापूर्वीच झाली असेल त्यांच्याबाबतीत हे नियम लागू नाहीत.”

२. श्री. एम. एस. खुणे, विस्तार अधिकारी (पंचायत) व श्री. वाय.डी. पुंडे, ग्रामसेवक यांची नियुक्ती सन २००० पूर्वीची असून उपपरोक्त अधिसूचना लागू होण्यापूर्वीची आहे. तरी सामान्य प्रशासन विभागाचे उपरोक्त अभिप्राय पाहता श्री. एम.एस. खुणे, विस्तार अधिकारी (पंचायत) व श्री. वाय.डी. पुंडे, ग्रामसेवक यांना सेवेतून काढता येणार नाही.

Related posts:

Leave a Comment