सन २०२५-२६ यु-डायस प्लस प्रणालीमध्ये शाळा, विद्यार्थी व शिक्षकांची अंतिम माहितीचे प्रमाणपत्र आपल्या स्वाक्षरीने पाठविण्याबाबत udise plus pranali update
संदर्भ:
१) या कार्यालयाचे जा.क्र.मप्राशिप/सशि/यु-डायस/संगणक/२०२५-२६/
२९२३ दि. २६ सप्टेंबर, २०२५ रोजीचे पत्र.
२) केंद्र शासनाचे D.O.२३-२/२०२५-Stats (Part २) दि. १८/११/२०२५.
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने संदर्भिय पत्र क्र. १ व २ नुसार केंद्र शासनाकडून जिल्ह्यातील सर्व माध्यम व व्यवस्थापनांच्या इयत्ता पूर्व प्राथमिक ते इयत्ता १२वी पर्यंत शिक्षण देणाऱ्या सर्व शाळांची सविस्तर माहिती शाळास्तरावरून यु-डायस प्लस https://udiseplus.gov.in/ प्रणालीमध्ये दि. ३० सप्टेंबर, २०२५ पर्यंत अंतिम करण्यासाठी कळविण्यात आले आहे. परंतु, माहिती पूर्ण झालेली नसल्याने केंद्र शासनाकडून दि. ३० नोव्हेंबर, २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
यु-डायस प्लस प्रणालीमधील माहिती केंद्र शासनाकडे सादर करतांना पुढील बाबींची माहिती तपासून सादर करण्यात यावी.
शाळांमध्ये भौतिक सुविधांची (यामध्ये प्रामुख्याने शाळांमध्ये इमारत, वर्गखोली, मुला व मुलींकरिता स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सुविधा, किचन शेड, रॅम्प, क्रिडांगण, संरक्षक भिंत, संगकीय साहित्य, प्रयोगशाळा) वस्तुनिष्ट माहिती असल्याची खात्री करणे,
केंद्र शासनाचे मार्गदर्शक सूचनांनुसार विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडेशन, अपार आयडी पूर्ण झाले असल्याची खात्री करणे.
ड्रॉपबॉक्स मधील विद्याथ्यर्थ्यांने ज्या शाळेमध्ये प्रवेश घेतला असेल, त्या शाळेच्या मुख्याध्यापकांना Import करून घेण्यासाठी कळविण्यात यावे, विद्यार्थी अन्य ठिकाणी शिक्षण घेत असेल /IT। साठी प्रवेश घेतला असेल/ड्रॉपआऊट झाला असेल याप्रमाणे अभिप्राय यु-डायस प्लस प्रणालीमध्ये नोंदविण्यात यावे.
जिल्ह्यांमध्ये दुबार नोंदणी झालेली असल्यास अशा विद्यार्थ्यांचा शोध घेवून त्या विद्यार्थ्यांना Inactive करण्यासाठी कळविण्यात यावे.
Release Requset – विद्यार्थ्याने राज्यातील दुसऱ्या जिल्ह्यातील शाळेत / इतर राज्यामधील शाळेत प्रवेश घेत असल्यास त्या शाळेचे मुख्याध्यापक ऑनलाईन पध्दतीने यु-डायस प्लस प्रणालीत संबंधित शाळेला Request पाठवित असतात, अशा विद्यार्थ्यांची तात्काळ माहिती घेवून Request Approve करावे. केंद्र शासनाकडून इतर राज्यामध्ये प्रवेशित झालेले आहेत परंतू, अद्यापपर्यंत Request Approve केलेली नसलेल्या विद्यार्थ्यांची माहिती उपलब्ध करून दिलेली आहे, ती माहिती तपासणीसाठी सोबत उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच सदरची माहिती जिल्हा व तालुका लॉगिनमध्ये केंद्र शासनाने उपलब्ध करून दिली आहे.
यु-डायस प्लस प्रणालीमधील दि. २७ नोव्हेंबर, २०२५ रोजीच्या अहवालानुसार विद्यार्थ्यांची माहिती अर्धवट भरली असल्याचे दिसून आले आहे. तरी तात्काळ माहिती पूर्ण भरण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांना कळविण्यात यावे.
यु-डायस प्लस प्रणालीमध्ये शिक्षकांची सविस्तर माहिती (व्यावसायिक, शैक्षणिक, प्रशिक्षण, संवर्ग, संगणक ज्ञान इ.) अचूक असणे आवश्यक आहे.
सन २०२५-२६ या वर्षापासून यु-डायस प्लस प्रणालीमधील सर्व माहिती शासकीय योजनांच्या अंमलबजावणीसाठी व इतर शासकीय संकेत स्थळांवरती ऑनलाईन पध्दतीने जोडण्यात आली आहे. त्या अनुषंगाने यु-डायस प्लस प्रणालीमध्ये नोंदविण्यात आलेली माहिती अचूक तपासून सदर माहितीचे प्रमाणपत्र आपल्या स्वाक्षरीने दि. ३० नोव्हेंबर, २०२५ पर्यंत अपलोड करण्यासाठी संबंधितांना आपल्या स्तरावरून आदेशित करावे.










