वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी पात्रता दिनांक निश्चितीबाबत मार्गदर्शन मागविण्याबाबत varishtha vetan nivadshreni
संदर्भः-१. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद, चंद्रपूर यांचे पत्र क्र.२३८/दि.२२/७/२०२५
२. आपले कार्यालयीन पत्र क्र राशैसंप्रपम/सेवापूर्व शिक्षण (SBTE) २०२४-२५/०२३६७/दि.११/४/२०२५
उपरोक्त विषयाबाबतच्या संदर्भीय पत्रान्वये आपण सदर प्रकरणाची वस्तुस्थिती नमूद करून याबाबत मार्गर्शन होणेबाबत संचानालयास विनंती केलेली आहे.
आपल्या संदर्भीय पत्राच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, सदर प्रकरणी शालेय शिक्षण व क्रिडा विभागाचा शासन निर्णय क्र. शिप्रधो २०१९/प्र.क्र. ४३/प्रशिक्षण / दिनांक: २० जुलै, २०२१ मध्ये स्पष्ट तरतुदी नमूद करण्यात आलेल्या असून त्यानुसार यथानियम कार्यवाही करण्यात यावी.











