इयत्ता 7 वी विषय मराठी वर्णनात्मक नोंदी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन varnanatmak nondi iyatta satavi vishay marathi
इयत्ता सातवी विषय मराठी वर्णनात्मक नोंदी खालील प्रमाणे
➡ मजकूर लक्षपूर्वक ऐकतो व अचूक लिहितो.
➡ दिलेले चित्र पाहून योग्य भाषा शैलीत वर्णन करतो.
➡ कवितागीत गायन सुंदर चालीत करतो
➡ सुचवलेल्या कवितेचे कृतियुक्त सादरीकरण करतो.
➡ शिक्षकानी सुचवलेल्या प्रसंगाचे सादरीकरण करतो.
➡ दिलेल्या सूचना ऐकून कृती करतो.
➡ पत्रलेखनाचे नियम जाणून लेखन करतो.
➡ दिलेल्या विषयावर समर्पकपणे बोलतो.
➡️शिक्षकानी सुचवलेल्या विषयाला अनुसरून नाट्यीकरण करतो.
➡ आपले विचार आत्मविश्वास पूर्वक मांडतो.
➡ सुचवलेला मजकूर पाहून सुंदर अक्षरात निहितो.
➡ एखाद्या सुचवलेल्या मुद्द्यांच्या आधारे कथा तयार करतो.
➡ इतरांचे मत लक्षपूर्वक ऐकतो.
➡ भाषेच्या वापरत व्याकरणाचा उपयोग करतो.
➡ चित्र पाहून प्रश्न तयार करतो व लिहितो.
➡ संवादाने अभिनयासह सादरीकरण करतो.
➡ विषयानुसार वर्णनात्मक निबंध सुंदर लेखन करतो.
➡ सुचवलेल्या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द सांगतो.
➡ चित्र पाहून अनुरूप प्रश्न तयार करतो.
➡ प्रकल्प सुंदररीत्या सादर करतो.
➡ प्रकल्पसाठी साहित्य जमा करतो.
➡ दिलेली चाचणी सुंदर रित्या लिहितो.
➡ विषय दिल्यावर कथा तयार करून सांगतो.
➡ चाचणी वेळेत अचुक स्वच्छ प्रकारे लिहितो.
➡ चित्रे पाहून योग्य भाषा शैलीत वर्णन करतो.
➡ चाचणीतील उत्तरे स्वतःच्या भाषेत लिहितो.
➡ मजकूर पाहून सुंदर अक्षरात लिहितो.
➡ कविता तालासुरात सादर करतो.
➡️कवितेच्या ओळी ऐकतो व संपूर्ण कविता म्हणतो.
➡ सुचवलेल्या शब्दासाठी समानार्थी शब्द सांगतो.
➡ शालेय उपक्रमात सतत सहभागी असतो.
➡ वाचन स्पर्धेत सहभाग होतो
➡ वाचन न अडखळता करतो,
➡ स्वतः चे विचार, अनुभव, भावना व्यक्त करतो.
➡ बोलताना शब्दाचा स्पष्टपणे उच्चार करतो.
➡ लेखनाती गती उत्तम ठेवून लेखन करतो.
➡ लेखन शुद्धतेवर अधिक भर देतो.
➡ बोलताना निर्भीडपणे बोलतो.
➡ प्रभावीपणे प्रकट वाचन करतो.
➡ वर्गात नियमित फलख-लेखन करतो.
➡ दिलेल्या उतार्याचे वाचन समजपूर्वक करतो.
➡ बोलताना आत्मविश्वासपूर्वक बोजतो.
➡ | दिलेल्या विषयावर मुद्देमूद बोलतो
➡ प्रश्रांची उत्तरे पूर्ण वाक्यात देतो.
➡ प्रश्रांची उत्तरे अचूक लिहितो.
➡️एकाग्रतेने व समजपूर्वक वाचन करतो
➡ योग्य गतीने व आरोह-अवरोहाने वाचन करतो.
➡ । विविध विषयावरील संवादात भाग घेतो
➡ व्याकरणाचे नियम लक्षात घेवून लेखन करतो.
➡ प्रश्नांची उत्तरे पूर्ण वाक्यात लिहितो.
➡ दिलेल्या वाक्यावरून कथा लिहितो.
➡ कविता साभिनय सादर करतो.
➡ दिलेल्या शब्दावरून कथा लिहितो.
➡ नाट्याभिनय करतो.
➡स्वतः छोट्या छोट्या कविता तयार करतो.
➡ नाटयातील संवाद ते अडखळता सादर करतो.
➡ बोलताना शब्द व वाक्य अचूक व समर्पक वापरतो.
➡ व्याकरणानुसार भाषेचा वापर करतो.
➡ जेष्ठ व्यक्तिशी बोलताना नम्रतेने बोलतो.
➡ उदाहरणे पटवून देताना म्हणींचा वापर करतो.
➡ प्रश्नांची अगदी योग्य व व्यवस्थित उत्तरे देतो.
➡ बोलताना नवीन शब्दांचा वापर करून बोलतो.
➡ सुचवलेले वर्णन अचूक व प्रमाण भाषेत लिहितो.
➡ भाषण करताना अगदी सहजपणे बोलतो.
➡ स्वतः लहान कथा तयार करतो.
➡ बोलताना योग्य वयाप्रमाणे संबोधन वापरतो
➡ स्वतःचे अनुभव स्व भाषेत सांगतो.
➡ बोलण्याची भाषा, लाघवी व सुंदर आहे.
➡ बोलण्याच्या सुंदर शैली प्रभाव पाडतो.
➡ प्रश्नांची योग्य समर्पक उतरे देतो
➡ बोलताना धीटपणे व नैसर्गिकपणे बोलतो.
➡ संवाद साधण्याचे कौशल्य उत्तम आहे.
अडथळ्याच्या नोंदी
➡️पाठ्य घटकाचे प्रकट वाचन करता येत नाही.
➡️सूचनेप्रमाणे पाठ्यांशाचे लेखन करत नाही.
➡️सूचनेप्रमाणे कविता तालासुरात गायन करत नाही.
➡️अभ्यास वर्गकार्य दिलेल्या वेळात पूर्ण करत नाही.
➡️शाळेतील व वर्गातील विविध उपक्रमात भाग घेत नाही.
➡️मोठ्यांशी बोलताना नम्रतेने बोलत नाही.
➡️उदाहरणे पटवून देताना म्हणींचा वापर करत नाही.
➡️प्रश्नांची अगदी योग्य व व्यवस्थित उत्तरे देत नाही.
➡️बोलताना नवीन शब्दांचा वापर करून बोलतो.
➡️सुचवलेले वर्णन अचूक व प्रमाण भाषेत लिहित नाही.
➡️सहशालेय उपक्रमात नेहमी सहभाग घेत नाही.
➡️विषया अनुषंगाने प्रश्न तयार करता येत नाहित.
➡️सुचवलेल्या कडव्याचे अर्थ स्पष्ट करत नाही.
➡️विषया अनुषंगाने नाट्यीकरण करत नाही
➡️निबंध लिहिताना आकलन शक्तीचा वापर करत नाही.
➡️प्रश्नांची योग्य, समर्पक उत्तरे देत नाही.
➡️बोलण्याच्या सुंदर शैली प्रभाव पाडत नाही.
➡️स्वतःच्या कथा सुंदररित्या सांगत नाही.
➡️बोलताना धीटपणे व नैसर्गिकपणे बोलत नाही.
➡️परिपाठाला कथा सुंदररित्या सांगता येत नाहीत.
➡️भाषण करताना अगदी सहजपणे बोलत नाही.
➡️स्वतः छोट्या छोट्या कथा तयार करत नाही
➡️बोलताना अयोग्य वयाप्रमाणे संबोधन करतो.
➡️स्वतःचे अनुभव अश्रवणीय भाषेत सांगतो.
➡️स्वताच्या गरजा अयोग्य भाषेत सांगतो.
➡️संवाद, कथा, गाणे, मजकूर लक्षपूर्वक ऐकत नाही.
➡️कवितेच्या ओळी ऐकतो व लगेचच विसरतो.
➡️प्रश्नांची उत्तरे स्वतःच्या भाषेत चूकीची देतो.
➡️सूचना लक्षपूर्वक ऐकतो पण पालन करत नाही.
➡️सुचवलेली कथा सादर करता येत नाही.










