वीर गाथा ५.० प्रकल्प राबविणेबाबत veer gatha prakalp shasan paripatrak
संदर्भ : Hon. Joint Secretary, Government of India, Ministry of Education, Department Of School Education and Literacy, Shastri Bhawan, New Delhi Date: 01/09/2025
उपरोक्त संदर्भीय विषयानुसार संरक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांचेमार्फत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये वीर गाथा ५.० हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. शौर्य पुरस्कार विजेते व प्राचीन भारतीय योद्ध्यांच्या प्रेरणादायी कथांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना तसेच नागरी जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
Gallantry Awards Portal (GAP) अंतर्गत वीर गाथा प्रकल्पाची स्थापना सन २०२१ मध्ये करण्यात आली. देशातील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना शौर्य पुरस्कार विजेत्यांवर आधारित प्रकल्प/उपक्रम राबविण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येते. विद्यार्थ्यांना विविध माध्यमांतून (कला, कविता, निबंध, मल्टिमिडिया) प्रकल्प सादर करता येतात. सर्वोत्तम प्रकल्पांना संरक्षण मंत्रालय व शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांचे मार्फत राष्ट्रीय स्तरावर गौरविण्यात येते. हा उपक्रम दरवर्षी प्रजासत्ताक दिन सोहळ्याबरोबर साजरा करण्यात येतो.
मा. शिक्षण मंत्री, भारत सरकार यांनी प्रत्येक राज्य व केंद्रशासित प्रदेशातील प्रत्येक शाळेत “वीर गाथा कॉर्नर” स्थापन करण्याची शिफारस केली आहे. जेथे विद्यार्थ्यांचे कलागुणांचे प्रदर्शन करता येईल व त्यांना भविष्यात यशस्वी होण्यासाठी तयार करता येईल.
राज्यातील सर्व व्यवस्थानाच्या सर्व माध्यमांच्या शाळांमधील सहभागी विद्यार्थ्यांची MYGOV या पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. विद्यार्थी शौर्य पुरस्कार विजेत्यांवर आधारित कविता /परिच्छेद / चित्रकला (Painting) / रेखाटन (Drawing) / Multi-Media Presentation / Short
वीर गाथा प्रकल्प ५.० स्पर्धाच्या काही महत्वपूर्ण बाबी पुढीलप्रमाणे-
१. शाळांनी वीर गाथा प्रकल्प ५.० मधील कविता / परिच्छेद / चित्रकला (Painting) / रेखाटन (Drawing)/Multi-Media Presentation / Short Video (Anchoring/Storytelling/Reporting)
इ. सर्व प्रवेशिका नोंदणी MYGOV या पोर्टलवर अपलोड करण्यात यावी.
२. शाळा स्तरावरून MYGOV या पोर्टलवर अपलोड झालेल्या नोंदणी जिल्हा स्तरावर रुब्रीक्स मूल्यांकन Annexure । अवलोकन करून, मूल्यांकन करावे. वीर गाथा प्रकल्प ५.० साठी मूल्यमापनासाठी तीन स्तर असतील. त्यामध्ये जिल्हा स्तर, राज्य/केंद्र शासित प्रदेश स्तर आणि राष्ट्रीय स्तर प्रत्येक स्तरावर विजेते असतील. घोषित करण्यात येणाऱ्या विजेत्याची संख्या पुढील प्रमाणे असेलः
जिल्हास्तर – ०४ विजेते (प्रत्येक श्रेणीतील एक) यांची निवड जिल्हा स्तरावर करण्यात यावी. निवड झालेल्या विजेत्याचे नामनिर्देशन राज्य स्तरावर करण्यात यावे. (श्रेणी १ व २ मधून प्रत्येकी १ विजेता आणि श्रेणी ३ मधून २ विजेते यात इयत्ता ९ वी ते १० वी मधून १ विजेता व इयत्ता ११ वी १२ वी मधून १ विजेता)
राज्यस्तर – ०८ (प्रत्येक श्रेणीतील दोन) यांची निवड राज्य स्तरावर करण्यात येईल. निवड झालेल्या विजेत्याचे नामनिर्देशन राष्ट्रीय स्तरासाठी करण्यात येईल. (श्रेणी १ व २ मधून प्रत्येकी २ विजेते आणि श्रेणी ३ मधून ४ विजेते यात इयत्ता ९ वी ते १० वी मधून २ विजेते व इयत्ता ११ वी १२ वी मधून २ विजेते)
राष्ट्रीय स्तरावरील १०० विजेते (सुपर १००) असतील. त्यांची वर्गवारी पुढील प्रमाणेः
श्रेणी १ : इयत्ता ३ री ते ५ वी २५ विजेते
२५ विजेते श्रेणी २: इयत्ता ६ वी ते ८ वी =
श्रेणी ३: इयत्ता ९ वी ते १२ वी वी ते १२ वी मधून २५ विजेते) ५० विजेते (इ.९ वी ते १० वी मधून २५ विजेते व इ.११
३. विजेत्यांचा सत्कार – राष्ट्रीय स्तरावरील विजेत्यांचा संयुक्तपणे भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालय व संरक्षण मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने सत्कार केले जाणार आहेत.
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता ३ री ते
१२ वी पर्यत वीर गाथा ५.० प्रकल्प मधील स्पर्धा घेऊन संरक्षण मंत्रालयाच्या MYGOV या पोर्टलवर वीर गाथा ५.० स्पर्धेची माहिती पत्रात दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे भरण्यात यावी. तदनुषंगाने आपल्या स्तरावरून शाळा मुख्याध्यापक व शिक्षक यांना आदेशित करावे. पालक व शालेय व्यवस्थापन समिती यांना देखील अवगत करावे. या अनुषंगाने आपल्या स्तरावरून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.
सोबत – 1. VEER GATHA 5.0 CONCEPT NOTE.
2 DISTRICT NODAL OFFICER LIST.
Websites for References: The Following links can be referred by Schools:
i. ii. Website- www.gallantryawards.gov.in to know in detail about the brave-hearts.
NCERT book on Paramvir Chakra Awardees at the link: https://ncert.nic.in/pdf/publication/otherpublications/veergatha.pdf
(मूळ टिपणी मा. संचालक यांनी मान्य केलेली आहे.)










Good