विषय सहायक उसनवारी तत्वावर निवड झालेल्या विषय सहायक मंजूरी देणेबाबत vishay sahayak paripatrak
संदर्भ
:- 1) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. डायट 4516/(40/16) / प्रशिक्षण दि. 17/10/2016
2) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. आबंध/2017/प्र.क्र.41/17/प्रशा 5, दि.31/07/201
3) सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र. एसआरव्ही-2016/प्र.क्र.510/काया, 12 दिनांक, 16/02/2018
4) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. आबंध/2017/प्र.क्र.41/17/प्रशा 5, दि. 07/12/2018
5) शासनाचे पत्र क्र. प्रतिनि-2023/प्र.क्र.37/प्रशिक्षण, दि. 26/05/2025
6) शासनाचे पत्र क्र. प्रतिनि-2023/प्र.क्र.37/प्रशिक्षण, दि. 13/06/2025
7) शासनाचे पत्र क्र. प्रतिनि-2023/प्र.क्र.37/प्रशिक्षण, दि. 30/06/2025
8) शासनाचे पत्र क्र. प्रतिनि-2023/प्र.क्र 37/प्रशिक्षण, दि. 30/07/2025.
9) परिषदेचे पत्र क्र/राशैसंप्रपम/आस्था/प्रतिनियुक्ती/2025/1440591, दि. 22/09/2025.
10) मा. आयुक्त शिक्षण यांची दि.06.01.2025 रोजीची मान्य टिपणी.
उपरोक्त संदर्भाधीन विषयान्वये सादर करण्यात येते की, संदर्भ क्र. 5 मधील शासन पत्रान्वये राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे, प्रादेशिक विद्या प्राधिकरण व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (गडचिरोली वगळता) येथील विषय सहायक प्रतिनियुक्तीच्या भरतीस, संदर्भ क्र. 3 मधील शासन निर्णयातील तरतुदीनुसार तीन (03) वर्षांच्या कालावधीस मान्यता देण्यात आलेली आहे. तथापि, संदर्भ क्र. 8 मधील शासन पत्रान्वये विषय सहायकांचे वेतन मूळ आस्थापनेतून अदा होत असल्याने, प्रतिनियुक्तीऐवजी उसनवारी तत्त्वावर भरती करण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले होते.
त्या अनुषंगाने संदर्भ क्र. 9 मधील पत्रान्वये उसनवारी तत्त्वावर विषय सहायकांची निवड प्रक्रिया राबविण्याबाबत कळविण्यात आले होते. आपल्या स्तरावरून निवड झालेल्या विषय सहायकांची यादी परिषदेस प्राप्त झालेली असून, सदर यादीस मा. आयुक्त (शिक्षण) यांनी संदर्भ क्र. 10 नुसार मान्यता दिलेली आहे. त्यानुसार खाली नमूद अटी व शर्तीच्या अधीन राहून सदर विषय सहायकांना तीन (03) वर्षांच्या कालावधीस मंजुरी देण्यात येत आहे. अटी व शर्ती :-
1. सदर उसनवारीचा कालावधी शासन मान्यतेनुसार दि. 01/02/2026 ते 31/01/2029 किंवा नियुक्तीच्या दिनांकापासून तीन (03) वर्षे, यापैकी जो कालावधी लागू होईल तो राहील. सदर उसनवारीचा कालावधी संपल्यानंतर त्या पदावर पुढील सेवेबाबत कोणताही हक्क राहणार नाही. तसेच उसनवारी कालावधीमध्ये कोणताही उसनवारी भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
2. उसनवारी कालावधीमध्ये संबंधित विषय सहायकांचे कामकाज समाधानकारक नसल्यास अथवा संस्थेच्या हितास बाधा पोहोचेल असे कोणतेही गैरवर्तन आढळून आल्यास, त्यांची उसनवारी तात्काळ रद्द करण्यात येऊन त्यांना मूळ आस्थापनेवर रूजू व्हावे लागेल.
3. उसनवारीचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर संबंधित उसनवारी कार्यालयाने संबंधित विषय सहायकांना तात्काळ कार्यमुक्त करणे तसेच संबंधित विषय सहायकांनी त्यांच्या मूळ आस्थापनेवर तात्काळ रूजू होणे बंधनकारक राहील.
उसनवारी तत्त्वावर निवड झालेल्या विषय सहायकांची यादी खालीलप्रमाणे आहे:










