योग दिनाचे महत्व 21 जूनलाच योग दिन का साजरा करतात?आंतरराष्ट्रीय योग दिनाचा इतिहास yoga day yoga divas 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

योग दिनाचे महत्व 21 जूनलाच योग दिन का साजरा करतात?आंतरराष्ट्रीय योग दिनाचा इतिहास yoga day yoga divas 

भारताला प्राचीन काळापासून योगाची अमूल्य देणगी लाभली आहे. योग हे भारताचे एक अनमोल योगदान मानले जाते. भारताने संपूर्ण जगाला योगाची ओळख करून दिली असून आज जगभरात योगाचा प्रसार झालेला आहे. त्यामुळे योगाला जागतिक पातळीवर मान्यता मिळाली आहे.

लोकांमध्ये योगाचे महत्त्व वाढवण्यासाठी आणि त्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा केला जातो. २०१४ साली भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या सभेत हा प्रस्ताव मांडला होता. हा प्रस्ताव लगेच स्वीकारण्यात आला आणि २१ जून ही तारीख ‘योग दिन’ म्हणून निश्चित झाली.

तेव्हापासून दरवर्षी २१ जून रोजी हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षीही योग दिन उत्साहात साजरा होणार आहे. त्यानिमित्त आपण या वर्षीची योग दिनाची थीम काय आहे आणि योग दिनाचा इतिहास काय आहे ते जाणून घेऊया.

२१ जूनलाच योग दिन का?

२१ जून हा वर्षातील सगळ्यात मोठा दिवस असतो, ज्याला ‘ग्रीष्म संक्रांती’ म्हटले जाते. या दिवशी सूर्य सर्वाधिक काळ आकाशात असतो. हा दिवस उत्तर गोलार्धात विशेष मानला जातो. तसेच, हा दिवस अध्यात्म व साधनेसाठी महत्त्वाचा मानला जातो. म्हणूनच २१ जूनला योग दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला गेला.

यावर्षीची योग दिनाची थीम काय?

प्रत्येक वर्षी योग दिनासाठी एक विशिष्ट संकल्पना (थीम) दिली जाते. २०२५ मध्ये ‘स्वतःसाठी आणि समाजासाठी योग’ (Yoga For Self And Society) ही थीम निवडण्यात आली आहे. या अंतर्गत लोकांनी वैयक्तिक आरोग्य आणि सामाजिक भल्यासाठी योगाचा अवलंब करावा, असा संदेश दिला जातो.

आंतरराष्ट्रीय योग दिनाचा इतिहास

पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून २०१५ रोजी साजरा करण्यात आला. त्या दिवशी जगभरातील अनेक ठिकाणी लोकांनी एकत्र येऊन योगाभ्यास केला. भारतात दिल्लीच्या राजपथावर मोठा कार्यक्रम झाला आणि त्यात आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सहभाग घेतला.

२०१४ साली २७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघात योग दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. ११ डिसेंबर २०१४ रोजी हा प्रस्ताव एकमताने मंजूर झाला आणि त्यानंतर दरवर्षी २१ जून रोजी ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा होऊ लागला.

Related posts:

1 thought on “योग दिनाचे महत्व 21 जूनलाच योग दिन का साजरा करतात?आंतरराष्ट्रीय योग दिनाचा इतिहास yoga day yoga divas ”

Leave a Comment