CTET EXAM-2021 PYQ मराठी अध्यापनशास्त्र मागील परीक्षेत आलेले 20 प्रश्न ctet pyq important questions 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

CTET EXAM-2021 PYQ मराठी अध्यापनशास्त्र मागील परीक्षेत आलेले 20 प्रश्न ctet pyq important questions 

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक

प्रश्न क्रमांक 1. पुढीलपैकी कोणते भाषा शिक्षणाचे उद्दिष्ट नाही? (JAN 2021)

1. समजून वाचण्याची क्षमता

2. प्रयत्नपूर्वक विचार मांडणे

3. जे ऐकलं ते समजण्याची क्षमता

4. सुसंगत लेखन कौशल्य विकास

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

प्रश्न क्रमांक 2. ध्वनिशास्त्रीय जागरूकतेचा संबंध कोणाशी आहे? (JAN 2021)

1. श्रवण क्षमता

2. संभाषण क्षमता

3. वाचन क्षमता

4. लेखन क्षमता

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4

प्रश्न क्रमांक 3. नाओम चॉम्स्कीच्या मते भाषेच्या संदर्भात कोणती गोष्ट मुलांमध्ये जन्मतः असते? (JAN 2021)

1. आत्मसात करणे

2. अनुकरण करणे

3. रूपांतरण करणे

4. अनुवाद करणे

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

प्रश्न क्रमांक 4. भाषिक कौशल्य कशाप्रकारे शिकवले गेले पाहिजे? (JAN 2021)

1. अनुकरणातून

2. एकाकीपणे

3. सविस्तरपणे समजावून

4. समग्रपणे शिकवून

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4

प्रश्न क्रमांक 5. शिक्षिका मुलांना चित्र काढणे आणि रंग भरण्यास प्रवृत्त करते. यातून ती काय साध्य करू इच्छिते? (JAN 2021)

1. वर्गात शांतता राखण्यासाठी मुलांना कामाला लावणे

2. क्रियात्मक क्षमता ( Motor skill) विकसित करणे

3. उदयीमान बाल कलावंतांना संधी देणे

4. मुलांना नियुक्त कार्यात सहभागी करणे

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

प्रश्न क्रमांक 6. मौखिक भाषा क्षमता विकसित करण्यासाठी पुढीलपैकी कोणता सराव सर्वात मदतरूप ठरतो? (JAN 2021)

1. कवितेचे एकट्याने आणि सामूहिक अभिवाचन

2. भूमिकाभिनय

3. शिक्षिकेच्या पाठोपाठ पाठाचे सामूहिक वाचन

4. शिक्षिकेच्या पाठोपाठ शब्दांचे सामूहिक उच्चारण

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

प्रश्न क्रमांक 7. इयत्ता तिसरीची शिक्षिका मुलांना पाठातील कथेच्या घटनांची योग्य क्रमाने मांडणी करण्यास सांगते. असे केल्यामुळे कोणती बाब सुधारते? (JAN 2021)

1. वाचन आकलन

2. आकलनात्मक आदान

3. लेखन क्षमतेत वाढ

4. मुलांच्या संभाषण वेळेत वाढ

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

प्रश्न क्रमांक 8. इयत्ता दुसरीची शिक्षिका वर्गात वेगवेगळ्या वस्तूंवर त्यांचा परिचय करून देणान्या पट्ट्या चिकटवते. यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वस्तू आणि शैक्षणिक साहित्य यांचा सहसंबंध जुळवता येतो. असे केल्याने विद्यार्थ्यांच्या कोणत्या क्षमतेत भर पडते? (JAN 2021)

1. व्याकरण

2. लेखन कौशल्य

3. शब्दसंग्रह

4. अक्षर लेखन

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

प्रश्न क्रमांक 9. मुलाच्या भाषिक क्षमतेचे मूल्यमापन करण्यासाठी पुढीलपैकी कोणती पद्धती कमी महत्त्वाची आहे? (JAN 2021)

1. कथा – कथन

2. कथा लेखन

3. घटना – वृत्तांत लेखन

4. लेखन सराव

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4

प्रश्न क्रमांक 10. विद्यार्थ्यांची भाषिक क्षमता विकसित करण्यासाठी पुढीलपैकी कोणता प्रश्न विचारणे अधिक मदतरूप ठरेल? (JAN 2021)

1. तुम्हाला आवडलेल्या पुस्तकांचे नाव सांगा

2. पसंती या शब्दाचा वापर करून एक वाक्य तयार करा

3. आपला आईसोबतचा एखादा संवाद लिहा

4. तुम्ही वाचलेल्या कवितेतल्या कवीचे नाव सांगा

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

प्रश्न क्रमांक 11. मुलाच्या भाषा ग्रहणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती बाब सर्वात महत्त्वाची ठरते? (JAN 2021)

1. शिक्षक

2. कुटुंब

3. शाळा

4. संचार माध्यमे

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

प्रश्न क्रमांक 12. व्याकरणाचे नियम पाठ करण्यासाठी पुढीलपैकी कोणता घटक केन्द्रस्थानी असतो? (JAN 2021)

1. संरचनात्मक भूमिका

2. थेट भूमिका

3. व्याकरण अनुवाद पद्धती

4. नैसर्गिक पद्धती

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

प्रश्न क्रमांक 13. भाषा शिकण्यासाठी पुढीलपैकी कोणती गोष्ट महत्त्वाची नाही? (JAN 2021)

1. अभिप्रेरण

2. आत्मविश्वास

3. शिकण्याकडे असणारा कल

4. भाषांतर

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4

प्रश्न क्रमांक 14. मुलांना लेखन शिकवताना एक शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल? (JAN 2021)

1. मुलांना भाषेची बाराखडी लिहायला सांगणे

2. मुलांना आपले विचार लिहून काढण्यास सांगणे

3. मुलांना एखादा परिच्छेद पाठकरून चांगल्या अक्षरात लिहायला सांगणे

4. मुलांना फळ्यावर काढलेले अक्षर लिहून काढण्यास सांगणे

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

प्रश्न क्रमांक 15. मुलांसाठी शिक्षण सामग्रीची निवड करताना कोणता मुद्दा सर्वात महत्त्वाचा ठरतो? (JAN 2021)

1. सामग्री जवळपासच्या बाजारात उपलब्ध असणे

2. सामग्री फार महागडी नसणे

3. सामग्री मुलांनी तयार केलेली असणे

4. सामग्री प्रसंगानुरूप असणे आणि एकात्मिकृत रुपाने वापरता येणे

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4

प्रश्न क्रमांक 16. दुसन्या इयत्तेतील काही मुलांना काही ध्वनींच्या उच्चारणात अडचण येते. त्यांची ही अडचण दूर करण्यासाठी कोणती उपाययोजना सर्वात परिणामकारक ठरेल? (JAN 2021)

1. मानव मुखाच्या प्रतिकृतीचा आधार घेऊन विशिष्ट ध्वनींचा उच्चार कसा करायचा हे दाखवणे

2. शिक्षिकेने लहान लहान शब्दांचा आधार घेणे म्हणजे शब्द यमकांचा आधार घेणे, त्यांना उच्चार करण्यास सांगणे आणि शब्दातील ध्वनी ओळखण्यास सांगणे

3. संहितेचे मोठ्याने वाचन करून त्या विशिष्ट ध्वनीवर भर देऊन समजावणे

4. मुलांना सराव करण्यास सांगणे जेणेकरून त्याच त्या ध्वनींचा पुनः पुन्हा वापर करून अडचण दूर करणे

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

प्रश्न क्रमांक 17. व्याकरणाच्या नियमांवर भर देणे आणि त्यासंबंधीची अनेक उदाहरणे देऊन शिकविण्याची पद्धत म्हणजे … (JAN 2021)

1. उद्गामी पद्धती

2. निगमन पद्धती

3. व्याकरण भाषांतर पद्धती

4. थेट पद्धती

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

प्रश्न क्रमांक 18. शिकणारा भाषा कशाप्रकारे आत्मसात करतो? (JAN 2021)

1. नैसर्गिक भाषिक पर्यावरणात भाषेच्या वापरातून

2. भाषिक संरचनेच्या मूल्यमापनातून

3. संबंधित भाषेच्या साहित्य वाचनातून

4. संबंधित भाषा बोलणायांच्या संस्कृतीचा अभ्यास करून

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

प्रश्न क्रमांक 19. पुढीलपैकी कोणती बाब क्रियात्मक क्षमतेचा (Motor Skill) विकास करण्याचे उदाहरण आहे? (JAN 2021)

1. वरच्या पातळीवर जाणे

2. उड्या मारणे

3. लेखन

4. वाचन

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

प्रश्न क्रमांक 20. वर्गात बहुभाषिकतेला उत्तेजन देण्यासाठी शिक्षिकेने पुढीलपैकी कोणता प्रश्न विचारणे योग्य ठरेल? (JAN 2021)

1. फुगे किती उंच उडतात

2. स्वतःच्या भाषेतील भाज्यांची नावे लिहा

3. तुमच्याकडे पाळीव प्राणी आहे

4. तुम्ही अक्षरे लिहिलीत

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

 

Related posts:

Leave a Comment