महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे निनियमन) नियमावली २०२१ बाबत sevajeshthata paripatrak
संदर्भ :
– १.सा.प्र.वि. अधिसूचना क्र. एसआरव्ही-२०१६/प्र.क्र.२८१/बारा. दि.२१ जून, २०२१
२.सा.प्र.वि.शासन निर्णय क्र. एसआरव्ही-२०१६/प्र.क्र.२८१/कार्या-१२, दि. १३ जुलै, २०२१
महोदय,
महाराष्ट्र नागरी सेवा (जेष्ठतेचे विनियमन) नियमावली १९८२ व त्यासंदर्भात शासनाने निर्गमित केलेले सर्व आदेश किंवा अभिलेख अधिक्रमित करुन सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना दि. २१ जून, २०२१ अन्वये “महाराष्ट्र नागरी सेवा (जेष्ठतेचे विनियमन) २०२१” हे नवीन नियम प्रसिध्द करण्यात आले आहेत. त्यानुषंगाने संदर्भाधीन शासन निर्णय दि. १३ जुलै, २०२१ नुसार “महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे विनियमन) नियमावली, २०२१” सर्व मंत्रालयीन विभागांच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख यांना पृष्ठांकीत केलेला आहे. सदर शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध असून त्याचा सांकेतांक क्र. २०२१०७०९१५४६१०८२०७ असा आहे.
२. संदर्भाधीन नियम जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना लागू करण्यात येत असून या नियमातील तरतूदी विचारात घेवून कार्यवाही करावी.











