राज्यातील इ.११वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन. २०२६-२७ ची कार्यवाही सुरु करणे व त्यासाठी करावयाच्या पूर्वतयारीबाबत eleventh online pravesh prakriya
संदर्भ शासन निर्णय क्र. प्रवेश-१२२५/प्र.क्र. १६/ एसडी-२ दिनांक. २५/०२/२०२५
उपरोक्त विषयान्वये कळविण्यात येते की, मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या “इज ऑफ लिविंग” या कार्यक्रमांतर्गत इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संदभर्भीय शासन निर्णयानुसार सन.२०२५-२६ पासून राज्यातील उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये इ.११वी चे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्यात येत आहेत.
सन. २०२६-२७ मधील इ.११वी प्रवेश प्रक्रिया कार्यवाही सुरु करण्यात येत असून त्यानुषंगाने आवश्यक मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळावे व योग्य पूर्वतयारी करता यावी यासाठी पुढील बाबी संबंधितांच्या निदर्शनास आणून द्याव्यात.
सन. २०२६-२७ मध्ये महाराष्ट्र राज्यातील राज्यमंडळाशी संलग्न सर्व उच्च माध्यमिक विद्यालये/ कनिष्ठ महाविद्यालयांतील इ.११वी
चे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्यात येतील.
ज्या विद्यार्थ्यांना राज्यातौल राज्यमंडळ संलग्न इ. ११वी मध्ये प्रवेश घ्यावयाचा असेल अशाच विद्यार्थ्यांनी या प्रणालीच्या मध्यमातून अर्ज करावा, अन्य मंडळाशी संलग्न विद्यालयात प्रवेशासाठी संबंधित विद्यालयांशी संपर्क साधावा, तथापि, अन्य मंडळाच्या शाळांमधून इ.१०वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना राज्यमंडळ संलग्न इ.११वी मध्ये प्रवेश घ्यावयाचा असल्यास त्यांना या प्रणालीद्वारे अर्ज करता येईल.
शेवटचा विद्यार्थी प्रविष्ट होईपर्यंत प्रवेश प्रक्रिया ही गुणवत्तेनुसार व निकषांनुसार ऑनलाईन पध्दतीने करण्यात येईल. ऑनलाईन
प्रणाली व्यतिरिक्त अन्य कोणत्याही मार्गाने शाळांना प्रवेश करता येणार नाही.
सदर प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांस दिलेल्या संकेतस्थळ / पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करुन प्रवेशाबाबत पुढील कार्यवाही करावयाची आहे. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना राज्यातील इ.११वी वर्ग असलेली विद्यालये शोधणे, त्यांमध्ये उपलब्ध शाखा/ माध्यम, प्रवेश क्षमता / रिक्त जागा तपासणे त्याचप्रमाणे प्रवेशासाठी अर्ज करणे, इत्यादी सुविधा ऑनलाईन उपलब्ध होतील.
इ.११वो प्रवेश प्रक्रियेमध्ये सुलभता येण्यासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना पुढीलप्रमाणे देण्यात येत आहेत.
A. कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी उपलब्ध जागांची विभागणी
इनहाऊस कोटा उच्च माध्यमिक विद्यालय चालविणाऱ्या संस्थेचीच माध्यमिक शाळा परिसरात अथवा संबंधित जिल्ह्यात असेल तर अशा शाळेमधील इ.१०वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी लागू असेल.
अल्पसंख्याक कोटा- फक्त अल्पसंख्याक कनिष्ठ महाविद्यालयात उपलब्ध असेल आणि या जागांवर अल्पसंख्याक प्रवर्गातील
Minority विद्यार्थ्यांनाच प्रवेश देता येईल.
व्यवस्थापन कोटा- हा त्या संस्थास्तरावरील प्रवेशासाठी असेल.
कोणत्याही कोटांतर्गत जार्गावर पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश देणे व अनुषंगिक कार्यवाही वेळापत्रकानुसार सुरु राहील.
कोटांतर्गत रिक्त जागा CAP साठी प्रत्यार्पित करण्याचा निर्णय शाळा स्तरावरुन घयावयाचा आहे. प्रत्यार्पित केलेल्या कोटांतर्गत जागा केंद्रीय प्रवेशासाठी पुढील फेरीमध्ये समाविष्ट होतील.
B. विद्यालयात इ.११वी मध्ये प्रवेश घेण्याचे मार्ग-
C. विद्याथ्यांसाठी ऑनलाईन प्रवेशाचे टप्पे-
R. (Student Registration) विद्याथ्र्याने प्रवेश प्रक्रियेच्या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करणे,
२. ३.
(Application Form-१) विद्यार्थ्यांने आपला प्रवेश अर्ज भाग-१ ऑनलाईन भरणे व प्रमाणित (Verify) करुन घेणे,
(Option Form-२) प्रवेशासाठी विद्यालये निवडून आनलाईन अर्ज भाग-२ पसंतीक्रम भरणे व प्रवेश फेरीत सहभागी होणे.
(प्रवेशासाठी विविध प्रवेश फेऱ्यांचे आयोजन करण्यात येईल, त्याचे वेळापत्रक त्या-त्या वेळी जाहीर करण्यात येईल.)
४. (Allotted) फेरीमध्ये प्रवेशासाठी मिळालेले विद्यालय तपासणे व त्या विद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करणे.
५. (Not Allotted) प्रवेशासाठी विद्यालय मिळाले नसल्यास पुढील प्रवेश फेरीसाठी अर्ज भाग-२ (Option Form) भरणे.
६. (ATKT) राज्यमंडळाच्या एटीकेटी सुविधा प्राप्त विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षा निकालानंतर नोंदणी व प्रवेशाची संधी मिळेल.
D. इ.११वी प्रवेश प्रक्रियेसाठी लागू असलेले आरक्षण-
१. सदर प्रवेश प्रक्रियेसाठी संविधानिक तसेच समांतर आरक्षण लागू असेल. संविधानिक आरक्षणांतर्गत जागा पहिल्या तीन नियमित फेऱ्यांपर्यंत त्या-त्या प्रवर्गातून भरण्यात येतील. त्यानंतर होणाऱ्या विशेष फेऱ्यांत राखीव प्रवर्गाचे उमेदवार न
मिळाल्यास रिक्त जागा खुल्या प्रवर्गातून भरण्यात येतील.
२. संविधानिक/सामाजिक आरक्षणांतर्गत राखीव जागा (बिगर अल्पसंख्याक शाळा)
३. समांतर आरक्षण/विशेष आरक्षण-
E. विद्यार्थ्यांनी इ.११वी प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवणे-
१. प्रवेश अर्जाचा भाग-१ भरतेवेळी आरक्षण व गुणांची पडताळणी करण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रे अपलोड करावी लागतात. त्याचप्रमाणे प्रवेश निश्चित करतांना सदर प्रमाणपत्रांची मूळ प्रत सादर करावी लागते. म्हणून संबंधित प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांनी वेळेपूर्वीच प्राप्त करुन ठेवणे आवश्यक आहे
२. पुढील प्रमाणपत्रे आवश्यक असतात. ( आपणास लागू असलेली प्रमाणपत्रे तयार ठेवावीत)
३. सामाजिक / वैधानिक आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी जातीचा दाखला महाराष्ट्रातील असणे आवश्यक आहे.
४. समांतर / विशेष आरक्षणाचा लाभ हवा असल्यास तसे प्रमाणपत्र (स्वतः चे) सादर करावे लागेल.
५. आरक्षणाबाबत प्रमाणपत्र सादर न केल्यास अशा विद्यार्थ्यांचा अर्ज खुल्या प्रवर्गातून ग्राह्य धरला जातो. अर्थात कोणत्याही आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा नसल्यास आरक्षणाचाबत प्रमाणपत्र आवश्यक असणार नाही.
६. ३.११वी प्रवेशासाठी वरीलप्रमाणे आपणास लागू होणारी प्रमाणपत्रे / दाखले विद्यार्थ्यांनी वेळेत मिळवून ठेवणे हिताचे आहे.
विद्याध्यांसह सर्व संबंधितांनी प्रवेश प्रक्रियेच्या पोर्टलवर प्रकाशित करण्यात येत असलेल्या माहितीपुस्तिकेचे व्यवस्थित अध्ययन करावे तसेच प्रवेश प्रक्रियेदरम्यान पोर्टलवरुन देण्यात येणाऱ्या सूचना ह्या अद्ययावत समजाव्यात.
विद्यार्थ्यांना आरक्षणाचा लाभ घेता यावा यासाठी अशा विद्याथ्यांना आवश्यक कागदपत्रे वेळेत मिळवून देण्यासाठी विशेष मोहिम राबविणेबाबत विनंती सबंधित महसूल यंत्रणेस करणे, माध्यमिक शाळांनी आपले विद्यालयातील इ. ९वी १०वी मधील विद्यार्थ्यांना याबाबत सूचित करून शाळेत असतांनाच अशी कागदपत्रे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे अशा उपाययोजना कराव्यात.
इ.११वी केंद्रीय ऑनलाईन प्रक्रिया २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रियेचे टप्पे समजावून घेऊन त्यानुसार नियोजन करावे. प्रवेश प्रक्रियेचे फेरोनिहाय वेळापत्रक यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल. प्रवेश प्रक्रियेबाबत व्यापक प्रसिद्धी द्यावी. शंका समाधान व्यवस्था कार्यान्वित करावी. इ.११वी केंद्रीय ऑनलाईन प्रक्रियेचे टप्पे व अन्य आवश्यक बाबीना प्रसिद्धी देऊन पुढील कार्यवाही करावी. सुरवातीस उच्च माध्यमिक विद्यालयांची नोंदणी पूर्ण करावयाची असून त्यानंतर विद्यार्थी नोंदणी सुरु करता येईल. तत्पूर्वी जनजागृती कामकाज होणे आवश्यक आहे.
विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व विद्यालये पोर्टलवर अचुकपणे नोंदणीकृत झाली असल्याची व नियमानुसार प्रवेश क्षमता, शुल्क इत्यादी सर्व माहिती अचूक नोंदविली आहे याची खात्री करावी. मार्गदर्शन केंद्र, शाळा, विद्यालये, विद्यार्थी, पालक यांचेसाठी प्रशिक्षण / उद्बोधन सत्रांचे आयोजन राज्यमंडळ इ.१०वी परीक्षा संपताच करावे,
प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांचे अर्ज अचूक भरले जावेत, ते त्वरीत व अचूकपणे प्रमाणित व्हावेत यासाठी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी मार्गदर्शन केंद्रांची स्थापना करावी. माध्यमिक शाळांनी आपल्या शाळेतून इ.१०वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रवेश अर्ज भरण्यासाठी पुरेपुर साहाय्य करावे. विद्यार्थ्यांनी अर्जात भरलेली माहिती शक्यतो त्याच्या इ.१० वी उत्तीर्ण शाळेतूनच प्रमाणित केली जाईल अशी व्यवस्था करावी. अन्य विद्यार्थ्यांसाठी इ.११वी प्रवेश देणाऱ्या शासकीय / अनुदानित विद्यालयांमध्ये आवश्यकतेनुसार मार्गदर्शन केंद्रांची स्थापना करावी.
इ.११वी मध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन विद्यार्थी, पालकांना मिळावे व प्रवेशाबाबत सर्व सूचना वेळेत निर्गमित करता याव्यात यासाठी गट शिक्षणाधिकारी व क्षेत्रीय यंत्रणा यांना प्रशिक्षित करुन एकंदर संनियंत्रण गतीमान करावे. पडताळणी कामकाज व विद्याच्यर्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी यंत्रणा तयार करावी.
Portal URL व तपशीलवार सूचना यथावकाश देण्यात येतील तरी, वरील सूचना संबंधितांचे निदर्शनास आणाव्यात.









