अतिरिक्त शिक्षक/शिक्षकेतर समायोजनाबाबत sanchmanyata atirikta samayojan
सन २०२५-२६ संचमान्यता कामकाज शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, केंद्र प्रमुख व शाळा स्तर यांच्या लॉगीनला विद्यार्थी, कार्यरत पदे, माध्यम, अनुदान प्रकार, वर्ग व शाखा इ. नमूद नसणे या कारणामुळे संच मान्यता झालेल्या नसल्याचे दिसून येते. विविध स्तरावर अशा १६०० शाळा प्रलंबित असल्याचे दिसून येते.
आपणास सूचना देण्यात येते की, सन २०२५-२६ च्या संचमान्यता प्रमाणे तातडीने समायोजनाच्या शासन निर्णयाप्रमाणे समायोजन करावे. याबाबत निर्देश यापूर्वी देण्यात आलेले आहेत. तातडीने सन २०२५-२६ संचमान्यतेचे कामकाज पुर्ण करण्यात यावे. सन २०२५-२६ संचमान्यता उपरोक्त कारणामुळे झाली नसल्यास तात्पुरत्या स्वरुपात मागील वर्षाच्या तुलनेत विद्यार्थी संख्या कमी झाली नसल्यास अशा शाळांच्या बाबतीत सन २०२४-२५ ची संच मान्यता विचारात घेऊन समायोजनाची कार्यवाही तातडीने पुर्ण करावी.
सन २०२५-२६ ची संचमान्यता झाली नसल्यास मंजूर पदापेक्षा जास्त पदाचे वेतन व भत्ते शालार्थ प्रणालीतून अदा होणार नाहीत.









