शासकीय शाळांतील शिक्षकांना शाळा सुरक्षितता या ऑनलाईन कोर्सला प्रवेशित करण्याबाबत shala suraksha online course
संदर्भ : नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट यांचे दिनांक १६ जून, २०२५ रोजीचे पत्र.
उपरोक्त संदर्भीय विषयान्वये कळविण्यात येते की, नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट यांचे दिनांक १६ जून, २०२५ नुसार शासकीय शाळांतील शिक्षकांना शाळा सुरक्षितता या ऑनलाईन कोर्सला प्रवेशित करण्याबाबत संदर्भाधीन पत्रान्वये संचालनालयास कळविण्यात आले आहे. (संदर्भिय पत्राची प्रत
सोबत जोडली आहे). संदर्भाधीन पत्रान्वये दिनांक १६ जून, २०२५ नुसार IGOT कर्मयोगी प्लॅटफॉर्मवर शिक्षकांसाठी शाळा सुरक्षितता या विषयावर ऑनलाईन कोर्स उपलब्ध आहे. शिक्षकांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण व उपयुक्त
असणाऱ्या या कोर्स ची माहिती शिक्षकांपर्यंत पोहचवण्यात यावी.








