सन २०२५-२६ च्या संचमान्यतेबाबत sanchmanyata paripatrak 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सन २०२५-२६ च्या संचमान्यतेबाबत sanchmanyata paripatrak 

संदर्भ :

– १) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे यांचे पत्र क्र. शिउसं/संचमान्यता/२०२४-२५/टि-८/२५६३, दि.२६.०५.२०२६

२) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे यांचे पत्र क. शिउसं/२०२४-२५/टि-४/०३८०८, दि.२३.०७.२०२५.

३) शासन पत्र क्र. बैठक-२०२६/प्र.क्र.५५/टिएनटी-२, दि.१८.०३.२०२६

शासन निर्णय दि.१५ मार्च, २०२४ मधील तरतुदीच्या अनुषंगाने गट ९-१० साठी शिक्षक मंजूरीच्या अनुषंगाने संदर्भ क.१ अन्वये शासनास विकल्प सादर करण्यात आले होते. तसेच, गट ९-१० मध्ये ० शिक्षक अनुज्ञेय झालेल्या शाळांची पटसंख्यानिहाय व नजिकच्या शाळांसोवतची अंतरनिहाय माहिती संदर्भ क्र. २ अन्वये सादर करण्यात आली आहे.

२. शासन निर्णय दि.१५ मार्च, २०२४ मधील संचमान्यतेच्या तरतुदी व अतिरिक्त उरलेल्या शिक्षकांच्या समायोजनाबाबत मा. मंत्री (शालेय शिक्षण) यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार, दि.२४.०२.२०२६ रोजी त्यांचे मंत्रालयीन दालन क्र. ७०२, सातवा मजला (विस्तार), मंत्रालय, मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीचे इतिवृत्त संदर्भ क्र.३ अन्वये आवश्यक कार्यवाहीस्तव निर्गमित करण्यात आले आहे. त्यानुषंगाने शासन निर्णय दि.१५.०३.२०२४ मधील गट ९-१० च्या अनुषंगाने आपणांस खालीलप्रमाणे कळविण्यात येत आहे:

१. शासन निर्णय दि.१५.०३.२०२४ मधील तरतुदीनुसार ज्या माध्यमिक शाळांमध्ये गट ९-१० करिता शिक्षक अनुज्ञेय होतात अशा शाळेपासून ० ते ३ किलोमीटर परिसरात त्याच माध्यमाची दुसरी माध्यमिक शाळा असल्यास शासन निर्णय दि.१५.०३.२०२४ मधील तरतुदीप्रमाणे कार्यवाही करावी.

२. शासन निर्णय दि.१५.०३.२०२४ मधील तरतुदीनुसार ज्या माध्यमिक शाळांमध्ये गट ९-१० करिता शिक्षक अनुज्ञेय होतात अशा शाळेपासून ३-५ किलोमीटर परिसरात असणा-या व त्या परिसरात माध्यमिक

शाळांत इ.९ ते १० वी गटाकरिता ० पदे मंजूर होणा-या शाळांमध्ये इ. ९-१० वी च्या गटामध्ये संचमान्यता वर्ष २०२५-२६ मध्ये दोन्ही वर्गाची एकत्रित पटसंख्या ४० असल्यास ३ शिक्षक अनुज्ञेय करण्यात यावे,

३. शासन निर्णय दि.१५.०३.२०२४ मधील तरतुदीनुसार ज्या माध्यमिक शाळांमध्ये गट ९-१० करिता शिक्षक अनुज्ञेय होतात अशा शाळेपासून ५ किलोमीटर पेक्षा अधिक अंतरावरील त्याच माध्यमाची माध्यमिक शाळा उपलब्ध आहे, परंतु त्या परिसरात माध्यमिक शाळांत इ.९ ते १० च्या गटाकरिता ० पदे मंजूर होणा-या शाळांमध्ये इ. ९-१० वी च्या गटामध्ये संचमान्यता वर्ष २०२५-२६ मध्ये दोन्ही वर्गाची एकत्रित पटसंख्या ३० असल्यास ३ शिक्षक अनुज्ञेय करण्यात यावे.

४. वरीलप्रमाणे सन २०२५-२६ च्या संचमान्यतेमधील उपरोक्त सवलत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये विद्यार्थीसंख्या वाढविण्यासाठी प्रोत्साहन म्हणून केवळ एका वर्षासाठी देण्यात येत आहे, उपरोक्त सवलत ही कार्यरत शिक्षकांसाठीच मर्यादित असेल. सदरहू पदे भरण्यासाठी नवीन भरती करू नये.

Related posts:

Leave a Comment