TET मराठी विषयावर आधारित प्रश्नसंच pdf उपलब्ध tet marathi questions bank
(1) मराठी भाषा दिन कधी असतो ?
उत्तर — 27 फेब्रुवारी
(2)’ मृत्यूंजय’ या कांदबरीचे लेखक कोण ?
उत्तर शिवाजी सावंत
(3) ‘ गोविंदाग्रज’ हे टोपण नाव कोणाचे ?
उत्तर — राम गणेश गडकरी
(4) ‘ श्यामची आई’ या पुस्तकाचे लेखक कोण ?
उत्तर —
साने गुरुजी
(5)’ खानदेशाची कवयित्री ‘ म्हणून कोणाला ओळखले जाते ?
उत्तर — बहिणाबाई चौधरी
(6) वि. वा. शिरवाडकर या साहित्यिकांचे टोपण नाव काय आहे ?
उत्तर कुसुमाग्रज
(7)’ अरे संसार संसार – जसा तवा चुल्यावर ‘ या काव्यपंक्ती कोणत्या कवीच्या आहेत.
उत्तर — बहिणाबाई चौधरी
(8) त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना …… म्हणतात.
उत्तर — बालकवी
(9) ‘ कृष्णाजी केशव दामले ‘ यांचे टोपणनाव काय आहे ?
उत्तर — केशवसुत
(10) ‘ भारूड’ हा काव्यप्रकार कोणामुळे ओळखला जातो ?
उत्तर —
संत एकनाथ
(11
) अभंगाचे रचनाकार कोण आहेत ?
उत्तर —
संत तुकाराम
(12) वारक-यांच्या समूहाला काय संबोधले जाते ?
उत्तर — दिंडी
(13) ‘ जिवंत असेपर्यंत’ या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता ?
उत्तर — आजन्म
(14)’ भरपूर वर्षे जगणारा ‘ या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता ?
उत्तर — दीर्घायुषी
(15) तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट म्हणजे काय ?
उत्तर- दंतकथा
(16) ‘ अंत’ या शब्दाचा उलट अर्थ काय आहे.
उत्तर आधी
(17) ‘ उन्नती’ या शब्दाला समानार्थी शब्द सांगा.
उत्तर — प्रगती
(18) ‘ रजनी’ या शब्दाचा अर्थ काय होतो ?
उत्तर — रात्र
(19)’ थोरला ‘ या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द ओळखा.
उत्तर- धाकटा
(20) ‘निरक्षर’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
उत्तर — साक्षर








