दि. २८/०३/२०२६, दि.२९/०३/२०२६ व दि.३१/०३/२०२६ रोजी कार्यालय सुरु ठेवणेबाबत karyalay suru thevnebabat
उपरोक्त विषयान्वये आर्थिक वर्ष सन २०२५-२६ मार्च अखेर असल्याने महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या समग्र शिक्षा, STARS, PMSHRI, JANMAN, JUGA इ. कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांशी संबंधित कामकाज प्राधान्याने कालमर्यादित व विहित मुदतीत करणे आवश्यक आहे. तसेच सदर उपक्रमांतर्गत प्राप्त होणारा निधी विहीत मुदतीत खर्च होणे आवश्यक असल्याने महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई कार्यालय दि. २८/०३/२०२६, दि.२९/०३/२०२६ व दि.३१/०३/२०२६ रोजी सुरु ठेवण्यात येणार आहे.
त्यानुषंगाने आपणास कळविण्यात येते की, दि. २८/०३/२०२६, दि.२९/०३/२०२६ व दि.३१/०३/२०२६ रोजी आपले जिल्हा परिषद/महानगरपालिका कार्यालय व आपल्या अधिनस्त असलेल्या तालुका/गट साधन केंद्र (समग्र शिक्षा) कार्यालये सुरु ठेवण्यात यावीत.








