राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन २०२६ ची उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष २०२६-२७ सुरू करणेबाबत unhali sutti paripatrak 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन २०२६ ची उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष २०२६-२७ सुरू करणेबाबत unhali sutti paripatrak 

संदर्भ :- शासन परिपत्रक क्र. संकिर्ण-२०२३/प्र.क्र.१०५/एस.डी.-४, दि. २०/०४/२०२३

उपरोक्त संदर्भीय परिपत्रकान्वये शासनाने संपूर्ण राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्टीच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी सूचना निर्गमित केलेल्या आहेत. या अनुषंगाने राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन २०२६ ची उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष २०२६-२७ सुरू करणेबाबत खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहे.

१) राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शनिवार दि.०२ मे, २०२६ पासून सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.

२) राज्यातील इतर मंडळाच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्वाचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्यास, विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर उचित निर्णय घ्यावा.

३) पुढील शैक्षणिक वर्ष सन २०२६-२७ मध्य विदर्भ तसेच इतर सर्व विभागातील राज्य मंडळाच्या शाळा सोमवार दि. १५ जून, २०२६ रोजी सुरू करण्यात याव्यात.

४) जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळयाच्या सुट्टी नंतर तेथील राज्य मंडळाच्या शाळा सोमवार दि. १५ जून, २०२६ ते २९ जून, २०२६ पर्यंत सकाळ सत्रात ७.०० ते ११.४५ या वेळेत सुरू करण्यात याव्यात. मंगळवार दि. ३०/०६/२०२६ पासून नियमित वेळेत शाळा सुरू करण्यात याव्यात.

वरील सूचना आपल्या अधिनस्थ सर्व मान्यता प्राप्त राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या निदर्शनास आणून द्याव्यात.

 

Leave a Comment