राज्यातील माजी सैनिक, शहिद सैनिक पत्नी व कुटुंबियांना शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये १५ टक्के गुणांची सवलत देणेबाबत tet marks savlat 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्यातील माजी सैनिक, शहिद सैनिक पत्नी व कुटुंबियांना शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये १५ टक्के गुणांची सवलत देणेबाबत tet marks savlat 

वाचा :-

१) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र. आरटीए-१०८२-३५०२-सीआर-१००-१६ अ. दिनांक २.९.१९८३

Download

२) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९.

३) राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषद, नवी दिल्ली यांचे पत्र क्र. ७६/४/२०१०/एनसीटीई/एसीएडी, दिनांक ११.२.२०११ सोबतच्या मार्गदर्शक सूचना.

४) शासन निर्णय क्रमांकः प्राशातु-१११२/प्र. क्र. (२५८/२०१२)/प्राशि-३, दिनांक १३.२.२०१३

५) शासन निर्णय क्रमांकः आरटीई-२०१३/प्र. क्र. ९१/प्राशि-१, दिनाक २३.८.२०१३

६) शिक्षण संचालक (प्राथमिक), पुणे यांचे पत्र क्र. प्राशिस/टीईटी-मा.से./६४३४/टे-५०२/ २०२१/२६००, दिनांक ६.८.२०२१

७) आयुक्त (शिक्षण) यांचे पत्र क्र. आस्था/प्राथ./१०६/पवित्र/२०२१/४४९०, दिनांक २९.१०.२०२१.

प्रस्तावना :-

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक सस्थामधील शिक्षक भरतीसाठी पवित्र प्रणालीमार्फत शिक्षक पात्रता परीक्षा (TET) घेण्यात येते. सदर परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी खुल्या प्रवर्गासाठी ६० टक्के गुण आवश्यक आहेत. तर, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त व भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व दिव्यांग यांच्यासाठी ५ टक्के गुणांची सवलत म्हणजे उत्तीर्ण होण्यासाठी ५५ टक्के गुण आवश्यक आहेत. संदर्भ क्र. १ येथील शासन निर्णयानुसार माजी सैनिक व शहिद सैनिकांचे कुटुंबिय यांना १५ टक्के समातर आरक्षण विहित करण्यात आले आहे. माजी सैनिकाना सैन्यातील २० वर्षांची सेवा केल्यानतर त्यांच्या वयाचा विचार करता इतर उमेदवारांप्रमाणे गुण प्राप्त करणे शक्य होत नाही. त्यामुळे सदर आरक्षणांतर्गत पर्याप्त उमेदवार उपलब्ध न झाल्याने पदे रिक्त राहतात. देशातील इतर राज्यांनी माजी सैनिक, शहिद सैनिक पत्नी व त्यांच्या कुटुंबियांना शिक्षक भरतीमध्ये गुणांची सवलत दिली आहे. या सर्व बाबींचा विचार करुन महाराष्ट्र राज्यात देखील शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये सदर घटकास गुणांची सवलत देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णयः-

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थामधील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांची पदे भरण्यासाठी पवित्र प्रणालीमार्फत घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेत विहित आरक्षणानुसार (TEI) माजी सैनिक, शहिद सैनिकांच्या पत्नी व त्यांचे कुटुंबिय यांना १५ टक्के गुणांची सवलत देण्यास मान्यता देण्यात येत आहे. म्हणजेच, सदर गटातील उमेदवारांना उत्तीर्ण होण्यासाठी ४५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.

ange sear friendtion eye were for more men army व मापुट घेण्यात येणा वा शिक्षक पात्रता परीक्षा राहीली आवाम महाराष्ट्र साज्य

रावर शासन निर्णय महाराष्ट्र www.mahacha.gov करण्यात जाला असून त्याचा संकेतक २००२०६३०१६४२०१२६२१

शासन परिपत्रक pdf download 

महाराष्ट्राचे राज्यपालाच्या आदेशानुसार

 

 

Related posts:

Leave a Comment