राज्यातील शाळांची पटपडताळणी करणेबाबत patpadtalni paripatrak
विषयः राज्यातील शाळांची पटपडताळणी करणेबाबत.
संदर्भ:- शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, शासनपत्र क्रमांकः लवेसु-१२२५/प्र.क्र.१०/२५/ एराएम.३, दिनांक ०३.११.२०२५
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने राज्यातील शाळांची पटपडताळणी करण्याबावत खालील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.
१. इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी विद्यार्थ्यांची पटपडताळणी करण्याची आवश्यकता नाही. बोर्डाच्या परीक्षेमधील विद्यार्थी उपस्थिती ही ग्राह्य धरण्यात येईल.
२. शैक्षणिक सत्र २०२५-२६ माय इयत्ता ११ वी मधील विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षेतील मराठी, इंग्रजी आणि भौतिकशास या विषयाच्या परीक्षेच्या दिवशी पटपडताळणी करण्यात यावी.
३. इयत्ता २ री ते इयत्ता ८वी च्या वर्गाच्या बाबतीत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांनी आयोजित केलेल्या नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) परीक्षेच्या दिनांकादिवशी म्हणजेच ११/०४/२०२६ १५/०४/२०२६,२२/०४/२०२, रोजी करण्यात यावी,
४. इयत्ता ९ वी या वर्गाच्या बावतीत पटपडताळणी उपरोक्त तारखांच्या (११/०४/२०२६, १५/०४/२०२६,२२/०४/२०२६) दिवशीच करणे नियोजित आहे.
५. राज्यातील सर्व शाळामधील पटपडताळणी दिनांक ११/०४/२०२६, दिनांक १५/०४/२०२६ व दिनांक २२/०४/२०२६ या तीन दिवशी करण्याच्या अनुषंगाने इयत्ता ९ वी चे मराठी, गणित व इंग्रजी या विषयांची वार्षिक परीक्षा अनुक्रमे दि. २१ एप्रिल २०२६, ११ एप्रिल २०२६ व २२ एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात यावेत.
६. तसेच इयत्ता ११ वीच्या बाबतीत मराठी, भौतिकशाख व इंग्रजी या विषयांची वार्षिक परीक्षासुध्दा अनुक्रमे दि.११ एप्रिल २०२६, १५ एप्रिल २०२६ व २२ एप्रिल २०२६, रोजी आयोजित करण्यात यावेत. जेणेकरुन राज्यातील सर्व शाळांमधील इयता २ री ते ९ वी व ११ वी पटपडताळणी उपरोक्त तीन दिवशी पुर्ण होईल,
७. राज्यातील शाळांची पटपडताळणी करण्याचे अनुषंगाने स्टुडंट पोर्टलवर HM Login, Cluster Head Login, BEO Logn 4 EO Login वर सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. पटपडताळणीच्या अनुषंगाने शाळेस भेट देणारे पथक उपरोक्त लॉगीनचा वापर करुन हजर व गैरहजर विद्यार्थ्यांची नोंद करतील. या सुविधेबाबत सविस्तर माहीती /सूचना आपणास ७ एप्रिल २०२६, रोजी किंवा तत्पूर्वी कळविण्यात येईल.
८. राज्यातील शाळांची पटपडताळणी करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ आवश्यक आहे. त्यासाठी क्षेत्रीय स्तरावरील केंद्र प्रमुख, गट शिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी (प्राथ/माध्य, योजना), लेखाधिकारी, अधीक्षक (शालेय पोषण आहार), जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (IET) पे अधिव्याख्याता वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक चे अधीक्षक व विस्तार अधिकारी संवर्ग इ. याची नेमणूक शाळेस भेट देणारे पथक म्हणून करावी व शाळेस प्रत्यक्ष भेट देवून पटपडताळणी करण्यासाठी नेमणूक करण्यात यावी.
९. शिक्षणाधिकारी (माध्य / प्राथ) यांनी शाळा निहाय पटपडताळणीचे नियोजन आपल्या पातळीवरुन एकत्रितपणे करावे. अंमलबजावणी प्रभावीपणे होईल याकडे लक्ष द्यावे.





