SNA Portal अंतर्गत शाळांचे e-Hastakshar Registration व School Mapping प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत – जिल्हा परिषद व महानगरपालिका, शाळा स्तरावर Maker / Checker नोंदणी करण्याची कार्यपद्धती निश्चित करणेबाबत
विषय: SNA Portal अंतर्गत शाळांचे e-Hastakshar Registration व School Mapping प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत – जिल्हा परिषद व महानगरपालिका, शाळा स्तरावर Maker / Checker नोंदणी करण्याची कार्यपद्धती निश्चित करणेबाबत
संदर्भ: १. शासन निर्णय, वित्त विभाग, दिनांक २३ एप्रिल २०२५.
२. शासन निर्णय, वित्त विभाग, दिनांक ३० जुलै २०२५
3. SNA SPARSH Guidelines (SNA Portal वर उपलब्ध)
उपरोक्त विषयांकित प्रकरणी आपणास कळविण्यात येते कि, वित्त विभागाच्या वरील संदर्भिय १ व २ च्या शासन निर्णयानुसार SNA SPARSH प्रणालीबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार समग्र शिक्षा या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत SNA SPARSH प्रणालीचा अवलंब करण्यासाठी SNA Portal अंतर्गत SCERT पुणे, जिल्हा परिषद सर्व, महानगरपालिका, सर्व आणि BRC / URC, KGBV, शाळास्तर तसेच DIET स्तरावर E-Hastakshar registration तसेच School Mapping प्रक्रिया वेळेत व अचूक पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी SCERT, पुणे, जिल्हा परिषद सर्व, महानगरपालिका सर्व, BRC /URC, KGBV, शाळा तसेच DIET स्तरावर E-Hastakshar registration तसेच School Mapping करणे बाबतची कार्यपद्धती पुढील प्रमाणे आहे.
वरील तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे सर्व स्तरावरील Maker तसेच Checker ची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत तसेच सर्व जिल्हा परिषद / महानगरपालिका यांनी CHECKER चे E-Hastakshar registration व School Mapping साठी आवश्यक माहिती SNA Portal वर अचूक नोंदविण्याबाबत आपलेस्तरावरुन सर्व संबंधितांना निर्देश देण्यात यावेत.
या बाबतची संपूर्ण प्रक्रिया SNA SPARSH च्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि वित्त विभागाच्या दि. ३०.०७.२०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार तसेच SNA पोर्टल वेबसाइट वर उपलब्ध असलेल्या SOP नुसार वेळेत पूर्ण करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल तात्काळ या कार्यालयास सादर करण्याबाबत आपलेस्तरावरुन सर्व संबंधितांना निर्देश देण्यात यावेत.











