रात्रशाळेतच काम करणा-या शिक्षकांना समावून घेणेबाबत shikshak paripatrak
संदर्भ:
१. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक एसएसएन २०१५/प्र.क्र. १६/१५/टिएनटि-२, दि. २८.०८.२०१५.
२. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक संकीर्ण-२०२२/प्र.क्र.४/टीएनटी-१, दि.३०.०६.२०२२.
३. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक एसएसएन २०१५/प्र.क्र. १६/१५ टिएनटि-२, दि. १५.०३.२०२४.
महोदय,
Email id: tnt.sesd-mh@mah.gov.in
संदर्भ क्र. २ येथील शासन निर्णयान्वये रात्रशाळेतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या सेवाशर्ती व अन्य सर्वसाधारण बाबींसंदर्भात तरतूदी करण्यात आलेल्या आहेत. सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्र.३ अन्वये असे स्पष्ट करण्यात आले आहे की, संदर्भ क्र. १ येथील दि.२८.०८.२०१५ चा संचमान्यतेबाबतचा शासन निर्णय रात्रशाळांना लागू होईल. संदर्भ क्र ३ अन्वये संदर्भ क्र. १ येथील शासन निर्णय अधिक्रमित करण्यात आला व संचमान्यतेबाबत सुधारित धोरण लागू करण्यात आले. त्यामुळे संदर्भ क्र. ३ येथील दिनांक १५.०३.२०२४ रोजीचा शासन निर्णय रात्रशाळांना लागू होतो.
उपरोक्त तरतूदीनुसार रात्रशाळेतील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन रात्रशाळेतच ग्राहय आहे. त्यानुसार, रात्रशाळांतील नियमित नियुक्तीने कार्यरत अतिरिक्त एकल शिक्षक यांचे अन्य रात्रशाळेत समायोजन करणेबाबत आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करण्यात यावी.








