०५ सप्टेंबर शिक्षक दिन छोटे मराठी भाषण teacher’s day small speech
शिक्षक म्हणजे एक समुद्र ज्ञानाचा साठा, अनुभवांचा खजिना प्रत्येकाच्या मनातील एक आदरणीय कोपरा…….
सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, गुरुजन वर्ग व माझ्या मित्र-मैत्रिणींनो. सर्वाना माझा नमस्कार! व सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा.
मी राज पाटील आज शिक्षक दिनानिमित्त माझे मनोगत व्यक्त करण्यास तुमच्यासमोर उभा आहे. दरवर्षी आपण 5. सप्टेंबरला “शिक्षक दिन’ साजरा करतो. हा दिवस डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो. ते स्वतः एक शिक्षणतज्ञ व उत्तम शिक्षक होते. त्यांच्या इच्छेनुसार सर्व शिक्षकांच्या कार्याचा गौरव म्हणून शिक्षक दिन साजरा करण्यात येतो.
शिक्षकी पेशा, असा एक पेशा आहे, जिथे जगातली प्रत्येक वृत्ती निर्माण केली जाते. डॉक्टर असो वा इंजिनियर तो घडतो एका शिक्षकामुळेच. शिक्षक कुठल्याही अपेक्षेशिवाय मुलांना ज्ञानार्जनाचे काम करतात.
असे म्हणतात कि पेनाची धार तलवारीपेक्षाही जास्त असते. आणि एका शिक्षकाकडे जगाला बदलण्याची ताकद असते. त्याच्याजवळ फक्त दोनच अस्त्र असतात, एक त्यांचे ज्ञान व दूसरे त्याचे शब्द.
गुरुविना ना मिळे ज्ञान गुरुविना ना मिळे सन्मान… जीवन भवसागर तराया चला वंदूया गुरुराया…
धन्यवाद.








