सन २०२६-२७ चे अनुदान वितरण जिल्हा परिषद शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी, वेतन/निवृत्तीवेतन व आस्थापना अनुदाने anudan vitran paripatrak 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सन २०२६-२७ चे अनुदान वितरण जिल्हा परिषद शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी, वेतन/निवृत्तीवेतन व आस्थापना अनुदाने anudan vitran paripatrak 

जिल्हा परिषद शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी, वेतन/निवृत्तीवेतन व आस्थापना अनुदाने

Download

संदर्भः- मा. आयुक्त, यांचेकडील क्र. अंदाज-१८४/२०२६-२७/तरतूद वितरण/१८३०५०७/२०२६, दि.६.४.२०२६

सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेले वित्त विभागाकडून प्राप्त आलेले अनुदान विनियोजन अधिनियम २०२६ व शासनाच्या अटी व शर्तीच्या अधीन राहून संदर्भ क्रमांक ०१ अन्वये प्राप्त झाले आहे. सन २०२६-२०२७ या आर्थिक वर्षातील माहे मार्च, २०२६ या महिन्याचा वेतन व भत्ते, निवृत्तीवेतन, याबाबीचा खर्च

भागविण्यासाठी शासनाने संचालनालयाच्या स्तरावर उपलब्ध करुन दिलेल्या तरतूदीच्या अधीन राहून प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडून खालील लेखाशिर्षाखाली सोबत जोडलेल्या तक्त्यात दर्शविलेल्या तरतूदी जिल्हयांच्या मागणीनुसार संधित मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व यांना वितरीत करण्यात येत आहे.

अ) ज्या उद्देशासाठी अनुदान मंजूर आहे. त्याव्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाही.

आ) सदर खर्चाचा प्रगती अहवाल मासिक निधी विवरणपत्रानुसार संबंधित अधिका-यांने लेखाशिर्षनिहाय कोषागार प्रमाणक क्रमांक व दिनांकासह दरमहा १० तारखेपर्यंत सादर करावा. तसेच खर्च मेळाचा त्रैमासिक अहवाल विहित प्रपत्रात नियमितपणे सादर करावा.

वितरीत करण्यात आलेल्या तरतूदीमधून आपल्यास्तरावर कोणत्याही प्रकारची कपात करण्यात येऊ नये. वरीलप्रमाणे मंजूर तरतूदी संगणक वितरण प्रणालीवर वितरीत करण्यात आलेल्या आहेत.

टिप :- वितरीत केलेले अनुदानामधून केवळ माहे मार्च २०२६ चे नियमित वेतन, निवृत्तीवेतन व वित्त विभाग शासन निर्णय दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ नुसार महागाई भत्ता थकबाकी फरक अदा करण्यात यावा. अन्य कोणतेही देयक अदा करण्यात येऊ नये.

शासन परिपत्रक pdf download 

Related posts:

Leave a Comment