TET PYQ मानसशास्त्र प्रश्नसंच सोडवा tet pyq questions answers
अध्ययन उपपत्तीच्या वर्गीकरणातील आधुनिक उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या उपपत्तीचा समावेश होत नाही?
1) प्रभुत्त्व अध्ययन उपपत्ती
2) क्षेत्रीय उपपत्ती
3) सामाजिक अध्ययन उपपत्ती
4) माहिती प्रक्रियाकरण प्रतिमान
या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
सामान्य अध्यापन उपपत्तीच्या वर्गातील अध्यापनाची ज्ञानात्मक उपपत्तीचे पुरस्कर्ता आहेत.
1) जॉन डयूई
2) एन. एल. गेज
3) सॉक्रेटिस
4) हबीर्ट
या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
ज्या प्रक्रियेत प्रयोज्याला विशिष्ट चेतकाच्या आधारे विशिष्ट प्रकारचे वर्तन करायला भाग पाडले जाते. उदा. लाळ गाळणे हे वर्तन होण्यासाठी विशिष्ट परिस्थिती निर्माण केली जाते त्यास म्हणतात.
1) कारक अभिसंधान
3) साधक अभिसंधान
2) अभिजात अभिसंधान
4) तात्कालिक अभिसंधान
या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययनात अगोदर माहीत असलेल्या माहितीशी नवीन माहितीची सांगड घातलेली असते, या दोन्ही गोष्टींची जुळणी करणे महत्वाचे असते असे मत आसुबेल यांनी खालीलपैकी कोणत्या अध्ययन उपपत्ती मध्ये मांडले आहे?
1) अध्ययन व अनुदेशन उपपत्ती
2) क्षेत्रीय उपपत्ती
3) प्रभुत्व संपादन उपपत्ती
4) सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती
या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
स्किनरच्या मते मुलांचे अध्ययन कच्चे राहण्याचे कारण त्याचे प्रबलीकरण न होणे या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही?
1) प्रबलीकरण न होण्याचे कारण प्रोत्साहनाचा प्रभाव असणे.
2) प्रत्येक विद्यार्थ्यींची अध्ययन क्षमता सारख्या दर्जाची व पातळीची असणे,
3) अध्ययन घटकाच्या सरावाचा अभाव असणे.
4) व्यक्तीगत अध्ययन पद्धतीची सोय केल्यास प्रबलीकरण चांगले होणे,
या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
अध्ययन उपपत्तींच्या वर्गीकरणामध्ये ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाचा समावेश होत नाही?
1) गुंथ्री
2) लेविन
3) गॅने
4) ब्रूनर
या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
डॉ. ब्लूम यांनी मांडलेल्या प्रभुत्व संपादन उपपत्ती विषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही?
1) प्रभुत्त्व अध्ययनाचा संबंध निकषसंदर्भ मूल्यामापनाशी येतो.
2) प्रभुत्व अध्ययनात प्रत्येक अध्ययनायींच्या आवाक्यातील उद्दिष्ट ठरवले जाते.
3) हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अध्ययनार्थ्यर्थ्याला किती वेळ लागला हे पाहिले जाते.
4) ज्या वेळी अध्ययनार्थी अपेक्षित टप्पा गाठतो त्या वेळी त्याचे अध्ययन झाले असे समजतात.
या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
औपचारिक अध्यापन उपपत्ती या वर्गातील विशिष्ट रचनावादी अध्यापन उपपत्तीचे पुरस्कर्ता आहेत.
1) सॉक्रेटिस
2) जॉन डयूई
3) हर्बार्ट
4) गॅने
या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
अध्ययनार्थी आदर्श शोधतो, त्याचे निरीक्षण करतो, आदर्श वर्तनाचे अनुकरण करतो आणि आपल्या वर्तन प्रबलनाची आशा करतो व अध्ययन करतो, ही वैशिष्ट्ये असणारी सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली?
1) बांदूरा
2) ब्लूम
3) ब्रुनर
4) आसूबेल
या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
खालीलपैकी …………..ही सामान्य अध्यापन उपपत्ती आहे.
1) सॉक्रेटिस उपपत्ती
2) अनुदेशन उपपत्ती
3) शिक्षक-वर्तन उपपत्ती
4) गॅनेची उपपत्ती
या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
‘नव्याने येणारे अनुभव हे जुन्या अनुभवात साधर्म्य, सान्निध्य इ. नियमानुसार मिसळत जाऊन त्यांच्या साखळ्या तयार होत जातात’ असे मत मांडून साहचर्यवादावर आधारलेली प्रबोध प्रक्रियेची उपपत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने सादर केली?
1) जॉन लॉक
2) जॉन हरबार्ट
3) थॉर्नडाईक
4) स्किनर
या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
व्यक्ती व तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील आंतरक्रियांतून मर्मदृष्टी प्राप्त होते व समस्या सोडविली जाते असे मत कोहलर यांनी मांडले आणि प्रयोगाने हे सिद्ध केले याकरिता त्यांनी खालीलपैकी कोणत्या प्राण्यावर प्रयोग केले?
1) कुत्रा
2) मांजर
3) चिंपाझी
4) कबूतर
या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
खालीलपैकी …………….ही औपचारिक अध्यापन उपपत्ती आहे.
1) अनुदेश उपपत्ती
2) ब्रुनरची उपपत्ती
3) सॉक्रेटिसची उपपत्ती
4) अध्यापनाची सामान्य उपपत्ती
या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
अध्ययन उपपत्तींच्या वर्गीकरणातील साहचर्यवादी उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाचा समावेश होत नाही?
1) वॉटसन
2) गुंथी
3) हल्ल
4) आसूबेल
या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
ज्या प्रक्रियेत प्रयोज्याला वर्तन करण्यास पूर्ण स्वातंत्र्य नसते तसेच पूर्ण बंधनही नसते तर मर्यादित स्वातंत्र्य असते व प्रयोज्याला वर्तन विषयक 3-4 पर्याय दिलेले असतात. त्यास म्हणतात.
1) साधक अभिसंधान
2) कारक अभिसंधान
3) अभिजात अभिसंधान
4) तात्कालिक अभिसंधान
या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
उपपत्ती म्हणजे आपल्याला जे ज्ञात आहे, त्या आधारे कोणत्या तरी प्रकारे दृष्टीक्षेप टाकण्याची, अंदाज करण्याची आणि रचना करण्याची वृत्ती’ ही व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने दिली आहे?
1) थॉर्नडाइक
2) कॅम्पबेल
3) स्किनर
4) स्टाईल
या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
थॉर्नडाईकच्या संयोजनवादी उपपत्तीचा पाया कोणता आहे?
1) मानसशास्त्रीय निष्कर्ष हे रक्ताभिसरण संस्थेशी निगडित असणे.
2) चेतक व प्रतिसाद यांच्यामध्ये परस्परसंबंध निर्माण होणे.
3) अध्ययन प्रक्रियेत कृतीला महत्त्व न देणे.
4) चेतकाचे प्रतिसादाशी साहचर्य निर्माण झाले नाही
या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
अध्ययन उपपत्तींच्या ‘ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती’ या वर्गात खालीलपैकी कोणत्या उपपत्तींचा समावेश होत नाही?
1) गेस्टॉल्टची समाकारवादी उपपत्ती
2) कुर्ट लेवीनची क्षेत्रीय उपपत्ती
3) टॉलमनची संकेत अध्ययन उपपत्ती
4) स्किनरची साधक अभिसंधान उपपत्ती
या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
खालीलपैकी कोणता अध्ययन प्रकार टॉलमनच्या उपपत्तीनुसार आहे?
1) लोपन अध्ययन
2) शिक्षा अध्ययन
3) गरज शमन
4) सुटका अध्ययन
या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
जेव्हा अध्ययनकती नवीन परिस्थितीमध्ये प्रतिसाद देतांना पूर्वानुभवाचा उपयोग करतो तसेच नवीन नवीन परिस्थितीशी साधर्म्य असणाऱ्या जुन्या परिस्थितीत दिलेला प्रतिसाद तो नवीन परिस्थितीत देतो तेव्हा थॉर्नडाईकच्या कोणत्या उपनियमाचा वापर केला जातो?
1) प्रतिक्रियांच्या वैविध्याचा नियम
2) प्रतिक्रियांच्या समानतेचा नियम
3) मांडणी किंवा रचना
4) घटकांची पूर्वशक्ती
या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
नॉर्मन इ.जी. यांनी सांगितलेल्या प्रभूत्त्व संपादन उपपत्तीचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही?
1) उद्दिष्टे विधानात्मक व कार्यात्मकरितीने मांडणे.
2) उद्दिष्टे उतरत्या क्रमाने अध्ययन निष्पत्तीसह स्पष्टपणे मांडणे
3) ताबडतोब प्राप्त होणारी उद्दिष्टे स्पष्ट करणे.
4) लहानात लहान घटक तयार करणे.
या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक
ब्रुनर यांनी मांडलेल्या बौद्धिक विकासात्मक अनुदेशन उपपत्तीचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही?
1) अध्यपनपूर्व रचना
2) ज्ञानाची रचना
3) क्रम
4) वर्तन
या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
थॉर्नडाईकच्या संयोजनवादी उपपत्तीमध्ये भुकेल्या मांजरावर प्रयोग केल्यावर अध्ययन प्रक्रियेची पुढीलपैकी कोणती वैशिष्टये दिसून येतात ?
1) सज्जता, प्रेरणा, तयारी, दृढीकरण
2) तयारी, सज्जता, प्रेरणा, पुनरावृत्ती
3) प्रेरणा, शोधनात्मक हालचाली, योगायोगाने यश, यशामुळे दृढीकरण
4) सज्जता, पुनरावृत्ती, योगायोगाने यश, यशामुळे दृढीकरण
या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
प्रयत्नप्रमाद पद्धतीच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने: सत्य आहेत?
अ) या पद्धतीने अध्ययन करताना प्रगती अगदी सावकाश होते.
ब) अनावश्यक हालचालीमुळे अधिक श्रम होतात.
क) या पद्धतीत मिळविलेले यश हा पुष्कळवेळा शुद्ध
योगायोग असतो.
ड) संपादित कौशल्ये दुसऱ्या परिस्थितीत सहज संक्रमित होतात.
1) अ, ब आणि ड
2) ब, क आणि ड
3) अ, ब आणि क
4) अ, ब, क, ड, सर्व
या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
एका वेळी एक पायरी, ताबडतोब पडताळा, सक्रिय प्रतिसाद ही तत्त्वे असलेले क्रमन्वित अध्ययन खालीलपैकी कोणत्या उपपत्तीवर आधारलेले आहे ?
1) अभिजात अभिसंधान
2) प्रयत्नप्रमाद उपपत्ती
3) साधक अभिसंधान
4) मर्मदृष्टी अध्ययन
या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3









