निवडणूक वा अन्य कामांकरीता प्रतिनियुक्तीने नियुक्त शिक्षकांना त्यांचे मूळ आस्थापनेवर रुजू होण्यासाठी तात्काळ कार्यमुक्त करणेबाबत nivdnuk paripatrak
संदर्भ –
१) शासन पत्र क्र संकीर्ण २०२६/प्र.क्र. १७६/ टीएनटी-१, दि.३० मार्च, २०२६
२) या कार्यालयाचे दि.०६/०४/२०२६ चे पत्र
३) शासन पत्र क्र. संकीर्ण-२०२६/प्र.क्र.१७६/टोएनटी-१, दि.०८ एप्रिल, २०२६
४) या कार्यालयाचे दिनांक २७.०४.२०२६ चे पत्र
५) दिनांक ०९.०५.२०२६ रोजीच्या बैठकीतील निर्देश
६) या कार्यालयाचे समक्रमांक प्रशिसं/संकीर्ण – ८०२/निकाप्रनि/२०२६/१८९४५१ दि १३.०५.२०२६
उपरोक्त विषयाबाबतचे या कार्यालयाचे संदर्भ क्र ६ चे पत्र पहावे.
उपरोक्त संदर्भ क्र १ व ३ च्या पत्रास अनुसरुन या कार्यालयाने संदर्भ क्र २ अन्वये सर्व क्षेत्रिय कार्यालयांकडून शासन पत्राच्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शिक्षण संस्थांमधील किती शिक्षक निवडणूक व अन्य कामांकरीता प्रतिनियुक्तीने कार्यरत आहेत अशा शिक्षकांना त्यांचे मूळ आस्थापनेवर रुजू होण्यासाठी कार्यमुक्त करण्याचे निर्देश संदर्भ क्र ६ अन्वये दिलेले आहेत.
तथापि असे निदर्शनास येत आहे की, काही शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी हे आपले मूळ काम सांभाळून बुथ लेवल ऑफीसर (BLO) म्हणून काम करीत आहेत. बुथ लेवल ऑफीसर चे कामकाज हे प्रतिनियुक्तीचे नाही. बुथ लेवल ऑफीसर (BLO) चे काम हे अतिरिक्त वेळेत करावयाचे असल्याने त्यांना कार्यमुक्त करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. करीता संदर्भ क्र ६ अन्वये दिलेल्या निर्देशानुसार कार्यवाही करुन अहवाल नमूद कालावधीतच सादर करावा.











