मित्र उपक्रमाची अंमलबजावणी करणेबाबत mitra upkram paripatrak
संदर्भ :- १) शासन परिपत्रक क्र. संकीर्ण २०११ (२९६/११) माशि-३, दि. ५ आक्टोबर, २०११ आणि २७/०१/२०१२.
२) मा. आयुक्त (शिक्षण) म.रा. पुणे यांचे पत्र जा. क्र. शिक्षण आयुक्ता/ विप, स/२०२०-२१/४३, दि ०८ डिसेंबर, २०२०
३) विपश्यना विशोधन संस्था (विपश्यना रिसर्च इन्स्टिट्यूट) यांचे पत्र दि. ४/०२/२०२६
४) कक्ष अधिकारी, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई, यांचे पत्र क्रमांकः- संकीर्ण-
२०२६/प्र.क्र.७८/एस.डी. ४ दि.०८ मे, २०२६
प्रस्तुत कार्यालय पत्र SCERT-४६.०/२३/२०२६-ART & SPORTS /१८९२८९८/२०२६ दि.
१२.०५.२०२६
६) विपश्यना विशोधन संस्था (विपश्यना रिसर्च इन्स्टिट्यूट) यांचे पत्र दि. १८/०५/२०२६
उपरोक्त संदर्भ क्र. ५ नुसार प्रस्तुत कार्यालयामार्फत मित्र उपक्रमाबाबत निर्देश देण्यात आलेले होते. सदर पत्रामध्ये मित्र उपक्रमांतर्गत राज्यातील अनेक शाळांमध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांना बानापान साधनेचे अंदाजितु २ तासाचे प्रशिक्षण देऊन दररोज १० मिनिटांचा सराव केला जात आहे. तसेच अनेक शिक्षक १० दिवसांचे विना साधना शिबिरात सहभागी झाले आहेत. यासाठी शासनाने २७ जानेवारी, २०१२ रोजी सविस्तर परिपत्रक निर्गमित करण्यात आले होते. यानंतर वेळोवेळी याबाबत शिक्षण विभागाने परिपत्रके काढून हा उपक्रम राबविण्यात येणाऱ्या अडचणी दूर केल्या आहेत. सदरचा कार्यक्रम राज्यातील सर्व इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मानसिक व बौद्धिक वाढीकरिता उपयुक्त ठरणार आहे.
संदर्भ क्र. ४ मध्ये नमूद केल्याप्रमाणे मित्र उपक्रमा अंतर्गत ज्या शिक्षकांनी १० दिवसांचा विपश्यना अभ्यासक्रम पूर्ण केलेला नाही त्यांना तीन तासांचे आनापान प्रशिक्षण घेणे संदर्भात निर्देश देण्यात आलेले आहेत. आपल्या स्तरावरून दरमहा केंद्रस्तरीय शिक्षण परिषदांचे आयोजन केले जाते, केंद्रस्तरीय शिक्षण परिषद्धांमधील विषयाचे प्राधान्यक्रम ठरवून मित्र उपक्रमाचे नियोजन करण्यात यावे.
सोबत : शासन परिपत्रक.










