शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करीता समग्र शिक्षा व पीएमश्री अंतर्गत इयत्ता ३ री व ४ थी व ६ वीसाठी पाठ्यपुस्तकांचा पुरवठा तसेच मंडळाच्या हीरक महोत्सव २०२६ निमित्त पाठ्येतर पुस्तकांचे राज्यातील शासकीय शाळांना मोफत वितरण करण्याबाबत samagra shiksha pmshri

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करीता समग्र शिक्षा व पीएमश्री अंतर्गत इयत्ता ३ री व ४ थी व ६ वीसाठी पाठ्यपुस्तकांचा पुरवठा तसेच मंडळाच्या हीरक महोत्सव २०२६ निमित्त पाठ्येतर पुस्तकांचे राज्यातील शासकीय शाळांना मोफत वितरण करण्याबाबत samagra shiksha pmshri 

संदर्भः-१) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०२५/प्र.क्र.९४/एस.डी.-४ दिनांक १६.०४.२०२५

२) राज्यस्तरीय समन्वय समितीचे दिनांक १३.१०.२०२५ रोचीच्या बैठकीचे इतिवृत्त.

३) नियामक मंडळ ठराव क्रमांक ५५९९ दिनांक ०५.०५.२०२६

४) महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ यांचे पत्र

दि.२६/०५/२०२६

सदर्भ क्रमांक १ अन्वये राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार तयार करण्यात आलेल्या नवीन अभ्यासक्रमानुसार शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये इयत्ता २ री, ३ री, ४ थी व ६ वीची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित करुन विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दयावयाची आहेत.

पाठ्यपुस्तक मंडळाच्या दिनांक ०५.०५.२०२६ रोजी झालेल्या नियामक मंडळाच्या सभेत शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७करिता राज्यातील शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व शासन अनुदानित शाळांना इयत्ता ३ री व ४ थीसाठी शारीरिक शिक्षण व निरामयता, कार्यशिक्षण, कलाशिक्षण तसेच इयत्ता ६ वीसाठी शारीरिक शिक्षण व निरामयता, व्यावसायिक शिक्षण, कलाशिक्षण ही अनिवार्य पाठ्यपुस्तके मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दू माध्यमांच्या शाळांसाठी प्रत्येकी २ संच उपलब्ध करून देण्याचे ठरले आहे.

तसेच ‘बालभारती हीरक महोत्सव २०२६० वर्षानिमित्त प्रकाशित केलेले (१) बालभारतीच्या कविता (२) स्फूर्तीगीते (३) ५० किशोर गोष्टी भाग-२ (४) डोके नसलेला माणूस (चित्रकथा) व (५) थोरांची ओळख तसेच (६) माझा पहिला इंग्रजी-मराठी शब्दकोश या सहा पाठ्येतर पुस्तकांचा प्रत्येकी १ संच मंडळामार्फत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना मोफत उपलब्ध करून देण्याचे ठरले आहे.

वरील निर्णयाच्या अनुषंगाने समग्र शिक्षा व पीएमश्री अंतर्गत इयत्ता ३ री, ४ थी व ६ वी साठी मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दू माध्यमांच्या शाळांना पाठ्यपुस्तकांच्या प्रत्येकी २ प्रती उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. व इतर माध्यमांसाठी सदरची पाठ्यपुस्तके मंडळाच्या ‘ई-बालभारती’ https://books.ebalbharati.in/ या वेबसाईटवर PDF स्वरूपात प्रकाशित करण्यात येतील. तसेच ‘बालभारती हीरक महोत्सव २०२६० वर्षानिमित्त सहा पाठ्येतर पुस्तकांचा प्रत्येकी १ संच मंडळामार्फत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उपरोक्तबाबत आपल्यास्तरावरून सर्व शाळांना अवगत करण्यात यावे व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास पाठवण्यात यावा.

Related posts:

Leave a Comment