राष्ट्रीय योग ऑलिम्पियाड २०२६ अंतर्गत आयोजित ऑनलाईन प्रश्न मंजुषा स्पर्धेच्या नोंदणी आणि आयोजनाबाबत yog online prashnamanjusha
संदर्भ
: १. मा.प्रा. गौरी श्रीवास्तव, अधिष्ठाता / विभाग प्रमुख, डीईएसएस, एनसीईआरटी यांचे पत्र जा.क्र. F.No.२-१/२०२६-२७/९.४.७.४/NYO २६/५४२, दिनांक १४ मे, २०२६.
२. राष्ट्रीय योग ऑलिम्पियाड २०२६ च्या मार्गदर्शक सूचना.
३. प्रस्तुत कार्यालयाचे पत्र SCERT-४६.०/२७/२०२६-ART & SPORTS //१९०९०५८/२०२६
दि. १५.०५.२०२६
४. शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, नवी दिल्ली यांचेमार्फत आयोजित राष्ट्रीय योग ऑलिम्पियाड २०२६ राज्य नोडल अधिकारी यांच्या ऑनलाईन बैठकीतील सूचना दि. ०१.०६.२०२६
उपरोक्त संदर्भ क्र. ३ नुसार सूचित करण्यात आले होते की, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय योग ऑलिम्पियाड २०२६ अंतर्गत ऑनलाईन प्रश्न मंजुषा स्पर्धा दि. १५ ते १८ जून, २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच दि. २१ जून, २०२६ रोजी साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने सर्व शाळांनी योग विषयक विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे. त्यासंदर्भात पुढील सूचना देण्यात आलेल्या होत्या. १. आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांनी ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेत विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त
सहभाग असावा यासाठी प्रयत्न करावा.
२. विद्यार्थ्यांची नोंदणी NYO पोर्टल वर पुढील लिंकद्वारे करावी.
https://www.nvoncert.in/registration2026/register.php ३. राष्ट्रीय योग ऑलिम्पियाड २०२६ च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ऑनलाईन प्रश्नमंजुषेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला डिजीटल सहभाग प्रमाणपत्र मिळेल.
४. स्पर्धेच्या प्रत्येक टप्प्यावर प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.
५. शाळास्तरावर पुढील सर्जनशील उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे. त्यामध्ये चित्रकला, पोस्टर तयार करणे, घोषवाक्य लेखन, कविता लेखन व निबंध लेखन इ. स्पर्धा
६. योग ऑलिम्पियाडच्या योजनेविषयी सविस्तर माहिती व नोडल अधिकाऱ्यांचा (एनसीईआरटी) संपर्क तपशील, मार्गदर्शक तत्त्वे, वेळापत्रक आणि इतर महत्त्वाच्या सूचना www.nyoncert.in या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहेत.
संदर्भ क्र. ४ नुसार राष्ट्रीय योग ऑलिम्पियाड २०२६ अंतर्गत आयोजित ऑनलाईन प्रश्न मंजुषा स्पर्धेच्या नोंदणी दि. १० जून, २०२६ पर्यंत वरील लिंकवर करता येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे त्यांना राष्ट्रीय योग ऑलिम्पियाड २०२६ अंतर्गत ऑनलाईन प्रश्न मंजुषा स्पर्धत वेबसाईटवर (www.nyoncert.in) देण्यात आलेल्या नियोजनानुसार दि. १५ ते १८ जून, २०२६ या कालावधीत विद्यार्थ्यांना सहभाग घेता येणार आहे.
तरी सदर राष्ट्रीय योग ऑलिम्पियाड २०२६ व आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमापूर्वी आयोजित ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सहभाग होण्यासाठी आपल्या स्तरावरून आदेशित करण्यात यावे.










