दिव्यांग संवर्गातील शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परिक्षा (TET) मध्ये 15% गुणांची सवलत मिळणे बाबत teacher eligibility test
संदर्भ :- १. शासन निर्णय क्र. बैठक-2021/प्र.क्र.153/टीईटी- १ ३० जून २०२२
२. राज्याध्यक्ष, श्री साईनाथ पवार, महाराष्ट्र राज्य दिव्यांग (अपंग) कर्मचारी संघटना यांचे निवेदन दिनांक २०/०४/२०२६
उपरोक्त विषयान्वये कळविण्यात येते कि, संदर्भ क्र. ०२ अन्वये राज्याध्यक्ष, श्री साईनाथ पवार, महाराष्ट्र राज्य दिव्यांग (अपंग) कर्मचारी संघटना यांचे निवेदन दिनांक २०/०४/२०२६ रोजी या आयुक्तालयास प्राप्त झाले आहे. सदर निवेदनामध्ये दिव्यांग संवर्गातील शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परिक्षा (TET) मध्ये १५% गुणांची सवलत मिळणे बाबत विनंती करण्यात आली आहे.
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम-२०१६ नुसार दिव्यांगाचे २१ प्रकार वर्गीकृत करण्यात आलेले आहेत. या २१ दिव्यांग प्रवर्गामध्ये समाविष्ठ होणा-या दिव्यांगांना देखील त्यांच्या दिव्यांगत्वामुळे शिक्षक पात्रता परिक्षा TET मध्ये इतर सर्वसामान्य उमेदवारांप्रमाणे गुण प्राप्त होत नाहीत. त्यामुळे या दिव्यांग उमेदवारांना देखील शिक्षक पात्रता परिक्षा TET मध्ये 15% गुणांची सवलत देणे आवश्यक आहे. अशी संदर्भ क्र. ०२ च्या निवेदनामध्ये मागणी केलेली आहे.
या पत्राद्वारे आपणास कळविण्यात येते की, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांमधील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांची पदे भरण्यासाठी पवित्र प्रणालीमार्फत घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेत विहित आरक्षणानुसार (TET) माजी सैनिक, शहिद सैनिकांच्या पत्नी व त्यांचे कुटुंबिय यांना १५% गुणांची सवलत देण्यास मान्यता देण्यात आली आहे. म्हणजेच, सदर गटातील उमेदवारांना उत्तीर्ण होण्यासाठी ४५% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. त्याच धर्तीवर दिव्यांग उमेदवारांना देखील शिक्षक पात्रता परिक्षा TET मध्ये १५% गुणांची सवलत देणे आवश्यक आहे.
सदर प्रकरणी आपल्या स्तरावरुन योग्य ती कार्यवाही करण्यास विनंती आहे.









