शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या सोयी सुविधांमध्ये सुसुत्रता आणणेबाबत एकत्रित सुधारित नियमावली soyisuvidha sudharit niyamavali 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या सोयी सुविधांमध्ये सुसुत्रता आणणेबाबत एकत्रित सुधारित नियमावली soyisuvidha sudharit niyamavali 

महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय क्र. आवगृ-१३२५/प्र.क्र.१५४/का.१२, मंत्रालय विस्तार, मुंबई – ३२

दिनांक :- १४ ऑगस्ट, २०२६

वाचा :-

१. शासन निर्णय क्र. आवगृ-१२०४/प्र.क्र.५२/का.१२, दिनांक ३ ऑगस्ट, २००४

२. शासन निर्णय क्र. आवगृ-२०११/प्र.क्र.१७१/का. १२, दिनांक ११ नोव्हेंबर, २०११

३. शासन शुध्दीपत्रक क्र. आवगृ-२०११/प्र.क्र.१७१/का.१२ दिनांक १० एप्रिल, २०१३

४. शासन शुध्दीपत्रक क्र. आवगृ-२०११/प्र.क्र.१७१/का.१२ दिनांक २९ जून, २०१३.

५. शासन शुद्धीपत्रक क्र. आवगृ-२०११/प्र.क्र.१७१/का.१२, दि.१८ जुलै, २०१३

६. शासन निर्णय क्र. आवगृ-१३२५/प्र.क्र.१५४/का १२ दि. ५ ऑगस्ट, २०२६

प्रस्तावना :-

आदिवासी विकास विभागामार्फत राज्यातील अनुसूचित जमातीच्या मुला-मुलींना माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविदयालयीन शिक्षण घेता यावे याकरीता ४९४ वसतीगृह मंजूर असून सध्या एकूण ४९० शासकीय वसतीगृहे कार्यरत आहेत. शासकीय वसतीगृहातील प्रवेशित विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या सोयी सुविधांबाबतच्या धोरणानुसार संदर्भाधीन शासन निर्णयान्वये नियमावली निश्चित करण्यात आली असून वेळोवेळी काही बदल/सुधारणा करण्यात आल्या आहेत. तथापि, प्रचलित विविध शासन निर्णयांन्वये वसतीगृहांचे नियमन करण्यात येत असल्याने सर्व शासन निर्णयांचे एकत्रिकरण करुन दिनांक ५ ऑगस्ट, २०२६ च्या शासन निर्णयान्वये सुधारित आदेश निर्गमित करण्यात आले होते. यांसदर्भात सदर शासन निर्णयातील काही तरतूदींबाबत विद्यार्थ्यांकडून आक्षेप उपस्थित करण्यात आले होते. यासंदर्भात चारही अपर आयुक्तांच्या कार्यक्षेत्रातील विद्यार्थी प्रतिनिधींसोबत चर्चा करण्यात आली व त्यानुसार सदर शासन निर्णयात सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

शासकीय वसतिगृहांतील सोयी सुविधांसंबंधीत उक्त संदर्भाधीन अ.क्र.१ ते ६ मधील नमूद शासन निर्णय अधिक्रमित करुन या शासन निर्णयान्वये शासकीय वसतीगृहातील विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या सोयी सुविधा व प्रवेश नियमावली मध्ये सुसूत्रता आणण्यासाठी या शासन निर्णयान्वये एकत्रित नियमावली निर्गमित करण्यात येत आहेत.

१. विभागाच्या अधिपत्याखालील सर्व शासकीय वसतीगृहांमध्ये प्रवेशासंबंधी परिशिष्ट अ प्रमाणे प्रवेश नियमावली लागू करण्यात येत असून सदर प्रवेश प्रकियेचे कामकाज सदर परिशिष्टात विहीत केलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे व तरतुदींप्रमाणे काटेकोरपणे पार पाडण्यात यावे.

२. विभागाच्या अधिपत्याखालील सर्व शासकीय वसतीगृहांना या शासन निर्णयासोबत जोडण्यात आलेल्या परिशिष्ट ब व क प्रमाणे सोयीसुविधा लागू करण्यात येत आहेत. खरेदी/मंजूरी विषयक उर्वरित सर्व बाबींकरीता प्रचलित शासन कार्यपध्दती अनुसरण्यात यावी.

३. वसतीगृहातील प्रोशित विद्यार्थी/विद्यार्थीनीनी परिशिष्ट-ड मध्यो नमूद केल्यानुसार नियमावलीचे काटेकोरपणे पालन करावे,

४. परिशिष्ट- ४ मध्ये दर्शविल्याप्रमाणे शासकीय वसतीगृह प्रमुखांनी नियमितपणे अहवाल सादर करागेत

५. परिशिष्ट- फ मध्ये नमूद केल्यानुसार शासकीय वसतीगृहांची नियमित तपासणी व लेखापरिक्षण करण्यात यावे

६. वसतीगृहाचे गृहप्रमुख गृहपाल यांची कार्यसूची, अधिकार, कर्तव्ये व जबाबदा-या परिशिष्ट- मध्ये विद्दीत करण्यात आले आहे. त्यानुसार त्यांचे पालन करावे.

प्रत्येक वसतीगृहामध्ये परिशिष्ट-घनखे नोंदविल्याप्रमाणे नोंदवह‌या ठेवण्यात याव्यात.

८. सदर प्रयोजनार्थ होणारा खर्च संबंधित लेखाशीर्षालालील मंजूर वरतुदीमधून मागविण्यात यावा.

सदर आदेश शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून अंगलात येईल.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर

उपलब्ध करण्यात जाला असून त्याचा संकेताक क्रमांक २०२६०८१४१४०८०६२४२४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वावारीने सानाकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

शासन निर्णय pdf download 

Related posts:

Leave a Comment