इ.११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन २०२६-२७ जाहीर प्रकटन eleventh online pravesh prakriya
शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य,
मध्यवर्ती इमारत, डॉ. अॅनी बेझंट मार्ग, पुणे-४११००१.
इ. ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन २०२६-२७
जाहीर प्रकटन
शैक्षणिक सत्र २०२६-२७ मधील इयत्ता ११ वी केंद्रिय ऑनलाईन प्रवेश सुरु करण्यात आली आहे. राज्यातील एकूण ९६४९ कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. आत्तापर्यंत एकूण १३,७६,४४९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
एकूण नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी ५,९७,८५२ विद्याध्योनी प्रवेश प्रक्रियेतील दुस-या नियमित फेरीकरीता प्रवेश अर्जाचा भाग-१ (नोंदणी) आणि भाग-२ (कनिष्ठ महाविद्यालय पसंतीक्रम) अंतिमतः सहभाग नोंदविला आहे. त्या विद्याथ्यांपैकी २,६५,५६२ विद्यार्थ्यांना दिनांक १४/०६/२०२६ रोजी अलॉटमेंट देण्यात आली आहे.
दिनांक १६/०६/२०२६ रोजी पर्यंत एकूण १,९०,७६६ विद्याथ्यांनी त्यांचे प्रवेश कनिष्ठ महाविद्यालयात निश्चित केले आहेत. कॅपमध्ये एकूण १,५९,७५१ इतके प्रवेश झालेले आहेत. तसेच कोटामध्ये (ईनहाऊस कोटा, व्यवस्थापन कोटा, अल्पसंख्यांक कोटा) ३१,०१५ इतके प्रवेश झालेले आहेत. त्यांचा विभागनिहाय तपशील खालील तक्त्यात नमूदप्रमाणे :-
दिनांक १८ जून २०२६ रोजी दुपारी ०३.०० वा. पासून नियमित फेरी ३ ची प्रक्रिया सुरु करण्यात येणार असून सोबत नियमित फेरी ०३ चे वेळापत्रक जोडून देण्यात येत आहे. विद्यार्थी / पालक तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य यांनी याची नोंद घ्यावी. या बाबीची व्यापक स्वरुपात प्रसिध्दी देण्यात यावी. ही विनंती.
अधिकृत पोर्टल-https://mahafyjcadmissions.in
ई-मेल आयडी support@mahafyjcadmissions.in

वेळापत्रक नियमित फेरी











