सन २०२६-२७ मधील शालेय व इतर क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याबाबत shaley kridaspardha ayojan

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सन २०२६-२७ मधील शालेय व इतर क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याबाबत shaley kridaspardha ayojan

विषयः सन २०२६-२७ मधील शालेय व इतर क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याबाबत

संदर्भः

१. शासन निर्णय क्र. राक्रीधो-२०१२/प्र.क्र.१८२/क्रीयुसे-२, दि. २४ डिसेंबर २०१४.

२. शासनपत्र क्र. राक्रीधो२०१८/प्र.क्र.७२/क्रीयुसे-२ दि. २७ ऑगस्ट २०१८.

३. शासनपत्र क्र. संकीर्ण १७१५/प्र.क्र.६५भाग-१/क्रीयुसे-२ दि.३.११.२०१८.

४. शासनपत्र क्र. संकीर्ण १७१९/प्र.क्र.२५/क्रीयुसे-२ दि.३१ जुलै २०१९.

५. शासनपत्र क्र. राक्रीधो २०१८/प्र.क्र.७२/क्रीयुसे-२, दि. ८ नोव्हेंबर २०१९.

६. शासनपत्र क्र. राक्रीधो २०१८/प्र.क्र.७२/क्रीयुसे-२ दि. ३ फेब्रुवारी २०२०.

७. शासनपत्र क्र. राक्रीधो २०१८/प्र.क्र.७२/क्रीयुसे-२ दि. ६ मार्च २०२०.

८. शासनपत्र क्र. राक्रीधो २०१८/प्र.क्र.७२/क्रीयुसे-२ दि.१६ सप्टेबर २०२२.

९. संचालनालयाचे पत्र क्र. क्रीयुसे/शाक्रीस्प/आयोजन/२०२२-२३/का-४/४००० दिनांक १९.०९.२०२२.

१०. शासन पत्र क्र. SD-१२०१६/६/२०२५ (७-१४९०६४८) दिनांक: ०९ जानेवारी २०२६

११. संचालनालयाचे पत्र क्र. क्रीयुसे/शाक्रीस्प/आयोजन/२०२५-२६/का-४/६७९८ दिनांकः ३० जानेवारी २०२६.

१२. संचालनालयाचे पत्र क्र. क्रीयुसे/शाक्रीस्प/वय/कागदपत्रे/२०२५-२६/का-४/४७५२ दिनांक: ०८ ऑक्टोबर २०२५.

१३. शासनपत्र क्र. SD-१२०१६/२/२०२५/(१३९३०२६)/क्रीयुसे-२ दि. ०४ डिसेंबर २०२५.

वरील संदर्भिय शासनपत्र क्रमांक २ ते ७ व १० अन्वये, शासनाने शालेय व इतर क्रीडा स्पर्धेत समावेश केलेल्या ९३ खेळप्रकारांचे आयोजन करण्यास मान्यता प्रदान केली असून, संदर्भ क्रमांक ९ व ११ अनुसार राज्यात सदर स्पर्धांचे आयोजन करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत.

सन २०२६-२७ मधील भारतीय शालेय खेळ महासंघ पुरस्कृत राष्ट्रीय शालेय कीडा स्पर्धा, सुब्रतो मुखर्जी राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा व नेहरु कप राष्ट्रीय हॉकी स्पर्धांच्या राष्ट्रीय स्पर्धा कार्यक्रमांनुसार, सदर राष्ट्रीय स्पर्धेमध्ये राज्यांचे संघ सहभागी होणार आहेत.

शासनाकडून वेळोवेळी प्राप्त निर्देश व संदर्भीय शासन निर्णयामधील तरतुदीनुसार खालील नमूद खेळप्रकारांचे आयोजन त्यापुढील नमूर वयोगटांत विहीत वेळेत पूर्ण करावे.

उपरोक्त ९४ क्रीडाप्रकारांचे आयोजन एकविध खेळाच्या आंतरराष्ट्रीय संघटना, “भारतीय शालेय खेळ महासंघ”, “सुब्रोतो मुखर्जी स्पोर्टस् एज्युकेशन सोसायटी” तथा “जवाहरलाल नेहरु हॉकी टूर्नामेंट सोसायटी” यांच्या प्रचलित नियमानुसार करावे.

प्रचलित पध्दतीनुसार तालुकास्तरावर अनिवार्य असलेल्या कुस्ती, कबड्डी, खो-खो, अॅथलेटिक्स व व्हॉलीबॉल या ०५ व जिल्हा क्रीडा परीषदेने मान्यता दिलेल्या ०५ अशा एकुण १० खेळप्रकारांचे आयोजन करावे. तसेच जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर वरील नमूद तक्त्यातील एकुण ९४ क्रीडाप्रकारांचे आयोजन करावे.

अ. क्र. १ ते ४८ येथील खेळांच्या आयोजनासाठी संदर्भ क्रमांक १ मधील तरतुदीनुसार निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच अनुक्रमांक ४९ ते ९४ येथील खेळ प्रकारांचे आयोजन हे दिरंगाई न करता संदर्भ क्रमांक २ ते ७ व १० मधील नमुद अटी व शर्तीच्या अधीन राहून संबंधित खेळ संघटनेच्या संपूर्णपणे तांत्रिक व आर्थिक जबाबदारीने विहीत वेळेत पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी.

“भारतीय शालेय खेळ महासंघ” तसेच “सुब्रोतो मुखर्जी स्पोर्टस् एज्युकेशन सोसायटीने”, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना “Age Verification Test” अनिवार्य केली आहे. त्यानुसार संदर्भक्रमांक १२ अन्वये विविध स्तरावर शालेय व इतर क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंच्या वयनिश्चितीसाठी मार्गदर्शक सूचना तथा निर्देश पारीत करण्यात आले आहेत. त्याबाबत जिल्ह्यातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडा व शैक्षणिक संस्थाना अवगत करावे व सदर निर्देशांचे पालन होईल याची दक्षता घ्यावी.

शालेय क्रीडा स्पर्धा, सुब्रोतो कप फुटबॉल स्पर्धा तसेच नेहरु कप हॉकी या खेळांच्या राष्ट्रीय स्पर्धा कार्यक्रमांनुसार विविध स्तरावरील स्पर्धांचा कालावधी निश्चित करावा. राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा आयोजन स्थळनिश्चिती व त्या अनुशंगिक आवश्यक सूचना यथावकाश कळविण्यात येतील.

क्षेत्रीय कार्यालयांद्वारा गतवर्षीपर्यंत विविध स्तरावरील शालेय व इतर क्रीडा स्पर्धाच्या आयोजनांसाठी स्वतंत्रपणे संकेतस्थळ (Online Portal) वापरण्यात येत होते. तथापि सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून, संचालनालय स्तरावर विकसित केलेल्या संकेतस्थळ (Online Portal) द्वारे शालेय व इतर क्रीडा स्पर्धेचे आयोजन करणे प्रस्तावित असून त्याबाबत लवकरच आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना तसेच निर्देश पारीत करण्यात येतील.

तथापी सुब्रोतो कप राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धांचा कार्यक्रम लक्षांत घेता सदर स्पर्धांचे आयोजन ऑफलाईन पध्दती किंवा जिल्हा स्तरावर यापुर्वी वापरत असलेल्या संकेतस्थळ (Online Portal) द्वारे विहीत वेळेत पुर्ण करण्याची दक्षता घ्यावी.

सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून, सी.बी.एस.ई., नवोदय विद्यालय, विद्या भारती, केंद्रीय विद्यालय संघटन अशा राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय शैक्षणिक तत्सम बोर्डाच्या शाळामध्ये शिकत असलेल्या खेळाडूंना, विशिष्ट खेळप्रकारांत त्या त्या शैक्षणिक बोर्ड अथवा क्रीडा विभाग आयोजित स्पर्धा यापैकी कोणत्याही एकाच ठिकाणी सहभागाची संधी द्यावी. तथापी संबंधित खेळाडू अन्य क्रीडा प्रकारात सहभागी होत असेल तर क्रीडा विभाग आयोजित शालेय क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊ शकेल.

उदाहरणार्थः “क्ष” हा खेळाडू सी.वी.एस.ई. अथवा तत्सम बोर्डाच्या प्रशालेत शिकत आहे. तो सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात बॅडमिंटन या क्रीडा प्रकारात सी.बी.एस.ई. अथवा तत्सम बोर्डाद्वारा आयोजित शालेय क्रीडा स्पर्धेत सहभागी झाल्यास त्याला क्रीडा विभागाद्वारे आयोजित शालेय बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. तथापि, “क्ष” हा खेळाडू अन्य खेळप्रकारात क्रीडा विभागाद्वारे आयोजित शालेय क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊ शकेल.

म्हणजेच संबंधित खेळाडूंना विशिष्ट खेळप्रकारात कोणत्याही एकाच विभागाद्वारे आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये सहभागी होता येईल. तथापि, एकाच खेळप्रकारात सी.बी.एस.ई., नवोदय विद्यालय, विद्या भारती, केंद्रीय विद्यालय संघटन अशा तत्सम राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय शैक्षणिक बोर्ड व क्रीडा विभाग अशा दोन्ही ठिकाणी आयोजित स्पर्धेत सहभागी झाल्याचे सिध्द झाल्यास संबंधित खेळाडू/संघास त्या वर्षीच्या उर्वरीत स्पर्धा व आगामी वर्षातील स्पर्धेतील सहभागांपासून वंचित ठेवण्याबाबतची कारवाई करावी.

विविध स्तरावरील क्रीडा स्पर्धांचे आयोजन करताना, सुयोग्य क्रीडांगण, आवश्यक क्रीडा साहित्य, पिण्यासाठी स्वच्छ पाणीपुरवठा, स्वच्छतागृहे, रुग्णवाहिका व प्रथमोपचार साहित्य, तज्ञ पंच व इतर आवश्यक बाबींची उपलब्धता करुन द्यावी.

जिल्हा, विभाग, राज्य तसेच राष्ट्रीय शालेय व इतर क्रीडा स्पर्धेतील पात्र खेळाडूंना क्रीडागुणांची सवलत देण्यात येत असल्याने तृतीय क्रमांकाचे सामने आयोजित करावेत.

शालेय व इतर क्रीडा स्पर्धेचे आयोजन करतांना संदर्भीय शासन निर्णय व शासन पत्रांमधील नमूद सर्व अटी, शर्ती तथा सुचनांचे पालन होईल याची दक्षता घ्यावी.

(मा. आयुक्त महोदयांच्या मान्यतेने)

Related posts:

Leave a Comment