क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सन २०२५-२६ करीता आवेदने ऑनलाईन मागविण्याबाबत shikshak gungaurav puraskar 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सन २०२५-२६ करीता आवेदने ऑनलाईन मागविण्याबाबत shikshak gungaurav puraskar

संदर्भ :-

१. शासन निर्णय क्र. पीटीसी-२०२२/प्र.क्र.३४/टीएनटी-४ दि.१६/०७/२०२५.

२. शासन पत्र क्र. पीटीसी-२०२६/प्र.क्र.४६/टीएनटी-४ दि.२६/०५/२०२६.

३. संचालनालयाचे पत्र क्रमांक १९७६९१०/दिनांक २३/०६/२०२६

उपरोक्त विषयाबाबत आपणास कळविण्यात येते की, संचालनालयाच्या संदर्भीय क्रमांक ३ अन्वये शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी हे पुरस्कार वस्तूनिष्ठ निकषाव्दारे प्रदान करण्यात येणार आहेत. पुरस्कारासाठी आवेदने सादर करू इच्छिणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक/उच्च माध्यमिक शिक्षकांनी पुढे नमूद केल्यानुसार वेबलिंकवर https://forms.gle/EgZ२६६AqNDxFJDZW८ या लिंकवर आपली आवेदने दिनांक २७ जून, २०२६ रोजी सकाळी १०.०० वा. पासून दिनांक १० जुलै, २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वा. पर्यंत सादर करावीत, असे सूचित करण्यात आलेले होते.

तथापि पुरस्कारासाठी असणाऱ्या अल्प आवेदनांची संख्या पाहता पुरस्कारासाठी आवेदने भरण्यासाठी दिनांक १५ जुलै, २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वा. पर्यंत यापत्रान्वये मुदतवाढ देण्यात येत आहे.

सोबत पुरस्काराचे सुधारित वेळापत्रक जोडले आहे. त्याप्रमाणे आपल्या स्तरावरील कालमर्यादित कार्यवाही होणे आवश्यक आहे. सदर वेळापत्रकात बदल झाल्यास त्याबाबत आपणांस संचालनालय स्तरावरुन अवगत करण्यात येईल.

सदरील बाबत आपल्या कार्यालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व संबंधितांना आपल्या स्तरावरून देखील स्वतंत्रपणे सूचना/लेखी आदेश निर्गमित करुन सर्व संबंधित शिक्षकांपर्यंत माहिती पोहचेल असे पाहावे.

Related posts:

Leave a Comment