विद्यांजली २.० पोर्टलवर शाळांची १००% नोंदणी व शाळेच्या गरजेनुसार साहित्याची मागणी करणेबाबत vidhyanjali portal registration 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

विद्यांजली २.० पोर्टलवर शाळांची १००% नोंदणी व शाळेच्या गरजेनुसार साहित्याची मागणी करणेबाबत vidhyanjali portal registration 

संदर्भ : १. शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, नवी दिल्ली यांचे पत्र F.N.४-२/२०२२/KT दि.०८/०१/२०२५.

२. शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, नवी दिल्ली यांचा दूरध्वनी संदेश दि. १७/०७/२०२६.

उपरोक्त विषयानुसार, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, नवी दिल्ली यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० यामध्ये त्यातील लक्ष्य साध्यतेच्या दृष्टिकोनातून लोकसहभागाच्या तसेच खाजगी क्षेत्राच्या सक्रिय सहभागाची आवश्यकता विशद केलेली आहे. याकरिता विद्यांजली २.० वेबपोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. विद्यांजली २.० A Volunteer Management Programme हा कार्यक्रम शाळांकरिता सहाय्यभूत असून यादृष्टीने शिक्षा मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्लीद्वारा सदरील कार्यक्रमाच्या मार्गदर्शक सूचना तयार करण्यात आल्या आहेत.

शालेय शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी लोकसहभागाची अत्यावश्यक भूमिका आहे. विद्यांजली २.० हे देशभरात दर्जेदार शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या संसाधनांचे एकत्रीकरण करण्याचे एक प्रभावी माध्यम आहे. तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये सुद्धा शालेय शिक्षण प्रणालीमध्ये लोकसहभागाचे महत्त्व देखील नमूद केले आहे. शालेय शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी लोकसहभाग आणि स्वयंसेवी

सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालयाने एक स्वयंसेवक व्यवस्थापन प्रणाली विद्यांजली २.० विकसित केली असून या कार्यक्रमांतर्गत भारतीय नागरिक, अनिवासी भारतीय तसेच नोंदणीकृत संस्था या शासकीय आणि खाजगी अनुदानित शाळांना कोणताही मोबदला/मानधन न घेता सेवा प्रदान करू शकतात तसेच शालेय गुणवत्ता विकास कार्यक्रमात सहभाग घेऊ शकतात.

कृतीशील ज्येष्ठ नागरिक, माजी विद्यार्थी, स्थानिक समुदायातील व्यक्ती, शिक्षित स्वयंसेवक, निवृत्त वैज्ञानिक/शासकीय/निमशासकीय अधिकारी, कर्मचारी/सशस्त्र दलातील व्यक्ती, गृहिणी, साक्षर व्यक्ती हे शाळांच्या विनंतीनुसार स्वयंसेवक म्हणून काम करू शकतात. तज्ञता क्षेत्र, योगदान, सेवा/कृती, मालमत्ता/साहित्य/उपकरणे, प्रशासक या क्षेत्रामध्ये आपली सेवा प्रदान करू शकतात.

तद्नुषंगाने शालेय शिक्षण संस्थेला बळकट करण्यासाठी कंपन्या/नागरी संस्था/सरकारी संस्थाकडून संसाधने एकत्रित करण्यासठी ऑक्टोंबर, २०२४ मध्ये पोर्टलवर एक विशेष CSR मॉडयुल https://vidyanjali.education.gov.in/csr/ विकसित करून जोडण्यात आले आहे. यामध्ये ११ व्यापक थीम अंतर्गत शाळांद्वारे निर्माण केलेले जिल्हानिहाय CSR प्रकल्प जसे की, डिजिटील पायाभूत सुविधा, सह-अभ्यासक्रम उपक्रम आणि खेळांसाठी उपकरणे, मूलभूत नागरी पायाभूत सुविधा इ. राज्य नोडल अधिकाऱ्याव्दारे पोर्टलवर अपलोड केले जातात. CSR प्रकल्प प्रत्येक तिमाहीत निधी मागणीसाठी जिल्हानिहाय तयार केले जातात. जुलै ते सप्टेंबर, २०२६ या तिमाहीसाठी CSR मॉडयुल अंतर्गत थीम निवड आणि प्रकल्प तयारीसाठी विंडो आता प्लॅटफॉर्मवर आहे. खालील कालावधीमध्ये संदर्भ क्र.२ नुसार कार्यवाही करण्यात यावी.

जिल्हा नोडल ऑफिसरव्दारे थीम निवडः दि.१७ ते २१ जुलै, २०२६

शाळाव्दारे प्रकल्प आवश्यकताः दि. २२ ते ३१ जुलै, २०२६

जिल्हा नोडल ऑफिसरव्दारे थीमनिहाय प्रकल्प एकत्रीकरण: दि.१ ते ७ ऑगस्ट, २०२६

राज्य नोडल ऑफिसरव्दारे जिल्हानिहाय प्रकल्पांना मंजुरी आणि अपलोड करणे : दि. ८ ते १५ ऑगस्ट, २०२६

दि. १६ ऑगस्ट २०२६, नंतर CSR सहभागासाठी खुले प्रकल्प

जिल्हा नोडल अधिकारी यांनी विद्यांजली २.० पोर्टलच्या पत्राच्या संदर्भानुसार तालुकास्तरावरील Block Users म्हणून आपल्या जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये गटशिक्षणाधिकारी यांची तालुका नोडल अधिकारी म्हणून नेमणूक केलेली आहे. तथापि काही प्रशासकीय बदल झाले असल्यास त्यानुसार संबधित तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी यांची तालुका नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात यावी. त्यानुसार तालुक्यातील शाळांची विद्यांजली २.० पोर्टलवर नोंदणी करणे, शाळांनी सामग्री मागणी करणे सदर बाबी वेळोवेळी

राज्याने दिलेल्या सूचनेप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी. तसेच पत्र प्राप्त होताच जिल्ह्यातील पर्यवेक्षक अधिकारी यांना विद्यांजली २.० पोर्टलच्या अनुषंगाने मार्गदर्शन करावे. विद्यांजली २.० पोर्टलच्या बाबत काही तांत्रिक अडचण जाणवल्यास विद्यांजली कार्यक्रमाचे राज्य नोडल अधिकारी श्री. अरुण जाधव यांच्याशी ९४२३५३७९२७ या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. संबंधितानी सदर निर्देशांचे काटेकोरपणे पालन करणेबाबत आपले स्तरावरून आदेशित करण्यात यावे.

शासन निर्णय pdf download 

सोबत :- नोंदणी न झालेल्या शाळांची यादी.

Related posts:

Leave a Comment