शासकीय कार्यालयात वैयक्तिक समारंभ साजरे न करणेबाबत shaskiy karyalayat vaiyaktik samarambha
परिपत्रक
विभागाचे अधिकारी वा कर्मचारी हे शासकीय कार्यालयात व कार्यालयीन वेळेत आपले वैयक्तिक समारंभ (उदा. वाढदिवस साजरा करत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. त्यामुळे कार्यालयीन कामाचा वेळ वाया जावून कार्यालयात कामानिमित्त आलेल्या अभ्यागत, नागरिक यांना त्यांचे कामासाठी तिष्ठत्त राहावे लागते, अशा प्रकारचे वैयक्तिक समारंभ साजरे करणेची बाब महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ नुसार उचित नाही.
त्यामुळे याद्वारे निर्देश देण्यात येतात की, जमाबंदी आयुक्त आणि संचालक भुमि अभिलेख (म.राज्य), पुणे यांचे कार्यालय तसेच अधिनस्त सर्व कार्यालयांत यापुढे कोणतेही वैयक्तिक समारंभ शासकीय कार्यालयात कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत साजरे केल्याचे आढळल्यास संबंधितांवर कारवाई करणेत येईल. तसेब यापुर्वी इकडील विभागाचे अधिकारी वा कर्मचारी यांनी वाढदिवस किंवा इतर वैयक्तिक समारंभकार्यालयात व कार्यालयीन वेळेत साजरे केले असल्याची बाब निदर्शनास आलेस त्या अधिकारी/ कर्मचारी यांना त्यांचे नियंत्रण अधिकारी यांनी तात्काळ समज द्यावी. कोणत्याही परिस्थितीत अशा अनुचित बाबी यापुढे घडणार नाहीत याची दक्षता घ्यावी.










