शालार्थ प्रणालीतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांचे ई-केवायसी पूर्ण करणेबाबत e-kyc shalartha pranali paripatrak 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शालार्थ प्रणालीतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांचे ई-केवायसी पूर्ण करणेबाबत e-kyc shalartha pranali paripatrak 

संदर्भ- १. वित्त विभाग शासन परिपत्रक क्र. संकीर्ण-२०२२/प्र.क्र.२९/ कोषा प्रशा-४ दि. २७/३/२०२६

२. वित्त विभाग शासन परिपत्रक क्र. संकीर्ण-२०२२/प्र.क्र.२९/ कोषा प्रशा-४ दि. २३/४/२०२६.

३. मा. प्रधान सचिव, वित्त विभाग मंत्रालय मुंबई यांनी दिनांक २८/७/२०२६ रोजी आढावा बैठकीत दिलेले निर्देश.

उपरोक्त विषयाबाबत कळविण्यात येते की, संदर्भ क्र. १ अन्वये सेवार्थ प्रणालीतील अधिकारी/कर्मचारी यांचे ई-केवायसी पूर्ण करणेबाबत सविस्तर निर्देश देण्यात आले होते. तसेच संदर्भ क्र. २ अन्वये माहे मे २०२६ पर्यंत ई-केवायसी पूर्ण करणेबाबत मुदतवाढ देण्यात आलेली होती.

तथापि संदर्भ क्र. ३ अन्वये मा. प्रधान सचिव, वित्त विभाग मंत्रालय मुंबई यांनी दि. २८/७/२०२६ रोजीच्या आढावा बैठकीमध्ये शालार्थ प्रणालीमधून वेतन घेणा-या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांचे ई-केवायसी तात्काळ पूर्ण करणेबाबत निर्देश दिलेले आहे.

तरी संदर्भ क्र. ३ अन्वये दिलेल्या निर्देशानुसार अंशतः अनुदानित, खाचगी अनुदानित व जिल्हा परिषद प्राथमिक/माध्यमिक शाळेतील शालार्थ प्रणालीमधून वेतन घेणा-या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे माहे ऑगस्ट, २०२६ देय सप्टेंबर, २०२६ वा वेतन देवकाअगोदर ई-केवायसी पूर्व करावयाची आहे. सदर ई-केवायसी पूर्ण न केल्यास संबंधित शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांचे माहे ऑगस्ट, २०२६ देय सप्टेंबर, २०२६ चे वेतन आहरित करण्यात येणार नाही. तसेच याबाबत कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही याची सर्व संबंधितांनी गांभीर्याने नोंद घ्यावी. याबाबत आपल्या स्तरावरून संबंधित सर्व शाळांना तात्काळ सूचना देण्यात याव्यात.

प्रत. श्री. पवन जोशी, प्रोजेक्ट लिड, शालार्थ सिस्टीम, महाआयटी मुंबई यांना प्रत देऊन कळविण्यात येते की, शालार्थ प्रणालीमधून वेतन घेणा-या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांचे ई-केवायसी करण्यासाठी शालार्थ प्रणालीमध्ये तात्काळ सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच ई-केवायसी पूर्ण केल्याशिवाय माहे ऑगस्ट, २०२६ देय सप्टेंबर, २०२६ चे वेतन देयक तयार होणार नाही याबाबत व्हॅलीडेशन देण्यात यावा.

Related posts:

Leave a Comment