CRS पोर्टल मधील जन्म प्रमाणपत्राबाबत birth certificate digitization
संदर्भ : मा. आयुक्त, आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई यांची मान्यता दि. २८/०७/२०२६
उपरोक्त विषयानुसार महाराष्ट्र राज्यामध्ये जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम १९६९ व सुधारित अधिनियम २०२३ तसेच महाराष्ट्र जन्म मृत्यू नोंदणी नियम २००० अन्वये जन्म व मृत्यू घटनांची नोंदणी केली जाते. सन २०१६ पासून महाराष्ट्र राज्यामध्ये केंद्र शासनाने विकसित केलेल्या CRS पोर्टल द्वारे जन्म व मृत्यू घटनांची नोंदणी करण्यास सुरुवात झाली. त्यापूर्वी जन्म दाखले offline पद्धतीने व काही महानगरपालिका, नगरपरिषद व ग्रामपंचायत या त्यांनी विकसित केलेल्या software मधून online दिले जात होते. २०१६ पूर्वीचे सर्व दाखल्यांचे संगणकीकरण (digitization) अद्याप पूर्ण झालेले नसल्याने २०१६ पूर्वीचे offline जन्म दाखले हे आधारकार्डसाठी च्या माहितीसाठी ग्राह्य धरले जावेत.
सन २०१६ ते CRS पोर्टल Revamp होईपर्यंत च्या कालावधीतील CRS पोर्टल जन्म प्रमाणपत्रामध्ये सर्वात पहिल्या रकान्यात बाळाचे नाव व त्याखालील रकान्यांमध्ये आईचे पूर्ण नाव व वडिलांचे पूर्ण नाव असा नमुना होता. CRS पोर्टल Revamp झाल्यानंतर बाळाचे नाव हे तीन रकान्या मध्ये नमूद केले जात आहे. त्यामुळे या दोन्ही नमुन्यांमधील जन्म दाखले आधारकार्डसाठी च्या माहितीसाठी ग्राह्य धरले जावेत. जेणेकरून जुने जन्म दाखले नवीन नमुन्यांप्रमाणे सादर करण्याबाबतचा पालकांवर तसेच जन्म मृत्यू निबंधकांवर असलेला प्रचंड ताण कमी करता येईल व प्रकिया सुलभ करून त्यात सुसूत्रता आणता येईल.









