शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ नुसार पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीसाठीच्या रिक्त जागांसाठी प्राधान्यक्रम जनरेट करण्याबाबत व लॉक करण्याबाबत pavitra portal shikshak bharti 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ नुसार पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीसाठीच्या रिक्त जागांसाठी प्राधान्यक्रम जनरेट करण्याबाबत व लॉक करण्याबाबत pavitra portal shikshak bharti 

१. पवित्र पोर्टलवर सध्या स्व प्रमाणपत्र पूर्ण असलेल्या १,७०,१०८ उमेदवारांकडून प्राधान्यक्रम जनरेट करणे व लॉक करण्याची कार्यवाही सुरु आहे. खालील प्रमाणे प्राधान्यक्रम जनरेट झालेले आहे.

A) आज सकाळी ८:०० अखेर मुलाखतीशिवाय १,३४,०८२, मुलाखतीसह १,२२,३८७पोर्टलवर प्राधान्यक्रम जनरेट झालेले आहेत.

B) आज सकाळी ८:०० अखेर मुलाखतीशिवाय – ६४,९७९, मुलाखतीसह – ३९,३०८ पोर्टलवर

C) प्राधान्यक्रम लॉक झालेले आहेत.

D) आज रात्री ११:०० अखेर मुलाखतीशिवाय १,४२,५३९, मुलाखतीसह- १,३२,६०० पोर्टलवर प्राधान्यक्रम जनरेट झालेले आहेत.

E) आज रात्री ११:०० अखेर मुलाखतीशिवाय- १,०७२५४, मुलाखतीसह- ७८,७५४ पोर्टलवर प्राधान्यक्रम लॉक झालेले आहेत.

वरील प्रमाणे उमेदवारांकडून पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम जनरेट व लॉक झालेले आहेत.

२. उमेदवारांना यापूर्वी २ वेळा वैयक्तिकरित्या देखील प्राधान्यक्रम लॉक करण्याबाबत SMS द्वारे स्वतंत्रपणे कळविण्यात आलेले आहे.

३. उमेद्वारांना Otp बाबत येणाऱ्या अडचणी सोडविण्यात आलेल्या आहेत, ज्यांचे Otp मुळे लॉगिन करणे व प्राधान्यक्रम लॉक करणे राहिले असेल त्यांनी कृपया आपले लॉगिन करून प्राधान्यक्रम लॉक करावेत.

४. उमेदवारांकडून जनरेट होत असलेले प्राधान्यक्रम व लॉक करण्यात येत असलेले प्राधान्यक्रम याबाबत संकेतस्थळावरील स्थिती सर्वाना लक्षात यावी, यासाठी पवित्र पोर्टलवरील होम पेजवर Preferences Dashboard या अंतर्गत प्राधान्यक्रम स्थिती पाहण्याची सुविधा देण्यात आली आहे.

५. उमेदवार प्राधान्यक्रम नोंद करण्यापासुन वंचित राहू नयेत यासाठी, अडचणी लक्षात घेता प्राधान्यक्रम लॉक करण्याची मुदत दिनांक १३/०८/२०२६ ऐवजी १६/०८/२०२६ पर्यंत अशी वाढविण्यात येत आहे.

६. उमेदवारांना आवाहन करण्यात येते कि, त्यांनी आपले प्राधान्यक्रम दिलेल्या वाढीव मुदतीत जनरेट करून लॉक करावेत जेणेकरून पुढील प्रक्रिया पूर्ण करता येईल.

Related posts:

Leave a Comment