उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत सन 2026-27 मधील प्रथम पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (FLNAT) दिनांक 25 ऑक्टोंबर 2026 रोजी आयोजित करण्याबाबत ullas navbharat saksharta karyakram
संदर्भ:-
1. भारत सरकार, शिक्षण मंत्रालय, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग (प्रौढ शिक्षण ब्युरो), नवी दिल्ली यांचे पत्र क्र. F. No. 14-1/2023-AE-4, दिनांक 31 जुलै 2026.
2. शिक्षण संचालनालय (योजना), महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे संबंधित निर्देश.
3. जा. क्र. शिसंयो/ योजना-३/नभासा/साक्षरता पंधरवाडा /२०२६-२७/दिनांक 21/08/2026
4. F.No.5-2/2023-AE.2/U-2/GOVERNMENT OF INDIA/MIISTRY OF
EDUCATION/DATE:22 SEP 2026
उपरोक्त विषय व संदर्भीय पत्रांन्वये कळविण्यात येते की, केंद्र पुरस्कृत उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत पंधरा वर्षे व त्यावरील असाक्षर व्यक्तींना पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने प्रथम पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (FLNAT) दिनांक 25 ऑक्टोंबर 2026 रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत ऑफलाइन पद्धतीने आयोजित करण्यात येणार आहे. सदर चाचणीमध्ये आकलनासह वाचन, लेखन तसेच संख्याज्ञान या तीन प्रमुख घटकांचे मूल्यमापन करण्यात येणार आहे.
त्या अनुषंगाने आपल्या जिल्ह्यातील FLNAT चाचणीचे नियोजन व अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यासाठी खालील प्रमाणे कार्यवाही तातडीने करण्यात यावी,
दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी FLNAT चाचणी आयोजित करण्याबाबतची जिल्हानिहाय आवश्यक पूर्वतयारी पूर्ण करावी. आपल्या जिल्ह्यातील संबंधीत शाळा/परीक्षा केंद्रे याची निश्चिती करून तेथे आवश्यक भौतिक व प्रशासकीय व्यवस्था करण्यात यावी. FLNAT साठी पात्र असलेल्या सर्व असाक्षरांची उल्लास मोबाईल पोर्टल वरील नोंदणी, स्वयंसेवकाची जोडणी, साक्षरता वर्ग नियमित सुरू ठेवणे व परीक्षेस 25 ऑक्टोंबर 2026 या तारखेस पात्र असाक्षरांचे शॉर्टलिस्टिंग इत्यादी प्रक्रिया विहित मदतीत पूर्ण करून जिल्ह्यातील सर्व पात्र असाक्षर चाचणीस उपस्थित राहतील यासाठी व्यापक प्रसिद्धी, जनजागृती व प्रभावी प्रचार- प्रसार करण्यात यावा. ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा, स्वयंसेवी संस्था, स्वयंसेवक, शिक्षक व संबंधित यंत्रणाच्या सहकार्याने जास्तीत जास्त असाक्षर FLNAT चाचणीस उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी. तसेच आपणस
कळवण्यात येते कि, सदर परीक्षा हि दिनांक 20/09/2026 नियोजित होती, त्या अनुषंगाने पत्र संचालनालय स्तरावरून निर्गमित करण्यात आले होते, त्या नुसार शाळा स्तरावरती दि. 20/09/2026 रोजी शॉर्टलिस्टिंग करण्याची प्रक्रिया सुरु होती परंतु काही कारणास्तव सदर परीक्षा पुढे ढकलण्यात आली. तसेच आपणस सुधारित परीक्षेची तारीख हि कळविण्यात आलेली आहे. सदर तारखेस आपणास परीक्षेला प्रविष्ट होणाऱ्या असाक्षर व्यक्तींची शॉर्टलिस्टिंग प्रक्रिया पूर्ण करावयची असून या पूर्वी दि. 20/09/2026 रोजी शॉर्टलिस्टिंग प्रक्रिया पूर्ण केलेल्या असाक्षर व्यक्तींची माहिती हि सुधारित तारखेस त्याचा समावेश करण्यात आलेला असून त्यामुळे या पूर्वी दि. 20/09/2026 रोजी शॉर्टलिस्टिंग पूर्ण केलेल्या असाक्षर व्यक्तींची शॉर्टलिस्टिंग पुन्हा नव्याने करण्याची गरज नाही.
आपल्या जिल्ह्याने सदर FLNAT चाचणी दिनांक 25 ऑक्टोंबर 2026 रोजी आयोजित करण्यात येणार असल्याची खात्री दिनांक 10 ऑक्टोंबर 2026 पर्यंत शिक्षण संचालनालय (योजना), पुणे यांना कळवावी. FLNAT चाचणीसाठी प्रस्तावित अंतिम असाक्षर संख्या दिनांक 20 ऑक्टोंबर 2026 पर्यंत स्वतंत्रपणे उपलब्ध करून देण्यात येणा-या गुगल फॉर्म द्वारे सादर करावी. चाचणी सुरळीत, पारदर्शक व नियोजनबद्ध पद्धतीने पार पडण्यासाठी जिल्हास्तरावर आवश्यक अधिकारी/कर्मचारी यांची जबाबदारी निश्चित करून योग्य ती व्यवस्था करावी. भारत सरकारकडून प्राप्त Confidential Question-and-Answer Booklets (QABs) संदर्भात गोपीनियता राखून, शासनाच्या सूचनानुसार त्यांचा वापर वितरण करण्यात यावे. FLNAT चाचणीबाबत जिल्हास्तरावर करण्यात आलेल्या कार्यवाहीचा नियमित आढावा घेऊन आवश्यक ती कार्यवाही तातडीने पूर्ण करावी.
वरील प्रमाणे कार्यवाही करून उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत सन 2026-27 मधील प्रथम FLNAT चाचणीमध्ये आपल्या जिल्ह्यातील पात्र असाक्षरांचा जास्तीत जास्त सहभाग सुनिश्चित करावा.
सदर बाबत अत्यंत महत्त्वाचे व कालबद्ध असून, याबाबत कोणतेही दिरंगाई होणार नाही याची दक्षता घ्यावी.











