महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र (देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) (सुधारणा) अधिनियम, २०२६ caste validity certificate
क्रमांक एसटीसी-२१२०/प्र.क्र.१३७/का.१०. महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र (देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) (सुधारणा) अधिनियम, २०२६ (२०२६ चा महा. ३८) याच्या कलम ६ख च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीबाबत छाननी समितीने पारित केलेल्या आदेशांच्या संदर्भात, “अपील प्राधिकरण” म्हणून त्या त्या महसूल विभागासाठी नियुक्त केलेल्या विभागीय आयुक्तांना विनिर्दिष्ट करीत आहे.











