सर्व शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील इयत्ता ६ वी ते १२ वी मधील किशोरवयीन मुलींना मोफत सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देणेबाबत मार्गदर्शक सूचना Sanitary pad guidelines 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सर्व शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील इयत्ता ६ वी ते १२ वी मधील किशोरवयीन मुलींना मोफत सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देणेबाबत मार्गदर्शक सूचना Sanitary pad guidelines

संदर्भ : दि. २०/०५/२०२६ रोजीच्या भारत सरकारच्या प्रकल्प मान्यता मंडळाच्या बैठकीचे इतिवृत्त

मा. सर्वोच्च न्यायालयाने दि ३०/०१/२०२६ रोजी दिलेल्या निकालामध्ये “सन्मानजनक मासिकपाळी विषयक आरोग्याचा अधिकार” हा संविधानाचा अनुच्छेद २१ अंतर्गत जीवनाचा व सन्मानाने जगण्याचा मूलभूत अधिकार असल्याचे स्पष्ट केले आहे.

मुलींचे आरोग्य, शिक्षण, सन्मान आणि सुरक्षित भविष्य यासाठी मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापन (Menstrual Hygiene Management) अत्यंत आवश्यक आहे.

मुलींच्या शिक्षणातील सातत्य, शालेय उपस्थिती वाढविणे, आरोग्य संवर्धन यासाठी पुढीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहे.

१. जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय प्रकार – २ व शासकीय शाळांमधील इयत्ता ६ वी ते १२ वीतील किशोरवयीन मुलींना मोफत सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देण्यात यावेत.

२. प्रत्येक विद्यार्थिनीसाठी वार्षिक रु. ३००/- इतका निधी केंद्रशासनाकडून मंजूर करण्यात आला आहे.

३. शाळास्तरावरुन किशोरवयीन मुलींना सॅनिटरी पॅड उपलब्ध करुन देण्यासाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्यामार्फत शाळा व्यवस्थापन समितीच्या (SMC) खात्यात निधी वर्ग करण्यात येणार आहे.

४. भारतीय मानक ब्युरो (BIS) चे ISI चिन्ह असलेले सॅनिटरी पॅड वापरासाठी सुरक्षित आहेत. सवब, IS। चिन्ह असलेले सॅनिटरी पॅड आवश्यकतेनुसार खरेदी करावेत.

५. प्रत्येक महिन्याला सर्व पात्र विद्यार्थिनींना सॅनिटरी पॅडचे नियमित वितरण करुन त्याचा वापर होत असल्याचे सुनिश्चित करावे. शाळा व्यवस्थापन समितीने (SMC) सदर उपक्रमाचे संनियंत्रण करावे.

६. वितरणाबाबत स्वतंत्र नोंदवही ठेवून विद्यार्थिनींचे नाव, इयत्ता, वितरण दिनांक, वाटप केलेल्या सॅनिटरी पॅडची संख्या, विद्यार्थीनी स्वाक्षरी व शिल्लक साठा याची माहिती नोंदविण्यात यावी,

७. प्रत्येक शाळेमध्ये मुलींसाठी स्वतंत्र, सुरक्षित व स्वच्छ स्वच्छतागृह तसेच वापरलेल्या सॅनिटरी पॅडच्या विल्हेवाटीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात याव्यात.

८. आरोग्य विभागाच्या सहकार्याने मासिक पाळी स्वच्छता, आरोग्य व जनजागृती विषयक विनामूल्य कार्यक्रम नियमितपणे आयोजित करण्यात यावेत.

मोफत सॅनिटरी पॅड योजनेचा उद्देश विद्यार्थिनींची शाळेतील उपस्थिती वाढविणे, मासिक पाळीमुळे होणारी अनुपस्थिती कमी करणे, मुलींचे आरोग्य व स्वच्छता सुधारणे, शाळा सोडण्याचे प्रमाण कमी करणे, मुलींच्या सन्मान, सुरक्षितता व आत्मविश्वासात वाढ करणे तसेच मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी करणे असा आहे.

सबब मोफत सॅनिटरी पॅड उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी.

शासन निर्णय pdf download 

Related posts:

Leave a Comment