जिल्हा परिषदेच्या दिनांक १५ मे २०१४ च्या शासन निर्णयातील गट-क (वर्ग-३) व गट-ड (वर्ग-४) संवर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्यांच्या धोरणात सुधारणा intra district transfar 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जिल्हा परिषदेच्या दिनांक १५ मे २०१४ च्या शासन निर्णयातील गट-क (वर्ग-३) व गट-ड (वर्ग-४) संवर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्यांच्या धोरणात सुधारणा intra district transfar 

महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग

शासन पूरक पत्र क्रमांकः जिपब-११२६/प्र.क्र.१२६/आस्था-१४

२५, मर्झबान पथ, बांधकाम भवन, फोर्ट, मंत्रालय, मुंबई – ४०० ००१

दिनांक:- ०४ ऑगस्ट, २०२६

वाचा :-

शासन निर्णय क्र. जिपब-४१४/प्र.क्र.११२/आस्था-१४, दि.१५ मे, २०१४

शासन पूरक पत्रः-

जिल्हा परिषदेच्या गट-क (वर्ग-३) व गट-ड (वर्ग-४) संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबतचे धोरण ग्राम विकास विभागाच्या वाचा येथील दि. १५ मे, २०१४ रोजीच्या शासन निर्णयान्वये निश्चित केलेले आहे.

सदर शासन निर्णयातील प्रकरण-३ तालुकांतर्गत बदल्या मधील अनु.क्र. १ येथे नमुद “प्राथमिक/माध्यमिक शिक्षक, ग्रामसेवक/ग्राम विकास अधिकारी, आरोग्य कर्मचारी” या मजकुराच्या नंतर “सहाय्यक पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक” असा मजकुर समाविष्ट करण्यात येत आहे.

सदर शासन पूरकपत्र महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२६०८०४१६५६३१५४२० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

Digitally signed by VAISHALI SHIVKUMAR DIGE

Date: 2026.08.04 16:57:29 +05’30’

(वैशाली डिगे) उप सचिव, महाराष्ट्र शासन

Related posts:

Leave a Comment